Gram Panchayat Election : नांदेडला कॉँग्रेस, भाजपला संमिश्र यश

Gram Panchayat Election Result : जिल्ह्यात १९ ग्रामपंचायती आणि २५ ग्रामपंचायत पोटनिवडणुकीचे निकाल सोमवारी (ता. सहा) जाहीर झाले. त्यात मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार कॉँग्रेस आणि भाजपाला संमिश्र यश मिळाले आहे.
Election
ElectionAgrowon

Nanded News : जिल्ह्यात १९ ग्रामपंचायती आणि २५ ग्रामपंचायत पोटनिवडणुकीचे निकाल सोमवारी (ता. सहा) जाहीर झाले. त्यात मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार कॉँग्रेस आणि भाजपाला संमिश्र यश मिळाले आहे. तर काही ठिकाणी स्थानिक आघाड्यांचा विजय झाला आहे. अद्याप कोणत्याच पक्षाने आपल्याला किती जागा मिळाल्या याचा दावा केला नाही त्यामुळे काही जागांबाबत संभ्रम आहे.

जिल्‍ह्यातील जानेवारी ते डिसेंबर २०२३ कालावधीत मुदत संपणाऱ्या १९ ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक व २५ जागेवर पोटनिवडणुकीसाठी रविवारी (ता. सहा) मतदान आणि सोमवारी (ता. सहा) मतमोजणी झाली. जिल्ह्यातील २५ ग्रामपंचायतीपैकी प्रत्यक्ष १९ ग्रामपंचायतीची निवडणूक झाली. १९ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी ५४ मतदान केंद्रावर ८१.३७ टक्के मतदान झाले. एकूण २५ ग्रामपंचायतीमध्ये सहा बिनविरोध निघाल्या आहेत.

Election
Kolhapur Rabi Season : कोल्हापूर जिल्ह्यात रब्बीचा हंगाम धोक्यात फक्त १५ टक्के पेरण्या, अनेक तालुक्यात भीषण परिस्थिती

नायगाव तालुक्यातील लालवंडी ग्रामपंचायतीत नऊ जागेसाठी झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे भगवान लंगडापुरे यांच्या गटाने सरपंचासह आठ जागेवर विजय मिळवत एकतर्फी सत्ता हस्तगत केली आहे. चुरशीच्या निवडणुकीत त्यांनी ग्रामपंचायत ताब्यात घेतली. यावेळी नोटाला ४१ मते पडली आहेत.

अर्धापूर, तालुक्यातील दोन ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीचा कौल काँग्रेसच्या बाजूने लागला असून लोणी खुर्द येथील प्रभाग क्रमांक तीन मधून प्रसेनजीत राजेश लोणे हे विजयी झाले आहेत. दाभड ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत संगिता दीपक दादजवार या निवडून आल्या आहेत.

Election
Agriculture Input Act : नवीन प्रस्तावित निविष्ठा कायदा विधेयकाबाबत मार्ग काढू

देगलूर तालुक्यातील मरतोळी ग्रामपंचायत प्रथमच गावकऱ्यांनी नव तरुणांच्या हाती सोपवली आहे. काँग्रेसप्रणीत युवकांचा जास्त समावेश आहे. अंबुलगा ग्रामपंचायतीमध्ये ही फेरबदल होऊन काँग्रेसप्रणीत नवे पॅनल सत्तेवर आले आहे. तर गोगला गोविंद तांडा येथेही बदल झाला असून थेट बीआरएसप्रणित सरपंचपदासाठी अमोल चव्हाण हे विजयी झाले आहेत.

हदगाव तालुक्यात लोहा (ता. हदगाव) येथील ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदी रेखा कौशल्ये यांनी दणदणीत विजय मिळवला असून तळ्याचीवाडी येथे संगीता डोखळे यांनी तर गवतवाडी येथे राजेश खोकले यांच्या गळ्यात सरपंचपदाची माळ पडली आहे. लोहा आणि गवतवाडी येथे कॉँग्रेसप्रणित तर तळ्याची वाडी येथे संमिश्र यश आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com