स्पेनमधील अल्मेरिया येथील लोला गोमेज फेरॉन यांच्या ग्रीनहाऊस शेतीची काही माहिती आपण कालच्या भागात घेतली. त्यांच्या शेतीची काही वैशिष्ट्ये
उत्पादन, दर (प्रातिनिधिक)
प्लॅस्टिकचे रिसायकलिंग
मातीचे नैसर्गिक निर्जंतुकीकरण मातीचे निर्जंतुकीकरण करण्याची सुलभ, मात्र अत्यंत प्रभावी पद्धत इथले शेतकरी वापरतात. पीक काढणीनंतर ग्रीनहाऊस सर्व बाजूंनी पूर्ण बंद करून दीड-दोन महिने ठेवले जाते. त्यामुळे आतील तापमान ६५ अंश सेल्सिअसपर्यंत जाते. पाणी देऊन माती योग्य प्रमाणात ओलावून घेतलेली असते. संपूर्ण मातीवर प्लॅस्टिकचे आच्छादन केले जाते. उष्णतेमुळे प्लॅस्टिकखालील तापमान ७० ते ७५ अंशांपर्यंत जाते. साहजिकच पाण्याची गरम वाफ होऊन किंवा बाष्पजल प्रक्रिया होऊन मातीतील कीडी-रोगांचे नियंत्रण कोणत्याही रसायनांविना (नैसर्गिकरीत्या) होते. संरक्षित शेतीचा फायदा युरोपात सर्वत्र उन्हाळ्यात भाजीपाला होतो. अल्मेरियात मात्र हिवाळ्यात तो घेत असल्याने प्लॅस्टिकचा उपयोग महत्त्वाचा ठरतो. किडींना रोखण्यासाठी नेटही उपयुक्त ठरते. लोला सांगतात, की ५४ वर्षांत बर्फ पडलेला फारसा अनुभव नाही. एका जानेवारीत बर्फ पडला. सुमारे सात हजार हेक्टर पिके गोठून गेली. फेब्रुवारीत आलेल्या मोठ्या गारपिटीत पंधरा मिनिटांत १२०० हेक्टरवरील ग्रीनहाऊसेस उद्ध्वस्त झाली. मात्र, असे क्वचितच घडते. मेंढ्या शेतात बसवताना ‘हायजेनिक’ पद्धती बहुतांश शेतकरी वनस्पतींचे अवशेष, लेंडीखत यांचा प्रामुख्याने वापर करतात. सेंद्रिय घटकांचा वापर तीन ते चार वर्षांनी होतो. शेतात मेंढ्या बसवण्यासाठी हायजेनिक पध्दती वापरली जाते. यात अनोळखी स्त्रोत न वापरता अोळखीच्या मेंढपाळांकडूनच मेंढ्या आणल्या जातात. त्यांना येथे खुल्या जागेत चरायला सोडले जात नाही. कारण त्याद्वारे ग्रीनहाऊसमध्ये दूषित घटकांचा संसर्ग होण्याची भीती असते. म्हणून शेतात बसवण्याच्या आदल्या दिवशी त्यांना बंद खोलीत ठेवले जाते. तेथेच संरक्षित खाद्य दिले जाते. ‘व्हाईट व्हॉश’चा वापर फेबुवारी-मार्च ते सप्टेंबर या काळात पॉलिहाऊसला "व्हाइटवॉश (विशिष्ट रसायनाचे पांढरे कोटिंग) केले जाते. त्यामुळे बाहेरील व आतील तापमानात १० ते १२ अंश सेल्सिअसचा फरक पडू शकतो, असे लोला म्हणाल्या. हिवाळ्यात पिकांना सूर्यप्रकाशाची अधिक गरज असल्याने हे कोटिंग काढले जाते. सेन्सर्स सांगतात पाण्याची गरज कोकोपीट असलेल्या कंनेटरमध्ये जिथे चेरी टोमॅटोची झाडे असतात, त्याच्या बाजूला छोटे कॅनॉल (खोलगट भाग), टेन्शिओमीटर व सेन्सर्स अशी यंत्रणा असते. कॅनॉलमध्ये पाण्याची ठरावीक पातळी ठेवली जाते. यंत्रात दोन इलेक्ट्रोडस असतात. झाडांची मुळे पाणी घेऊ लागली, की कॅनॉलमधील पाण्याची पातळी खाली जाऊ लागते. एका वेळेस पाण्याचा या इलेक्ड्रॉट्ससोबतचा संपर्क तुटतो. म्हणजेच पिकाला पाण्याची त्वरित गरज असल्याचा ॲलर्ट मिळतो. संगणक त्याची नोंद घेतो. त्यानुसार ‘ड्रीप ॲटोमेशन’द्वारे सिंचन सुरू केले जाते. रासायनिक अवशेष मुक्त उद्दिष्ट कसे साध्य?
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.