Mitra Sadhana Education Board : मित्र साधना शिक्षण प्रसारक मंडळ : कृषी शिक्षणाची चळवळ

Agricultural Education : डॉ. गंगाधरराव पाथ्रीकर एक अग्रगण्य कृषी महाविद्यालय
Mitra Sadhana Education Board
Mitra Sadhana Education BoardAgrowon
Published on
Updated on

Mitra Sadhana : शिक्षण क्षेत्रातील नव्या बदलाचा अत्यंत जागरूक व कल्पकतेने स्वीकार करून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्‍यात पाथ्री येथे १९८० मध्ये ‘मित्र साधना शिक्षण प्रसारक मंडळ’ची स्थापना करण्यात आली. या मंडळाने कृषी तंत्र विद्यालय व कृषी महाविद्यालयाच्या माध्यमातून कृषिविषयक ज्ञान, विज्ञान व नवतंत्रज्ञानाची साधना कायम ठेवली आहे. हे मंडळ कृषी शिक्षणाची चळवळ बनले आहे.

मित्र साधना शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष द्वारकाभाऊ पाथ्रीकर यांच्या अथक प्रयत्नाने, तसेच प्राचार्य कै. डॉ. गंगाधर पाथ्रीकर यांच्या संकल्पनेतून १५ डिसेंबर १९८० रोजी मित्र साधना शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करण्यात आली. सुरुवातीला क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम राबवून मंडळाने नावलौकिक मिळविला. पुढे काळानुरूप पंचक्रोशीतील पुढच्या पिढीची शिक्षणाची गरज ओळखून शिक्षणाला प्राधान्य दिले. त्यातूनच पाथ्रीसारख्या ग्रामीण भागात आधी माध्यमिक, उच्च माध्यमिक त्यानंतर विविध शाखांमधील महाविद्यालय, मराठी व इंग्रजी माध्यमाचे प्राथमिक शिक्षण, कृषी तंत्र निकेतन, अध्यापक विद्यालय, कृषी महाविद्यालय, कॉलेज ऑफ डी. फार्मसी, बी. फार्मसी व कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अशी व्यावसायिक अभ्यासक्रमांची सोय करण्यात आली आहे.

मुलींच्या शिक्षणाची झाली सोय...
बारावीनंतर पुढे काय हा प्रश्‍न विद्यार्थ्यांसमोर होताच. विशेषत: मुलींचे शिक्षण थांबू नये म्हणून वरिष्ठ महाविद्यालय सुरू का करू नये, असा विचार मित्र साधना शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष द्वारकाभाऊ पाथ्रीकर यांच्या मनात आला. त्यांच्या प्रयत्नातून २००१ मध्ये महाविद्यालय सुरू झाले. परिसरातील अनेक मुली पदवी व त्यापुढचेही शिक्षण घेत आहेत.

महत्त्वाचे विषय ः
-मुक्त विद्यापीठ अंतर्गत मराठी, हिंदी, इंग्रजी या विषयांसाठी पदव्युत्तर एम.ए.
-२०१८-१९ पासून गणित विषयासाठी पदव्युत्तर एम.ए.
-२०१८-१९ पासून विज्ञान शाखेत रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, विषयासाठी पदव्युत्तर एम.एस.सी.
- यूजीसी अंतर्गत वाणिज्य व संगणक क्षेत्रातील बी. होक हा अभ्यासक्रम

Mitra Sadhana Education Board
Vipassana Sadhana : जगण्याची कला...विपश्यना साधना

कृषी तंत्रज्ञानाचा वाढविला जागर...
२००६ मध्ये पाथ्री येथे डॉ. गंगाधर पाथ्रीकर कृषी तंत्र विद्यालय सुरू झाले. शेतकऱ्यांच्या मुलांना शेतीतील नवतंत्र कळले, तर त्याच्या कुटुंबातील शेतीची वाट सुकर होण्यास मदत होईल हा त्यामागील हेतू. अर्थात, स्थापनेपासून आतापर्यंत अनेक शेतकरी कुटुंबातील अनेक होतकरू मुलांनी येथे शेतीचे नवे तंत्र आत्मसात केले आहे.

संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र पाथ्रीकर यांच्या प्रयत्नातून २०१५-१६ पासून कृषी महाविद्यालय सुरू झाले. ग्रामीण भागातच अत्याधुनिक सोयीयुक्‍त कृषी पदवी अभ्यासक्रम वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीअंतर्गत सुरू केला. मित्र साधना शिक्षण मंडळाने कृषी ज्ञानाची गरज ओळखून केलेल्या प्रयत्नामुळे २०१९ मध्ये मूल्यांकन समितीने महाविद्यालयाला ब दर्जा दिला आहे. त्यामुळे अतिरिक्‍त तुकडी महाविद्यालयाला मिळाली आहे.

जागरूक संचालक मंडळ...
सामाजिक बांधिलकी व समाजाबद्दल दायित्वाची भावना असल्याशिवाय कुठलेही विधायक काम उभे राहत नाही. मित्र साधना शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक उपाध्यक्ष राजेंद्रभाऊ पाथ्रीकर यांचे कल्पक नेतृत्व, समाजाच्या विकासासाठी काम करण्याची तळमळ संस्थेच्या विकासाच्या वाटचाली मागे आहे. संस्थेचे अध्यक्ष द्वारकाभाऊ पाथ्रीकर यांनी ग्रामीण समाजामध्ये
शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.

त्यांच्या विचाराची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी त्यांच्या पत्नी व संस्थेच्या सचिव प्राचार्या सौ. उषाताई पाथ्रीकर अत्यंत खंबीरपणे संस्थेच्या विकासासाठी कार्यरत आहेत. सहसचिव वरुणभय्या पाथ्रीकर, डॉ. अनुपमा पाथ्रीकर, डॉ. रश्‍मी पाथ्रीकर, सौ वर्षा पाथ्रीकर, श्रीमती कल्याणी पाथ्रीकर, डॉ. अनिल वाघ इत्यादी संचालक मंडळातील सदस्यही तितक्‍याच तत्परतेने संस्थेच्या विकासासाठी जागरूक आहेत.

Mitra Sadhana Education Board
Agriculture Education : ‘कृषी शिक्षण व संशोधन’चा अहवाल महिनाभर आधी

यांचेही योगदान नसे थोडे....
पाथ्रीच्या सरपंच सौ. वर्षा राजेंद्र पाथ्रीकर यांच्या रूपाने परिसरातील सार्वजनिक क्षेत्रात महिला नेतृत्व तसेच वरुण पाथ्रीकर यांच्या रूपाने युवा नेतृत्व उदयास येत आहे. त्यांचेही मार्गदर्शन संस्थेला मिळाले आहे.

मित्र साधना शिक्षण प्रसारक मंडळाच्या विविध शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य, मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, यांचा ‘एकच ध्यास संस्थेचा विकास’ हे ध्येय ठरवून सुरू असलेले कार्यही तितकेच महत्त्वपूर्ण आहे. म्हणूनच फुलंब्री तालुका व परिसरातच नव्हे, तर राज्यस्तरावरही या संस्थेने नावलौकिक मिळविला आहे.

विविध शैक्षणीक संस्था व त्यांचे स्थापना वर्ष ः
- राजर्षी शाहू कला, वाणिज्य, विज्ञान, महाविद्यालय, पाथ्री : २००१
- डॉ. गंगाधर पाथ्रीकर कृषी महाविद्यालय, पाथ्री : २०१५
- भागीरथी यशवंतराव पाथ्रीकर कॉलेज ऑफ डी फार्मसी, पाथ्री : २०१५
- उषा द्वारकादास पाथरीकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, डोंगरगाव कवाड : २०१६
- राजर्षी शाहू अध्यापक विद्यालय, पाथ्री : २००८
- डॉ. गंगाधरराव पाथ्रीकर कृषी तंत्रनिकेतन, पाथ्री : २००६


- वरून प्राथमिक शाळा, पाथ्री : २००४
- राजर्षी शाहू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पाथ्री : १९८२
- वरुण इंग्लिश स्कूल, शिवाजीनगर, छत्रपती संभाजीनगर : २००४
- महर्षी विठ्ठल रामजी शिंदे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, देऊळगाव बाजार, ता. सिल्लोड : १९८३
-भागीरथी यशवंतराव पाथ्रीकर कॉलेज ऑफ बी. फार्मसी, पाथ्री : २०१८
- यू. डी. पाथ्रीकर इन्स्टिट्यूट कॉलेज ऑफ मॅनेजमेंट, पाथ्री : २०२२

