Drought Condition : आमदार शिंदेंनी जाणून घेतल्या मंगळवेढ्याच्या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या समस्या

Farmer Issue : मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी भागातील गावांचा आमदार प्रणिती शिंदे यांनी गावभेट दौरा केला. या दौऱ्यामध्ये पिण्याच्या पाण्याचे टँकर व जनावरांच्या चारा छावणीबाबतच्या समस्या जाणून घेतल्या.
Praniti Shinde
Praniti ShindeAgrowon
Published on
Updated on

Solapur News : मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी भागातील गावांचा आमदार प्रणिती शिंदे यांनी गावभेट दौरा केला. या दौऱ्यामध्ये पिण्याच्या पाण्याचे टँकर व जनावरांच्या चारा छावणीबाबतच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच शेतकऱ्यांच्या अन्य अडचणींबाबतही त्यांच्याशी त्यांनी संवाद साधला.

मंगळवेढा तालुक्यातील अनेक गावांमध्ये टँकर व जनावरांकरिता चारा छावणी चालू करण्याबद्दल मागणी होत आहे, त्या पार्श्वभूमीवर आमदार शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली. दौऱ्याच्या सुरुवातीलाच काही गावांतील मराठा समाजाने आरक्षणप्रश्नी विरोध केला, मात्र नंतर या दौऱ्यात त्यांना प्रतिसाद पाहायला मिळाला.

Praniti Shinde
Chief Minister Eknath Shinde : 'मी, उंटावरून शेळ्या हाकणारा मुख्यमंत्री नाही': मुख्यमंत्री शिंदे

मंगळवेढ्यातील दुष्काळी भागातील पाठकळ-मेटकरवाडी, खडकी, नंदेश्वर, भोसे, महमदाबाद हुन्नूर, लोणार, पडोळकरवाडी, रेवेवाडी, मानेवाडी, हुन्नूर, मारोळी, चिक्कळगी, शिरनांदगी, रड्डे, सिद्धनकेरी, जालीहाळ, हाजापूर या गावांना त्यांनी भेटी दिल्या. या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची व जनावरांकरिता चाऱ्याची भीषण टंचाई निर्माण झालेली पाहायला मिळाली.

Praniti Shinde
Amit Shaha : डेटाबेसचा सहकार क्षेत्राला फायदा: अमित शाह|सांगलीतून आंतर जिल्हा चारा वाहतूक बंद | राज्यात काय घडलं?

या वेळी आमदार शिंदे म्हणाल्या, की सोलापूर जिल्ह्यातील एकमेव विरोधी पक्षाची मी आमदार आहे. आजपर्यंत इतर कोणाच्याही मतदार संघात हस्तक्षेप केला नाही. पण मंगळवेढा तालुक्याच्या दुष्काळग्रस्तांच्या अडचणी ज्या वेळी समोर आल्या, त्या वेळी आपल्या पद्धतीने सोडविण्यासाठी प्रयत्न केला आणि यापुढेही करत राहणार असे सांगितले.

दरम्यान, नागरिकांच्या विविध प्रश्नांवर त्यांनी संबंधित अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावून समस्या सोडविण्याची मागणी केली. या वेळी त्यांच्यासमवेत ज्येष्ठ नेते शिवाजीराव काळुंगे, तालुका अध्यक्ष प्रशांत साळे, नंदकुमार पवार, अभिजित पाटील, मनोज यलगुलवार, विनोद भोसले, रविकिरण कोळेकर, पांडुरंग जावळे आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com