Sanvad Melava : मोदींनी सर्व जाती-धर्मांच्या शेतकऱ्यांचे भले केले : मुंडे

Dhananjay Munde : परभणी जिल्ह्याच्या मातीने आमदार, खासदार, मंत्री घडविले परंतु मातीचा विकास मात्र झाला नाही. वैभवशाली जिल्ह्याचे वाटोळे केले त्यांना परत संधी देऊ नये. विकासाची जाण असलेल्या जानकरांना संधी द्यावी, असे प्रतिपादन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केले.
Dhananjay Munde
Dhananjay MundeAgrowon

Parbhani News : पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकरी विरोधी असल्याचा अपप्रचार केला जातो. परंतु मोदी यांनी थेट बँक खात्यावर निधी जमा करून सर्व जाती-धर्मांच्या शेतकऱ्यांचे भले केले. परभणी जिल्ह्याच्या मातीने आमदार, खासदार, मंत्री घडविले परंतु मातीचा विकास मात्र झाला नाही. वैभवशाली जिल्ह्याचे वाटोळे केले त्यांना परत संधी देऊ नये. विकासाची जाण असलेल्या जानकरांना संधी द्यावी, असे प्रतिपादन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केले.

Dhananjay Munde
Hatkanangle Lok sabha : भारतीय जवान किसान पार्टीकडून रघुनाथ पाटील हातकणंगले लोकसभेच्या रिंगणात

महायुतीतर्फे रविवारी (ता. १४) परभणी येथे आयोजित संवाद मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी परभणी लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार महादेव जानकर, आमदार मेघना बोर्डीकर, आमदार रत्नाकर गुट्टे, बाबाजानी दुर्राणी, माजी खासदार सुरेश जाधव, माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, माजी आमदार डॉ. मधुसूदन केंद्रे, हरिभाऊ लहाने, रामराव वडकुते, प्रताप देशमुख, राजेश विटेकर, आनंद भरोसे आदी उपस्थित होते.

मुंडे म्हणाले, की केंद्र व राज्याचे मिळून गरीब शेतकऱ्यांना केंद्र व राज्याचे मिळून वर्षाला १२ हजार रुपये मिळतात. गरीब अल्पभूधारक शेतकऱ्यांना खरोखर या मदतीचे महत्त्व आहे. मागील १० वर्षांत पंतप्रधान मोदी यांच्यामुळे जगात देशाची म्हणजेच प्रत्येक नागरिकांची प्रतिष्ठा वाढविली. शासनाच्या विविध योजनांचा गरिबांना थेट लाभ मिळत आहे.

Dhananjay Munde
Indian Politics : मोदींचा खरा चेहरा कोणता?

इंडिया आघाडीला पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर करता आला नाही यातच त्यांचा पराभव आहे. देशातील जनतेने मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याचे ठरविले आहे. त्यात परभणीकरांचा सहभाग आवश्यक आहे.

सुपीक जमीन, गोदावरी नदीवरील बंधाऱ्यांमुळे उपलब्ध झालेले पाणी यामुळे हा जिल्हा वैभवशाली आहे. परंतु याचा विकासात बदल झाला नाही. विकासावर कधीच निवडणूक झाली नाही. यंदाची निवडणुकीत विकास हा केंद्रबिंदू आहे.जानकर म्हणाले, की जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून मॉडेल तयार केले आहे. जिल्ह्याच्या कृषी, औद्योगिक विकासासाठी संधी द्यावी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com