Pradhan Mantri Samman Nidhi Yojana : जाफराबादमध्ये सन्मान निधीपासून चार हजार शेतकरी वंचित

Agriculture Department : प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेअंतर्गत जाफराबाद तालुक्यात जवळपास ३४ हजार शेतकऱ्यांना निधीचा लाभ मिळाला; परंतु शेतकऱ्यांकडून कृषी विभागामार्फत ई-केवायसी केल्यानंतर अनेक शेतकऱ्यांचे लाभ बंद झाले आहेत.
Pradhan Mantri Samman Nidhi Yojana
Pradhan Mantri Samman Nidhi YojanaAgrowon
Published on
Updated on

Jafarabad News : जाफराबाद : प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेअंतर्गत जाफराबाद तालुक्यात जवळपास ३४ हजार शेतकऱ्यांना निधीचा लाभ मिळाला; परंतु शेतकऱ्यांकडून कृषी विभागामार्फत ई-केवायसी केल्यानंतर अनेक शेतकऱ्यांचे लाभ बंद झाले आहेत. सद्यःस्थितीत फक्त पंधरा हजार शेतकऱ्यांच्या खात्यावरच रक्कम जमा झाली आहे.

उर्वरित चार हजार २०० शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा नसल्याने संबंधितांनी परिपूर्ण प्रस्ताव दाखल करण्याची गरज आहे. दरम्यान, ज्या शेतकऱ्यांची नावे यादीमध्ये आहेत, त्यांना पूर्ण प्रस्ताव देण्याची आवश्यकता नसल्याचे कृषी विभागाने सांगितले.

Pradhan Mantri Samman Nidhi Yojana
Pradhan Mantri Kisan Samman Yojana : गोंदियात अडीच लाख शेतकऱ्यांना वर्षाला मिळणार १२ हजार रुपये

जाफराबाद तालुक्यामध्ये जवळपास ३४ हजार शेतकऱ्यांची नोंदणी प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेसाठी करण्यात आली होती. पंधराव्या टप्प्यापर्यंत यामध्ये तीस हजार शेतकरी राहिले होते. सद्यःस्थितीत सतरावा हप्ता शेतकऱ्यांना देण्यात आला आहे. यामध्ये जवळपास १५ हजार शेतकऱ्यांच्या खात्यातच रक्कम जमा झाली आहे. उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे; तसेच अनेक कारणांमुळे त्रुटीत असलेले जवळपास ४२०० शेतकरी सद्यःस्थितीत निकषात बसत नाहीत. निकषात समाविष्ट नसलेल्या शेतकऱ्यांच्या याद्याच कृषी विभागाने व्हायरल केल्या आहेत. या यादीमध्ये नाव असलेल्या शेतकऱ्यांनी प्रस्तावाची पूर्तता करावी, अन्यथा त्यांचे खाते कायमस्वरूपी बंद करण्याची प्रक्रिया शासनाच्या वतीने सुरू करण्यात आली आहे.

सन्मान निधीअंतर्गत पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना अपात्र ठरविण्यासाठी शासनाने निकष जाहीर केले आहेत. या निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांनी सात दिवसांच्या आत आपला प्रस्ताव दाखल करावा, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले.

जाफराबाद तालुक्यामध्ये पूर्वी ३४ हजार शेतकरी पीएम किसान योजनेचा लाभ घेत होते. दरम्यान, सद्यःस्थितीत १५ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झाली असून, उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यादीमध्ये नाव नसलेल्या व एक फेब्रुवारी २०१९ पूर्वी फेरफार केलेल्या शेतकऱ्यांनी नव्याने प्रस्ताव दाखल करू शकतात. दरम्यान, निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांचे खाते बंद करण्यात येणार आहे.

- अमोल शिंदे, तालुका कृषी अधिकारी, जाफराबाद

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com