Beekeeping : मधमाशीपालनातून मिळणारी आरोग्यदायी उत्पादने

Beekeeping Health Products : मधमाशीपालनातून विविध मौल्यवान पदार्थ मिळतात. मध, मेण, पराग, प्रोपोलिस, रॉयल जेली, बी व्हेनम असे विविध पदार्थ मिळतात.
Beekeeping
BeekeepingAgrowon
Published on
Updated on

डॉ. प्रमोद मगर

Natural Remedies : मधमाशीपालनातून विविध मौल्यवान पदार्थ मिळतात. मध, मेण, पराग, प्रोपोलिस, रॉयल जेली, बी व्हेनम असे विविध पदार्थ मिळतात. आयुर्वेदामध्ये मधाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. मध हा उत्तम अँटी ऑक्सिडॅन्ट, जिवाणूविरोधी, विषाणूविरोधी आणि बुरशीविरोधी असल्याने त्याला आयुर्वेदामध्ये मोलाचे स्थान आहे.

मध

मधपोळ्यांमधून मिळणाऱ्या मधामध्ये २७ प्रकारची खनिजे, विविध अमिनो आम्ल आणि ५००० प्रकारची सक्रिय विकरे (Enzymes) आढळतात.

आरोग्यदायी फायदे

मध हा शक्ती आणि बुद्धिवर्धक मानला जातो.

मधामध्ये कर्करोगाविरोधी गुणधर्म आहेत.

पोट साफ राहण्यासही मधाचे सेवन फायदेशीर ठरते.

त्वचेच्या आरोग्यासाठी मध फायदेशीर ठरतो.

मध हृदयाचे आरोग्य चांगले ठेवते.

घसादुखी, खोकला यावर आराम मिळण्यासाठी मधाचे सेवन करणे उत्तम.

रक्त शुद्धीकरण, प्रतिकारशक्ती, पचनशक्ती वर्धक म्हणून मध ओळखला जातो.

उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी उपयुक्त.

Beekeeping
Beekeeping : मधमाशीपालनामुळे अर्थकारणाला मिळाली भरारी

मेण

जिवाणू-बुरशी रोधी असून कोलेस्टेरॉल स्तर नियंत्रित करणे.

दाह रोधक म्हणून औषधांमध्ये वापर.

सौंदर्य प्रसाधने निर्मितीमध्ये वापर.

त्वचेचा आरोग्यासाठी मेणातील जीवनसत्त्व अ उपयुक्त ठरते.

मेणबत्ती, मेणपत्रे, कार्बन पेपर निर्मितीमध्ये वापर.

विविध रंग, पॉलिश, शाई यांच्या निर्मितीमध्ये वापर,

पराग (पोलन)

मधाप्रमाणेच मधमाश्‍या पराग संकलन देखील करतात. पराग हे प्रथिनांनी समृद्ध असलेले एक परिपूर्ण आरोग्यदायी, शक्तिवर्धक आहेत. परागामध्ये पिष्टमय पदार्थ, स्निग्ध पदार्थ, प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे, क्षार आणि निरनिराळे विकरे असतात.

फायदे

पचनशक्ती वाढविते.

औषधे व सौंदर्य प्रसाधने निर्मितीमध्ये वापर.

शस्त्रक्रियेनंतर जखमा त्वरित भरण्यास मदत होते.

दाहरोधक, ॲलर्जीविरोधी गुणधर्म, कर्करोग रोधक गुणधर्म आहेत.

हिमोग्लोबिन कमतरता, व्यंधत्व विकार उपचारामध्ये परागाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

Beekeeping
Beekeeping : मधमाशीपालनासाठी प्रजातींची निवड

प्रोपोलिस (रोंगण)

मानवी आरोग्यासाठी प्रोपोलिस हे अत्यंत उपयुक्त आहे.

सौंदर्य प्रसाधने, दंत औषधी, दंतमंजने यांच्या निर्मितीमध्ये वापर.

जखमा लवकर भरण्यासाठी फायदेशीर.

खोकला, घसा खवखवणे, तोंड उभरणे यावर गुणकारी.

त्वचेच्या आजारांवर उपयुक्त.

संधिवात, क्षयरोग व कर्करोग यावर उपयुक्त.

रॉयल जेली

रॉयल जेली म्हणजेच राजान्न. हे कामगार (कामकरी) मधमाश्यांच्या तोंडातील ग्रंथीद्वारे स्रवणारा पदार्थ आहे. रॉयल जेली फक्त राणीमाशीला खाद्य म्हणून दिले जाते. रॉयल जेली हे मधमाशी व मानवी आरोग्यासाठी पोषक असते.

फायदे

भूक आणि शक्तिवर्धक.

त्वचेचे आरोग्य राखण्यासाठी उपयुक्त आहे.

रॉयल जेलीच्या संतुलित सेवनामुळे हृदय विकाराचे उत्तम राखले जाते.

सौंदर्य प्रसाधने, औषध निर्मितीमध्ये वापर.

कर्करोगास प्रतिबंध करण्यासाठी उपयुक्त आहे.

रोग प्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी उत्तम.

शरीरातील कोलेस्ट्रेरॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास उपयुक्त.

यामध्ये जीवनसत्त्व ब-५, ब-६, आणि अ‍मिनो आम्ल व शारीरिक क्षमता वाढविणारे घटक मुबलक प्रमाणात असतात.

शरीरातील पेशींचा नाश होत नाही.

स्नायू बळकट होण्यास मदत होते.

बी व्हेनम

बी व्हेनम म्हणजेच मधमाशीचे विष होय. याचा दमा, संधिवात, शरीरातील गाठी, उच्च रक्तदाब, रक्ताच्या गुठळी, गर्भाशयातील गाठी, स्नायूंचा अशक्तपणा/ कमजोरी, त्वचा विकार, शरीर व अवयवांची वाढ खुंटणे, मज्जातंतू, नसांचे विकार अशा अनेक विकारांच्या उपचारात वापर केला जातो.

- डॉ. प्रमोद मगर, ७७५७०८१८८५

(कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com