Ishanya Foundation : ईशान्‍य फाउंडेशनकडून घरपोच आरोग्यसेवेसाठी मोबाइल क्लिनिक

Mobile Clinic for Healthcare : ईशान्‍य फाउंडेशन (IsFon) या सीएसआर शाखेने मंगळवारी (ता. ९) तळोजा परिसरातील ४१ गावांतील स्थानिकांना आरोग्य सेवा उपलब्ध करण्यासाठी मोबाइल क्लिनिक सादर केले.
Mobile Clinic for Healthcare
Mobile Clinic for HealthcareAgrowon

Navi Mumbai : दीपक फर्टिलायजर्स अॅण्‍ड पेट्रोकेमिकल्‍स कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (डीएफपीसीएल) ईशान्‍य फाउंडेशन (IsFon) या सीएसआर शाखेने मंगळवारी (ता. ९) तळोजा परिसरातील ४१ गावांतील स्थानिकांना आरोग्य सेवा उपलब्ध करण्यासाठी मोबाइल क्लिनिक सादर केले.

वैद्यकीय टीमसह संपूर्णपणे प्रमाणित व सुसज्‍ज असे हे मोबाइल क्लिनिक लोकांना‍ प्रतिबंधात्मक व उपचारात्‍मक आरोग्‍यसेवा देईल. त्याच प्रमाणे फाउंडेशनतर्फे देवीचापाडा येथे एनडीसी पॅथॉलॉजी डायग्नोस्टिक प्रायव्‍हेट लिमिटेडच्या सहयोगाने ‘ईशान्‍य पॅथोलॉजी सॅम्‍पल कलेक्‍शन सेंटर’ही सुरू केले आहे. त्यातून विविध चाचण्यांवरील खर्चात ८० ते ९० टक्क्यांपर्यंत बचत होईल.

Mobile Clinic for Healthcare
Ayodhya Ram Mandir : पुन्हा यावे मानवतावादी रामराज्य

या गेल्या मोबाइल क्लिनिक आणि सॅम्‍पल कलेक्‍शन सेंटरचे उद्घाटन प्रसंगी बोलताना ईशान्‍य फाउंडेशनच्‍या संस्‍थापक-विश्‍वस्‍त श्रीमती पारूल मेहता म्‍हणाल्‍या, की सर्वसामान्यांसाठी आरोग्याची दर्जेदार आणि घरपोच सेवा पोहोचविण्यासाठी आमची संस्था फाऊंडेशनच्‍या आरोग्‍यम उपक्रमांतर्गत कटिबद्ध आहे. सामुदायिक आरोग्‍यामध्ये असलेली विषमता कमी करण्यासाठी आम्ही काम करत राहू.

या प्रसंगी डॉ. संतोष थिटे, प्रादेशिक अधिकारी एमआयडीसी (महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ), पनवेल; डॉ. विक्रांत भालेराव, उपप्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी), बेलापूर, नवी मुंबई; अविनाश काळदाते, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, पोलिस स्टेशन, तळोजा; पांडुरंग लांडगे, अध्यक्ष – कमर्शिअल अँड स्ट्रॅटेजिक ग्रोथ, डीएफपीसीएल; दिनेशप्रताप सिंग, ईव्हीपी - ऑपरेशन्स, डीएफपीसीएल हे उपस्थित होते.

Mobile Clinic for Healthcare
Nagaland Culture : नागालँड : शेती, माती, संस्कृतीचा समृद्ध ठेवा

ईशान्य फाउंडेशनची समाजोपयोगी कामे

गेल्या आर्थिक वर्षामध्‍ये IsFon ने १२,३५२ रूग्‍णांची मोफत आरोग्‍य तपासणी व औषधे पुरवली आहेत.

लक्ष्‍मी चॅरिटेबल ट्रस्‍ट पनवेलसोबत सहयोगाने ईशान्‍य फाउंडेशनने नुकतेच पाले खुर्द व परिसरातील पाच गावांमध्‍ये डोळे तपासणी शिबिरांचे आयोजन केले होते. त्यात तपासणी झालेल्या ९८८ व्‍यक्‍तींपैकी ३०४ व्‍यक्‍तींना मोतीबिंदू असल्‍याचे निदान झाले. त्यातील १९८ व्‍यक्‍तींवर यशस्‍वीरित्‍या मोतीबिंदू शस्‍त्रक्रिया करण्‍यात आल्‍या. अन्य दृष्टीदोषांचे निदान झालेल्‍या ४१३ व्‍यक्‍तींना चष्‍मे देण्‍यात आले.

या उपक्रमातून वालाप येथील आरोग्‍य उपकेंद्राला आवश्यक विविध उपकरणे दिली.

तळोजा परिसरातील २० अंगणवाड्यांना प्रत्येकी एक कपाट आणि वजनकाटे दिले.

वावंजे, कळंबोली आणि खारघर भागातील २०० क्षय रुग्णांना सहा महिन्यांसाठी पोषण साह्य पुरवले.

गेल्या १६ वर्षांपासून ईशान्‍य फाउंडेशनने महिला सक्षमीकरणावर लक्ष केंद्रित केले असून, त्यामध्ये दुग्ध व्यवसाय विकास, आरोग्य, व्यावसायिक प्रशिक्षण आणि उत्पादने निर्मिती उपक्रम सुरू केले आहेत.

ईशान्‍य फाउंडेशनच्या सामुदायिक विकास उपक्रमांमध्ये गेल्या आर्थिक वर्षात (२०२३-२४) मध्ये विविध योजनांद्वारे एकूण १४,९९४ लोकांना लाभ पोहोचवला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com