Malnutrition Issue : संपामुळे कुपोषणाचा प्रश्न गंभीर

Anganwadi Employees strike : रायगड जिल्ह्यातील ३,१९४ अंगणवाडी, मिनी अंगणवाडीसेविका, मदतनीस सोमवारपासून (ता. ४) राज्यव्यापी बेमुदत संपात सहभागी झाल्या आहेत.
Anganwadi
AnganwadiAgrowon
Published on
Updated on

Alibaug News : अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करणे, निवृत्तीवेतन, ग्रॅच्युइटी देणे आदी मागण्यांसाठी रायगड जिल्ह्यातील ३,१९४ अंगणवाडी, मिनी अंगणवाडीसेविका, मदतनीस सोमवारपासून (ता. ४) राज्यव्यापी बेमुदत संपात सहभागी झाल्या आहेत.

यात गुरुवारपासून तिसऱ्या संघटनेच्या कर्मचारीही सहभागी होत असल्याने जिल्ह्यातील सर्वच अंगणवाड्या बंद राहणार आहेत. यामुळे स्तनदा माता, अंगणवाडीत येणाऱ्या बालकांच्या पोषणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

अंगणवाडीत येणाऱ्या मुलांना शिक्षणाचे धडे देण्याबरोबरच सरकारमार्फत आलेला पोषक आहाराचे वाटप करणे, गर्भवतींना पोषक आहार वाटप करणे, पोलिओ डोस शिबिरात सहकार्य करणे आणि महिला-बालक संबंधित सरकारी योजनांची माहिती देणे अशी अनेक कामे अंगणवाडी सेविकांना करावी लागतात.

Anganwadi
Ajit Pawar : 'कांदानिर्यात, उसापासून इथेनॉलनिर्मिती बंदीवर केंद्रिय मंत्री अमित शहांची भेट घेणार'

यात ग्रामीण भागातील मुलांचे कुपोषण कमी करण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांमध्ये त्यांना सहभगी व्हावे लागते. अंगणवाडीत येणाऱ्या मुलांना ताजे अन्न शिजवून देण्याबरोबरच लाभार्थ्यांना घरपोच सुक्या अन्नांच्या पाकिटांचे वाटपही त्‍यांना करावे लागते; मात्र, सध्या सुरू असलेल्या संपामुळे पोषण आहाराचे वाटप ठप्प आहे.

जिल्ह्यात ८७ तीव्र कुपोषित आणि ६२५ मध्यम कुपोषित बालकांनी नोंद आहे. संप कालावधीत त्यांना पोषण आहाराची कोणतीही पर्यायी व्यवस्था करण्याचे आदेश सरकारने अद्याप दिलेले नाही. त्यामुळे कुपोषणाची दरी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. यात सर्वाधिक फटका दुर्गम, आदिवासी भागाला बसणार आहे. जिल्ह्यात कर्जत, खालापूर तालुक्यात कुपोषणाचे प्रमाण जास्‍त आहे.

गुरुवारपासून महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनाही संपावर जात आहेत. राज्य सरकारला यापूर्वी अनेक निवेदने दिली आहेत. वारंवार आंदोलन करूनही दुर्लक्ष होत असल्याने काम बंदची भूमिका घ्यावी लागली. रायगड जिल्ह्यात तळा तालुका वगळता सर्वच तालुक्यांमध्ये संघटनेचे सदस्य कार्यरत असून आंदोलनात सहभागी होत आहेत.
माया परमेश्वर, अध्यक्षा, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना
अंगणवाडीसेविकांवर पोषण आहाराची महत्त्वाची जबाबदारी असते. शिजवलेले ताजे अन्न कसे द्यावे, या संदर्भात वरिष्ठांकडून कोणत्याही मार्गदर्शक सूचना आलेल्या नाहीत. कुपोषणाची स्थिती संप किती दिवस चालणार, यावर अवलंबून असणार आहे. संपात तिसरी संघटनाही सहभागी होत आहे.
निर्मला कुचिक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला - बाल कल्याण विभाग
Anganwadi
Climate Change : हिमनद्यांवर मॉन्सून परिवर्तनशीलतेचा परिणाम

कर्मचाऱ्यांची भूमिका

अंगणवाडी सेविका या घरोघरी जाऊन मुलांची वजन, उंची, त्याचे वृद्धिमापन करतात. त्यानुसार साधारण, मध्यम कुपोषित, तीव्र कुपोषित अशी श्रेणी काढतात. मुलांच्या पालकांना योग्य आहार, आरोग्य याविषयी मार्गदर्शन करतात.

गर्भवतींना आहाराबाबत सल्ला देणे, लसीकरणाबद्दल माहिती देणे, स्तनदा महिलांची घरी जाऊन चौकशी करणे, लहान मुलांचा आहार कसा असावा याची माहिती देणे, दर महिन्याला लहान मुलांचे वजन करून त्यानुसार आहाराबाबत सल्ला देणे आदी कामे अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून केली जातात. भावी पिढी अधिक सुदृढ व्हावी, यासाठी अंगणवाडीसेविकांवर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

अंगणवाड्यांचा तपशील

अंगणवाडीतील बालके- १ ,४८,३४२

अंगणवाडी सेविका- २,७७०

संपावरील अंगणवाडी सेविका - १,४४४

अंगणवाडीतील मदतनीस - २,२४९

संपावरील मदतनीस - १,४०१

मिनी अंगणवाडी सेविका - ३४९

संपामुळे बंद अंगणवाड्या - ३,०९८

सद्यःस्थितीतील कुपोषणाचे प्रमाण

कुपोषित मध्यम तीव्र

अलिबाग ५० ८

कर्जत-१ ९८ २२

कर्जत-२ ५३ ६

खालापूर ३३ ६

महाड ६५ १०

माणगाव ७३ १५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com