Onion Export Ban : निर्यात बंदी विरोधात शेतीमाल नाकेबंदी

Sharad Joshi and Vitthal Pawar : सरकारच्या शेतीमाल निर्यात बंदी विरोधामध्ये शेतकरी संघर्ष समितीची स्थापना केल्यानंतर समितीने सरकारची नाकेबंदी करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विठ्ठल पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
Onion Ban Export
Onion Ban ExportAgrowon

Pune News : सरकारच्या शेतीमाल निर्यात बंदी विरोधामध्ये सर्व संघटनांच्या वतीने शेतकरी संघर्ष समितीची स्थापना केल्यानंतर समितीने सरकारची नाकेबंदी करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विठ्ठल पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.

शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेच्या वतीने नवी पेठेतील श्रमिक पत्रकार भवन येथे सोमवारी (ता.१) पत्रकार परिषद घेण्यात आली होती. त्या वेळी नाना बच्छाव, दीपक पगार, भानुदास शिंदे, धनंजय काकडे, सरफराज शेख, सूर्यकांत काळभोर, कैलास खंडबहाले, प्रवीण जेठेवाड, सुभाष करांडे, अनिल भांडवलकर, विश्‍वास जगताप आदी उपस्थित होते.

Onion Ban Export
Soybean, Onion Market : भाववाढ व्यापाऱ्यांच्या नफोखोरीमुळे; दोष मात्र शेतकऱ्याला; शेतीमालाचे भाव कितीही असले तरी व्यापाऱ्यांचा नफा ठरलेलाच असतो

विठ्ठल पवार म्हणाले, की केंद्र आणि राज्य सरकारचे सुलतानी निर्णय आणि अस्मानी संकट यामुळे राज्य आणि देशातला शेतकरी सातत्याने कर्जबाजारी होत आहे. त्यामुळे तो आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात सापडल्याने कर्जबाजारी होऊन आत्महत्या करतो आहे.

Onion Ban Export
Onion Rate : डिसेंबर महिन्यात झाली कांद्याची दरकोंडी

सर्व प्रदेश समन्वयकांनी आपापल्या भागात आठ जानेवारीपासून राज्यामध्ये शेतकऱ्यांनी कुठलाही शेतीमाल बाजार समितीला पाठवू नये. राज्यातल्या सर्व ३०५ बाजार समित्या आणि ६०० उपबाजार समित्यांनी आठ जानेवारीपासून संपात सहभागी व्हावे.

सर्व युवकांनी गावकडचा कोणताही शेतीमाल बाजार समितीकडे जाणार नाही, याची खबरदारी घ्यावी. यापुढे राजकीय पुढाऱ्यांना गावामध्ये प्रचारासाठी येऊ देऊ नये, कुठल्याही पक्षाचा प्रचार गावामध्ये होऊ देऊ नये, शेतकऱ्यांच्या सर्व प्रकारच्या शेतीमालाला किमान उत्पादन खर्च निघेल इतकी किंमत द्यावी, अशा विविध मागण्या निवेदनात केल्या आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com