

Jalna News : बदनापूर, जि. जालना : पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना ही केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी राबविलेली अत्यंत महत्त्वाची योजना आहे. या योजनेमुळे देशातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा मोठा आधार मिळत असल्याचे मत बदनापूर-अंबड विधानसभा मतदार संघाचे आमदार नारायणराव कुचे यांनी व्यक्त केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या १९ व्या हप्त्याचे वितरण बिहार राज्यातील भागलपूर शहरातून झाले. या कार्यक्रमाचे ऑनलाइन प्रणालीचा वापर करून थेट प्रक्षेपण सोमवारी (ता. २४) कृषी विज्ञान केंद्र, बदनापूर यांच्या वतीने करण्यात आले त्या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून श्री. कुचे बोलत होते.
कृषी महाविद्यालय बदनापूरचे सहयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्य डॉ. राकेश अहिरे, कृषी संशोधन केंद्र प्रभारी अधिकारी डॉ. के. टी. जाधव, तालुका कृषी अधिकारी जी. एम. गुजर, केव्हीकेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. एस. डी. सोमवंशी यांची विशेष उपस्थिती होती. या कार्यक्रमात बदनापूर व परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. सी. एस. सी राज्य सल्लागार गणेश कान्हेरे यांनी समूह शेतीतून समृद्धीकडे वाटचाल या विषयावर मार्गदर्शन केले.
कृषी विज्ञान केंद्राच्या अधिकाऱ्यांनी पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या लाभांविषयी उपस्थितांना अवगत केले. तसेच, शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसंबंधित अडचणींवर उपाययोजना व आधुनिक शेतीविषयक माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाचे औचित्य साधून कृषी क्षेत्रात भरीव कामगिरी करणारे प्रगतिशील शेतकरी शौकत महंमद शेख, सुदाम वैद्य, नंदू वैद्य, हिराबाई शिंदे, बद्रीनाथ शिंदे, रुस्तुम सिरसाट, मांजराम घाडगे, कृष्णा घाडगे, मनोज मुंजाळ, योगेश्वर राऊत, पंडितराव टेपले, नागेश्वर गायकवाड, चंद्रकांत गावंडे,
ब्रह्मनंद दळवी, शरद चव्हाण, किशोर चव्हाण, राजेंद्र सिनगारे, रामनाथ काळे, बापू अंधारे आणि अजय गायकवाड यांना सन्मान चिन्ह आणि प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. सूत्रसंचालन कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. आर. एल. कदम यांनी केले. आभार कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एस. डी. सोमवंशी यांनी मानले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.