
कृष्णा जोेमेगावकर : ॲग्रोवन वृत्तसेवा
Nanded News : नांदेड : वितरकांच्या सहाय्याने केलेल्या सुक्ष्मसिंचन संच घोटाळ्याची चर्चा चालू असताना यात प्रकरणातील दोन पर्यवेक्षकांनी मळणीयंत्र खरेदीच्या बनावट पावत्या सादर करुन तब्बल ३२ लाख लाटण्याचा प्रयत्न उघडकीस आला आहे. या प्रकरणात मुखेडच्या तालुका तत्कालीन तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षकांसह कृषी सहायकाविरोधात कारवाईची शिफारस लातूर विभागीय कृषी सहसंचालकाकडे १४ महिन्यापूर्वी करण्यात आली. परंतु यातही सर्वाना अभय दिल्याचे दिसून आले आहे.
नांदेड जिल्ह्यातील मुखेड, कंधार, बिलोली व नायगाव तालुक्यात प्रधानमंत्री सुक्ष्मसिंचन योजना तसेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातर्गत गावात सुक्ष्मसिंचन संच बसविण्याच्या नावाखाली कृषी पर्यवेक्षक, वितरकांनी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करून शासनाची सहा कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे प्रकरण चालू असतांनाच याच प्रकरणातील तत्कालीन पर्यवेक्षक एस. डी. बनसोडे, एस. व्ही. दबडे व शेख सहाब यांनी बनावट दस्तावेज बनवून ३२ लाख अनुदान लाटण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
मुखेड तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत कृषी यांत्रिकीकरणमध्ये मळणी यंत्राचे १६, राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरणमधून आठ तसेच उपअभियान कृषी यांत्रिकीकरणमधून आठ असे एकूण ३२ प्रस्ताव मोका तपासणी करून अनुदानासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे सादर केले होते.
या प्रस्तावाबाबत नाखले मोटर्सचे गजानन पांडुरंग नाखले यांनी शेती अवजारे हडंबा थ्रेशर करिता होणाऱ्या अनुदान प्रक्रियेमध्ये भ्रष्टाराचार झाल्याची तक्रार केली होती. यात तत्कालीन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी नांदेड, किनवट व देगलूर उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेशित केले होते.
यामध्ये सादर केलेल्या अहवालात लाभार्थ्यांनी यंत्र खरेदी केलेली नाही, बँकेमध्ये कोणत्याही प्रकारची रक्कम भरणा केलेली नाही, मळणी यंत्राचा सिरीयल नंबर नसणे, मॉडेल नंबर प्रत्यक्षात न जुळण, मळणी यंत्राची विक्रेत्याचे नाव बनावट खरेदी बिले तयार करणे, यंत्र अवजारे विक्रेत्यास ऑनलाइन पद्धतीने खरेदी बिलाची रक्कम पाठविल्याचे दाखविसाठी बँकेचे बनावट डिपॉझिट ट्रान्स्फर रिसीप्ट तयार करणे, संबंधित शेतकऱ्यांकडे मळणी यंत्र नसताना मोका तपासणी अहवाल तयार करताना ते असल्याचे दाखवून अनुदान वितरणासाठी शिफारस करणे आधी गंभीर स्वरूपाच्या बाबी यात आढळून आल्या.
यावरुन तत्कालीन तालुका कृषी अधिकारी अधिनस्त कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक यांनी मार्गदर्शन सुचनांच्या कार्यपद्धतीचा अवलंब न करता मळणी यंत्र अनुदान वाटपासाठी वरिष्ठ कार्यालयाला सादर करुन दिशाभूल करून केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध योग्य प्रशासकीय कारवाई करण्याची शिफारस तत्कालीन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी उपविभागीय कृषी सहसंचालकांकडे केली होती. परंतु याही प्रकरणात लातूर विभागीय कृषी सहसंचालकांनी अद्याप कोणतीही कार्यवाही न करता त्यांना अभय दिले आहे.
सिंचन गैरव्यवहारातील कर्मचारी मळणीयंत्र घोटाळ्यात
सुक्ष्मसिंचन संच गौरव्यवहार प्रकरणातील मुखेडचे तत्कालीन पर्यवेक्षक एस. डी. बनसोडे, एस. व्ही. दबडे यांचाच मळणीयंत्र घोटाळ्यात सहभाग असल्याचे अहवालात दिसून आले आहे. एस. डी. बनसोडे यांनी २३ मळणीयंत्र प्रस्ताव तर एस. व्ही. दबडे सहा मळणीयंत्राचे बनावट प्रस्ताव सादर करून अनुदान मागणी केली. परंतु जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून चौकशी केल्यामुळे अनुदान वितरण थांबले. परंतु यात बनावटपणा करून शासनाची फसवून केल्याची मात्र सिद्ध होत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.