Chief Minister Eknath Shinde : 'मी, उंटावरून शेळ्या हाकणारा मुख्यमंत्री नाही': मुख्यमंत्री शिंदे

Bamboo Valuation Centre : सातारा जिल्ह्यातील पाटण येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बांबू मूल्यवर्धन केंद्र आणि टसर रेशीम शाश्वत रोजगार व वनसंवर्धन प्रकल्पाचे लोकार्पण केले.
Chief Minister Eknath Shinde
Chief Minister Eknath ShindeAgrowon

Pune News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी (ता. ०९) विरोधकांवर जोरदार टीका करताना, 'मी, (मुख्यमंत्री) उंटावरून शेळ्या हाकणारा नाही, असं म्हटले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी, दरे (ता. महाबळेश्वर) येथे साकारण्यात आलेल्या बांबू मूल्यवर्धन केंद्र आणि टसर रेशीम शाश्वत रोजगार व वनसंवर्धन प्रकल्पाचे लोकार्पण केले. तसेच मुनावळे (ता. जावळी) येथील महत्त्वाकांक्षी जलपर्यटन प्रकल्पाचे भूमिपूजनासह शिद्रुकवाडी येथील दरडग्रस्‍त गावांच्या पुनर्वसन कामाचा प्रारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी, सोन्याच्या चमचा घेऊन ज्यांचा जन्म झाला, त्यांनाच मुख्यमंत्री होण्याचा अधिकार आहे का? असा सवाल केला आहे. तसेच, 'मी सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबातला असल्यानेच मला तुमचे दुःख आणि वेदना कळतात. म्हणून मी २४ तासातील १८ तास काम करतो. माझ्या कामातून विरोधकांच्या टीकांना उत्तर देतो. मी सर्वसामान्यांमध्ये, शेतकऱ्यांच्या बांधावर जातो. लोकांच्या अडी अडचणीत जातो, कुठे आपत्ती आली तेथे जातो असे, मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे.

Chief Minister Eknath Shinde
CM Eknath Shinde : शेतकऱ्यांच्या पाणीपट्टीत कपात तर यंत्रमाग धारकांसाठी वीज सवलत, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना

मुख्यमंत्री शिंदे यांनी, 'राज्यात बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना' सुरू केलेत. आधी तो मुंबईत सुरू करण्यात आला. आता राज्यात ७०० ठिकाणी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाने सुरू झाले आहेत. यामुळे अनेक लोकांना फायदा होत आहे. तर जनतेवर उपचार मोफत व्हावे म्हणून १.५ लाखांच्या विम्याची मर्यादा वाढवून ५ लाखांची केली आहे. यातील अटी शर्ती काढून टाकल्या आहेत. यामुळे आता या उपक्रमाचा फायदा १२.५ कोटी जनतेला होत असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे.

विरोधकांना टोला

'शिक्षण, आरोग्य पर्यटन क्षेत्रात पायाभूत सुविधा देण्याचे काम राज्य सरकार करत आहे', असे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले असून 'सर्व सामान्यांच्या दुःखात हे सरकार धावून जाणारे आहे. हे सरकार सर्व सामान्यांचे आहे'. 'मी मुख्यमंत्री असलो तरी तसे मी मानत नाही. मी जमीनीवर चालणारा आहे. मी स्वत:ला कॉमन मॅन मानतो. उंटावरून शेळी हाकणारा मी मुख्यमंत्री नाही', असा टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांना लगावला आहे.

आशा सेविकांना न्याय

तर यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी, 'अंगनवाडी सोविकांचे प्रश्न मार्गी लावले असून आता हे सरकार आशा सेविकांना न्याय देईल. त्यांना निराश करणार नाही', असे म्हटले आहे. तसेच, यावेळी राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना नव्या इनोव्हा आणि तहसिलदार यांना स्कारपियो गाड्या देण्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली.

Chief Minister Eknath Shinde
CM Eknath Shinde : कोल्हापुरात मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला दाखवले काळे झेंडे, शेतकरी संघटना आक्रमक

ग्रामस्थांना चांगली घरे

रायगडच्या खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी येथे दरड कोसळल्याने अख्ख गावं मलब्याखाली गाडलं गेले होते. यावरून मुख्यमंत्री शिंदे यांनी, 'जसे इर्शाळवाडीतील ग्रामस्थांना चांगली घरे बांधून दिली आहेत. तशीच घरे इतर घटकांना द्या', अशी अपेक्षा अधिकाऱ्यांकडे व्यक्त केली आहे. 

महामंडळांत सामंजस्य करार

सामंजस्य करार मुनावळे (ता. जावळी) येथील महत्त्वाकांक्षी जलपर्यटन प्रकल्प विकसीत करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्या सूचनेनुसार कृष्णा खोरे विकास महामंडळ आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळांत सामंजस्य करार झाला आहे. तर या करारासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पाठपुरावा केला होता. 

जागतिक दर्जाचा जलपर्यटन प्रकल्प

जागतिक दर्जाचा जलपर्यटन प्रकल्प कोयना धरणापासून उत्तरेस सुमारे ४० किलोमीटर अंतरावर शिवसागर जलाशयात मुनावो येथे हा जागतिक दर्जाचा नावीन्यपूर्ण जलपर्यटन प्रकल्प विकसित करण्यात येत आहे. या प्रकल्पावर ४५ कोटी खर्च अपेक्षीत आहे. तर येथे पर्यटकांसाठी बोट क्लब, हाऊस बोट, स्कुबा डायव्हिंग, जेट स्की यासारख्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या प्रकल्पात जलपर्यटन आणि जलक्रीडा यांचाही समावेश असेल. नदी जलाशयावर होणारा देशातील हा पहिलाच प्रकल्प असून याला जागतिक दर्जाचा जलपर्यटन प्रकल्प करण्याचा मानस मुख्यमंत्री शिंदे यांचा आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com