
डॉ. प्रमोद मगर
Importance of Bees : मधमाशी निसर्गातील अत्यंत महत्त्वाचा अविभाज्य घटक असून, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या निसर्गाचे संतुलन राखण्याचे व संवर्धनाचे अविरत कार्य करतात. जगविख्यात शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी मधमाश्यांचे महत्त्व पटवून सांगताना असे म्हटले, की जर पृथ्वीवरून मधमाश्या नष्ट झाल्या, तर त्यानंतर अवघ्या काही वर्षांत मानवाचे अस्तित्व संपुष्टात येईल.
कारण पृथ्वीवरून मधमाश्या लुप्त झाल्या, तर वनस्पतींमध्ये प्रभावी परागीभवन होणार नाही. परागीभवन झाले नाही, तर पिके व अन्न निर्मितीमध्ये अडथळा येऊन प्राणी व मानवाला अन्न उपलब्ध होणार नाही आणि कालांतराने सजीवसृष्टी संपुष्टात येईल. त्यासाठी मधमाश्यांचे संगोपन आणि संवर्धन अत्यंत आवश्यक आहे.
मधमाश्यांच्या सुमारे २०,००० प्रजाती असून, त्यापैकी केवळ ८ प्रजातींची ओळख पटलेली आहे. त्यांच्या जवळपास ४३ उपप्रजाती आहेत. मधमाश्या या समूहाने राहतात. त्यांची कुटुंबव्यवस्था वैशिष्ट्यपूर्ण असते. सर्वसाधारणपणे मधमाश्यांच्या वसाहतीमध्ये प्रजातीनुरूप १०००० ते ४०००० मधमाश्यांची संख्या असू शकते.
मधमाश्यांच्या कुटुंबामध्ये एक राणी मधमाशी, हजारो कामकरी मधमाश्या आणि शेकडो नर मधमाश्या असे मधमाश्यांचे कुटुंब असते अशा मधमाश्यांच्या कुटुंबाला मधमाश्यांची वसाहत असे संबोधले जाते. राणी मधमाशी व कामकरी मधमाशी यांचा जन्म हा फलित (सफल) अंड्यांमधून होतो. तर नर मधमाश्यांचा जन्म अफलीत (असफल) अंड्यातून होतो.
मधमाशीपालनासाठी प्रजाती
एपीस मेलीफेरा (युरोपीय मधमाशी)
विदेशी पाळीव मधमाशी, कमी आक्रमक
वसाहत- २०,००० ते ६०,०००
भरपूर मकरंद, पराग गोळा करण्याची क्षमता
परागीभवन चांगले
पोषक तापमान- ३३ ते ३६ अंश सेल्सिअस
सरासरी मध उत्पादन : २५ किलो प्रति वसाहत प्रति वर्ष
राणी माशी : अंडी देण्याची जास्त क्षमता (१५०० ते २००० अंडी)
वसाहत वाढ- लवकर
वसाहती विभाजनास योग्य
गृहत्याग प्रवृत्ती कमी
मैदानी सपाट परदेशात संगोपनासाठी योग्य
दुष्काळ कालावधीत वसाहत लवकर कमजोर, तर दुष्काळ कालावधीनंतर वसाहत वाढ लवकर होते.
साधारण ५० अंश सेल्सिअस तापमानात तुलनेने कमी काम करते.
सर्वाधिक राणी निर्मिती शक्य
दूर स्थलांतर शक्य
रोंगण (प्रोपोलीस) गोळा करतात
पराग भार २२.२ मिलिग्रॅम
पोकड्यांचे आयुष्य ः २ वर्षे
उठाव प्रवृत्ती कमी व नियंत्रणास सोपी.
एपीस सेरेना (भारतीय सातेरी)
भारतीय पाळीव मधमाशी, जास्त आक्रमक
डोंगराळ, जंगली प्रदेशासाठी योग्य
वसाहत : सुमारे ३०,००० ते ३४,०००
मर्यादित मकरंद, पराग गोळा करण्याची क्षमता
परागीभवन उत्तम
पोषक तापमान ३३ ते ३६ अंश सेल्सिअस
मध उत्पादन : ६.५ किलो प्रति वसाहत प्रति वर्ष
राणी माशी : कमी अंडी क्षमता (१००० ते १५०० अंडी)
वसाहत वाढ - हळुवार
मर्यादित वसाहती विभाजन योग्य
पावसाळ्यात जास्त गृहत्याग प्रवृत्ती
दुष्काळ कालावधी : लवकर कमजोर होत नाही
वसाहत वाढ आरामात
कमी तापमान : लवकर कामास सुरवात
मर्यादित राणी निर्मिती
स्थानिक पातळीवर स्थलांतर, मर्यादित
कमी भांडवल, वसाहत पकडणे शक्य.
पराग भार : १०.५ मिलिग्रॅम.
पोकड्यांचे आयुष्य : ६ ते ८ महिने.
उठाव प्रवृत्ती जास्त परंतु, योग्य व्यवस्थापन केल्यास नियंत्रण करणे तितके अवघड नाही.
कामांचे विभाजन
राणी
नरमाशी सोबत मिलन.
अंडी घालणे.
वसाहतीतील मधमाश्यांना एकत्र ठेवून कामे करून घेण्याची जबाबदारी.
कामकरी
१ ते ३ दिवस : घराची स्वच्छता
४ ते ६ दिवस : मोठ्या अळ्यांना खाद्य
७ ते १० दिवस : लहान अळ्यांना खाद्य
११ ते १२ दिवस : राणीमाशीला खाद्य व सेवा
१३ ते १८ दिवस : मेण स्रवणे, घरे बांधणे
१९ ते २० दिवस : वसाहत संरक्षण
२१ दिवसांपासून पुढे : मकरंद, पराग, पाणी गोळा करणे, अंडी उबवणे, इतर कामे
नर
राणीमाशी सोबत मिलन करणे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.