Electricity Supply : सुरळीत वीजपुरवठ्यासाठी प्राधान्याने लक्ष द्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर ः परभणी जिल्हा नियोजन समितीची बैठक

Electricity supply Management : ग्रामीण भागातील रस्ते दुरुस्ती तसेच वीज वितरण व्यवस्था सुरळीत करण्यासह रोहित्रांची दुरुस्ती करणे याकडे प्राधान्याने लक्ष देऊन कामे वेळेत पूर्ण करावीत. फळबाग लागवडीच्या क्षेत्रात वाढ करावी.
Power Supply
Power SupplyAgrowon
Published on
Updated on

Parbhani : परभणी ः ग्रामीण भागातील रस्ते दुरुस्ती तसेच वीज वितरण व्यवस्था सुरळीत करण्यासह रोहित्रांची दुरुस्ती करणे याकडे प्राधान्याने लक्ष देऊन कामे वेळेत पूर्ण करावीत. फळबाग लागवडीच्या क्षेत्रात वाढ करावी. शेतकऱ्यांना रेशीम शेती तसेच विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी (ता. २९) जिल्हा नियोजन समिती बैठक पालकमंत्री बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेत पार पडली. खासदार फौजिया खान, आमदार रत्नाकर गुट्टे, आमदार राजेश विटेकर, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी नतिषा माथूर, जिल्हा नियोजन अधिकारी किशोरसिंग परदेशी उपस्थित होते. पालकमंत्री बोर्डीकर म्हणाल्या, की परभणी जिल्ह्याचा सर्वांगिण विकास करण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न केले जातील.

Power Supply
Parbhani city Water supply : अखेर भर उन्हाळ्यात तोडलेला वीजपुरवठा सुरळीत; परभणी शहराला पाणीपुरवठा सुरळीत

जिल्ह्यातील विकासकामांसाठी जिल्हा वार्षिक योजनेचा संपूर्ण निधी वेळेत खर्च करावा. सर्व कामे ही दर्जेदार व गुणवत्तापूर्णच असावीत. निधी परत जाणार नाही यांची विभागप्रमुखांनी दक्षता घ्यावी. एकाच कामासाठी वेगवेगळ्या योजनेतून प्राप्त निधी खर्च झाल्याचे निदर्शनास आल्यास त्यास संबंधित अधिकाऱ्याला जबाबदार धरण्यात येईल. सुरक्षेच्या दृष्टीने जिल्ह्यातील सर्वच शहरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावेत.

ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्याच्या प्रलंबित योजना तातडीने मार्गी लावाव्यात. मानव निर्देशांकात आपला जिल्हा अग्रेसर राहील याची सर्व विभागप्रमुखांनी दक्षता घ्यावी. खासदार फौजिया खान म्हणाल्या, की महत्त्वाची स्मारके यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करण्यात यावा. आमदार गुट्टे म्हणाले, की ग्रामीण भागात ट्रान्सफॉर्मर दुरुस्ती, नियमित वीज पुरवठा, घरकुलांसाठी रेती उपलब्धता, रुग्णवाहिकेचा प्रश्न मार्गी लावावा.

जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) २०२४-२५ अंतर्गत ३४५ कोटी रुपये निधी मंजूर आहे. त्यापैकी १३८ कोटी रुपये निधी प्राप्त झाला असून ७३ कोटी ९७ लाख रुपये निधी खर्च झाला आहे. २०२५-२६ यावर्षासाठी अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी ८३५ कोटी ६७ लाख नियतव्यय प्रस्तावित केला आहे. कमाल आर्थिक मर्यादेनुसार प्रस्तावित नियतव्यय २९५ कोटी रुपये आहे. अतिरिक्त मागणी ५४० कोटी ६४ लाख रुपये आहे, अशी माहिती  परदेशी यांनी या वेळी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com