Kolhapur Rabi Season : कोल्हापूर जिल्ह्यात रब्बीचा हंगाम धोक्यात फक्त १५ टक्के पेरण्या, अनेक तालुक्यात भीषण परिस्थिती

Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यातील दोन तालुक्यामध्ये राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे. दरम्यान जिल्ह्यात रब्बी हंगाम सुरू झाला.
Kolhapur Rabi Season
Kolhapur Rabi Seasonagrowon

Kolhapur Agriculture News : कोल्हापूर जिल्ह्यातील दोन तालुक्यामध्ये राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे. दरम्यान जिल्ह्यात रब्बी हंगाम सुरू झाला आहे परंतु अत्यंत कमी क्षेत्रावर पेरणी झाल्याने यंदा रब्बी हंगामाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

आतापर्यंत जिल्ह्यात रब्बीची पेरणी २१ हजार हेक्टर क्षेत्रापैकी केवळ ३२५४ हेक्टरवर झाली आहे. याची टक्केवारीत मोजणी केल्यास फक्त १५ टक्केच पेरा झाला आहे. राधानगरी, गगनबावडा तालुक्यात एक टक्काही पेरणी झाली नसल्याने भीषण परिस्थिती आहे. तर चंदगड, भुदरगड, शाहूवाडी, शिरोळ तालुक्यात जेमतेम ४-५ टक्केच पेरणी झाली आहे.

अल निनोच्या स्थितीमुळे खरीप हंगामात यंदा अत्यल्प पाऊस झाला. दरम्यान कमी जास्त पावसाने मात्र जिल्ह्यातील काळम्मावाडी वगळता सर्वच धरणे १०० टक्के भरली आहेत. परंतु उन्हाळ्यातील नियोजनाचा विचार केल्यास रब्बीचा पेरा धोक्यात आला आहे, येत्या आठ-दहा दिवसात पाऊस झाला तरच पेरणी होऊ शकेल अन्यथा यंदा जमिनी पडून राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Kolhapur Rabi Season
Maharashtra Drought Condition : दुष्काळग्रस्त ४० तालुके सोडून राज्य सरकारचा अन्य तालुक्यांना दिलासा

यंदा जुलै महिन्यात फक्त पाऊस झाला तर शेतकरी परतीच्य पावसावर विसंबून राहिला होता परंतु यंदा परतीचा पाऊस झालाच नाही, त्यामुळे खरीप वाया गेले. याचा सर्वाधीक फटका भात, भुईमुगाला बसला. माळरान व डोंगरमाथ्यावर खरीप काढणीनंतर त्याच ओलीवर ज्वारी, हरभरा, मक्याची पेरणी केली जाते; मात्र यंदा पाऊस नसल्याने जमिनी पडीक राहण्याची शक्यता आहे. दरम्यान हवामान खात्याने नोव्हेंबरच्या ११ ते १५ तारखेदरम्यान पाऊस होईल, असा अंदाज वर्तवला आहे. या कालावधीत पाऊस झाला तरच पेरण्या होऊ शकणार आहेत.

सगळीकडेच परतीच्या पावसाने फसवल्याने खरीप ज्वारीलाही फटका बसला आहे. त्यातच रब्बी ज्वारीची पेरणीच अद्याप होऊ न शकल्याने आगामी काळात ज्वारी महागणार हे निश्चित आहे. हातकणंगले तालुक्यात रब्बीचे सर्वाधिक ६०१५ हेक्टर क्षेत्र आहे. तिथे १२०७ हेक्टरवर (२० टक्के) पेरणी झालेली आहे. त्यापाठोपाठ आजरा तालुक्यात ९५ पैकी १५ हेक्टर आणि करवीरमध्ये १७७५ पैकी २६२ हेक्टर पेरणी झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com