Farmers' Subsidy Scam: जालन्यात अतिवृष्टीच्या अनुदान वाटपात गैरव्यवहार

Bogus Claims Investigation: जालन्यात अतिवृष्टी आणि गारपिटीच्या नुकसान भरपाईत काही कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी त्रिसदस्यीय समिती नियुक्त केली असून, शेतकऱ्यांच्या अनुदान याद्यांची फेरतपासणी सुरू केली आहे.
Agriculture Scam
Agriculture ScamAgrowon
Published on
Updated on

Jalna News: शेतकऱ्यांना अतिवृष्टी व गारपिटीची नुकसान भरपाई म्हणून मंजूर झालेल्या अनुदान वाटपात काही कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला असल्याची बाब प्राथमिक चौकशीतून उघडकीस आली आहे. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी त्रिसदस्यीय समिती नेमली असून शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करणाऱ्या तलाठी, मंडल अधिकारी आणि कृषी सहायकांची फेरतपासणी सुरू आहे.

Agriculture Scam
irrigation Scheme Scam : नांदेड जिल्ह्यात बनावट पावत्यांद्वारे अनुदान लाटण्याचा प्रयत्न

२०२२, २३ आणि २४ या तीन वर्षांमध्ये जिल्ह्यात अतिवृष्टी, पूर आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. १५ लाख शेतकऱ्यांना शासनाकडून अनुदान देखील मंजूर करण्यात आले. मात्र, या अनुदान वाटपात गैरव्यवहार झाला असल्याच्या तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी जानेवारीमध्ये उपविभागीय अधिकारी पुलकित सिंह, रोहयोच्या उपजिल्हाधिकारी मनीषा दांडगे आणि नायब तहसीलदार श्रीमती लुणावत आदींची त्रिसदस्यीय चौकशी समिती गठीत केली.

अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील ७५ ते ८० गावांतील तलाठी, मंडल अधिकारी आणि कृषी सहायकांनी अपलोड केलेल्या याद्यांची फेरतपासणी ही समिती करत आहे. दरम्यान, प्राथमिक चौकशीतून बोगस शेतकरी दाखवून याद्या जोडून अनुदान उचलण्यात आले असल्याची बाब समोर आली आहे. दरम्यान, या अनुदान वाटपात किती कोटींचा गैरव्यवहार झाला, हे चौकशीअंति पुढे येणार आहे.

Agriculture Scam
Micro Irrigation Scam : सूक्ष्मसिंचन घोटाळा : कमी वसुलीचे कारण दाखवून दोषींना अभय
अंबड आणि घनसावंगी या दोन तालुक्यांतील गावांची चौकशी सुरू आहे. अंबडची चौकशी अंतिम टप्प्यात आहे. १० ते १२ गावे आणखी बाकी आहेत. पुढील पंधरा दिवसांत सर्व चौकशी पूर्ण होईल. त्यानंतरच या विषयी माहिती जिल्हाधिकारी देतील.
मनीषा दांडगे, सदस्य, चौकशी समिती
नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये पीक अनुदानाच्या बाबतीत काही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तक्रारीच्या प्राथमिक तपासणीमध्ये लक्षात आले, की काही ठिकाणी डुप्लिकेशन, बोगस याद्या जोडून अनुदान उचलण्यात आले आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी जानेवारीमध्ये त्रिसदस्यीय समिती गठित केली आहे. ही समिती याद्या अपलोड केलेल्या ७५ ते ८० गावांतील तलाठी, मंडल अधिकारी आणि कृषी सहायकांना चौकशीसाठी बोलावून त्यांची फेरतपासणी करत आहे.
गणेश महाडिक, निवासी उपजिल्हाधिकारी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com