कृषी महाविद्यालयाचे प्रक्षेत्र ः
डॉ. गंगाधरराव पाथरीकर कृषी महाविद्यालयाच्या नावे ४३.४९ हेक्‍टर जमीन असून, सिंचन व्यवस्था उपलब्ध आहे. महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावर सीताफळ, लिंबू, पेरू, आंबा, जांभूळ, डाळिंब, संत्रा, आवळा, बोर, मोसंबी, चिकू, नारळ, पपई आदींची जवळपास १००० वृक्षांची लागवड केलेली आहे.

प्रक्षेत्रावरील मातृवृक्ष...
डाळिंब (भगवा, सुपर भगवा).. १००
सीताफळ (बालानगर, फुले पुरंदर)... ८५
लिंबू (साई शरबती व फुले शरबती)... ८५
चिकू (कालीपत्ती).... ४५
जांभूळ (कोकण बहाडोली)...४९
पेरू (सरदार)... १०८

कृषी महाविद्यालयाची प्रक्षेत्र रचना ः
- कृषी महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावर ४० गुंठ्यांची प्रत्येकी तीन शेततळी.
- शेडनेट, नर्सरी आणि ग्रीन हाउस.
- व्याख्यान कक्ष, प्रयोगशाळा, वर्कशॉप, प्राचार्य कक्ष, कार्यालय, प्राध्यापक कक्ष, ग्रंथालय, वाचनालय, संगणक कक्ष, कार्यानुभव प्रशिक्षण इमारत, सेमिनार हॉल, भांडारगृह, स्वच्छतागृहे, जनावरांचा गोठा.


- कृषी महाविद्यालयात मुले व मुलींसाठी स्वतंत्र अद्ययावत सर्व सुविधांसह वसतिगृह.
- गोठ्यांमध्ये ४ बैल जोड्या, १५ गाई, १५ म्हशी, ८० शेळ्या- मेंढ्या, ५० कोंबड्या.
- ग्रंथालयात विषयनिहाय क्रमिक पुस्तके, संदर्भीय पुस्तके, कृषी मासिके व संशोधन पुस्तक.
- संगणक प्रणाली, वायफाय सुविधा तसेच मुले व मुलींसाठी स्वतंत्र वाचन कक्ष.
-प्रशिक्षणावर आधारित गांडूळ खत, अझोला, कंपोस्ट, हायड्रोपोनीक्‍स व हवामान वेधशाळा.
- खेळाचे मैदान, कबड्डी, खो-खो, व्हॉलिबॉल, क्रिकेट तसेच इतर खेळांचे साहित्य व जिमखाना.
- स्वतंत्र प्लेसमेंट सेल. त्यामुळे विद्यार्थी वेगवेगळ्या नामांकित कंपन्यांमध्ये रुजू झाले आहेत.


- कृषी विस्तार शिक्षणांतर्गत विद्यार्थी, कर्मचारी व शेतकरी संवाद व मेळाव्यांचे आयोजन.
- ‘रासेयो‘मधून वृक्ष लागवड, प्रभात फेरी, पथनाट्य, ग्रामस्वच्छता, तज्ञांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन, रक्तदान शिबिर.
- विद्यार्थ्यांचा शेतकऱ्यांसोबत असतो प्रत्येक हंगामाच्या कृषी मेळाव्यात सहभाग.
- भाजीपाला लागवड तंत्रज्ञान, गांडूळ खतनिर्मिती व तंत्रज्ञान, हायड्रोपोनिक्‍स व दुग्धजन्य पदार्थ तंत्रज्ञान, कापूस पिकांवरील कीड व नियंत्रण, नामांकित कंपन्यांचे महाविद्यालयीन प्रक्षेत्रावर प्रात्यक्षिक आदीच्या माध्यमातून कृषी विषयक ज्ञानाचा प्रत्यक्ष कार्यानुभव.
---------------------------------
संपर्क ः कृषी महाविद्यालय, पाथ्री. ७४९८५३४४६२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com