CSR : पुणे ः देशात खतनिर्मिती क्षेत्रात नामांकित उद्योगसमूह म्हणून दीपक फर्टिलायझर्स ॲण्ड पेट्रोकेमिकल्स कार्पोरेशन लिमिटेडची ओळख आहे. या समूहाशी संलग्न स्वयंसेवी संस्था ईशान्य फाउंडेशन यांच्या वतीने देशातील एकमेव असा एक वर्ष कालावधीचा ‘पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्रॅम इन ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट’ या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम शुल्काच्या ५० टक्के रक्कम सीएसआर उपक्रमांतर्गत देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत नुकताच करार करण्यात आला.
‘सकाळ माध्यम समूह’ व ‘ॲग्रोवन’ संलग्न कौशल्य विकास संस्था ‘एसआयआयएलसी’ तर्फे गेल्या ९ वर्षांपासून पदवीधर विद्यार्थ्यांसाठी ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट हा अभ्यासक्रम चालविला जातो. इंडस्ट्रींच्या कुशल मनुष्यबळाच्या गरजांवर आधारित हा अभ्यासक्रम आहे. यात विद्यार्थी ६ महिने इंडस्ट्रींसोबत इंटर्नशिपद्वारे कामाचा अनुभव घेतात. याचा फायदा त्यांना नोकरीसाठी तसेच स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी होतो. या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी दरवर्षी अनेक विद्यार्थी इच्छुक असतात, परंतु त्यातील अनेक विद्यार्थी आर्थिक परिस्थितीअभावी प्रवेश घेऊ शकत नाही.
दीपक फर्टिलायझर्सच्या ईशान्य फाउंडेशनतर्फे सामाजिक बांधिलकीतून विविध उपक्रम राबविले जातात. याचाच भाग म्हणून कृषी क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या ग्रामीण विद्यार्थ्यांना सहकार्य करण्याच्या हेतूने मागील दोन वर्षांपासून फाउंडेशनचे सहयोगी संचालक प्रमोद जगताप यांनी या अभ्यासक्रमाचा पाठपुरावा केला. अभ्यासक्रम पूर्ण करून नोकरी मिळालेल्या तसेच व्यवसाय सुरू केलेल्या विद्यार्थ्यांबरोबर बोलून त्यांनी याची शहानिशा केली. याआधारे या वर्षी अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या गरजू १० विद्यार्थ्यांचे ५० टक्के शुल्क ईशान्य फाउंडेशनाच्या सीएसआर उपक्रमांतर्गत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अभ्यासक्रमाविषयी तसेच प्रवेश प्रक्रियेसंबंधी सविस्तर माहितीसाठी संपर्क ः ८६६९६८९०१५,
संकेतस्थळः www.siilc.edu.in/abm/
ग्रामीण भागातील अनेक युवक-युवती शिक्षण घेऊनही पुरेशा कौशल्यांअभावी बेरोजगार राहतात. त्यांच्यात कौशल्य निर्माण करून त्यांना योग्य रोजगार उपलब्ध होऊ शकतो. ‘एसआयआयएलसी’च्या एबीएम अभ्यासक्रमाद्वारे हे शक्य होत असून, ग्रामीण पदवीधरांना चांगला पर्याय मिळत आहे. त्यामुळे सीएसआरअंतर्गत निधीसाठी आम्ही या अभ्यासक्रमाची निवड केली. या उपक्रमासाठी अनेक उद्योगसमूह पुढे येऊन योगदान देऊ शकतात.
- श्रीमती पारूल मेहता, विश्वस्त, ईशान्य फाउंडेशन, संचालक, दीपक फर्टिलायझर्स ॲण्ड पेट्रोकेमिकल्स कार्पोरेशन लि., पुणे
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.