Incentive Subsidy Farmers : शेतकऱ्यांचे प्रोत्साहनपर अनुदान अडकल्याचा आरोप थेट पालकमंत्र्यांनीच केला

Hasan Mushrif : आठ दिवसांत ही रक्कम जमा न झाल्यास संबंधितांविरोधात सहकार मंत्री व मुख्य सचिवांकडे तक्रार करण्याचा इशारा मुश्रीफ यांनी दिला.
Incentive Subsidy Farmers
Incentive Subsidy Farmersagrowon

Protsahan Anudan Farmers : सहकार खात्याचे अधिकारी व लेखापरीक्षकांच्या उदासीनतेमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील नियमित पीक कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रोत्साहनपर अनुदान अडकल्याचा आरोप थेट पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनीच केला आहे.

आठ दिवसांत ही रक्कम जमा न झाल्यास संबंधितांविरोधात सहकार मंत्री व मुख्य सचिवांकडे तक्रार करण्याचा इशारा मुश्रीफ यांनी यासंदर्भात प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात दिला आहे.

यापूर्वीच राज्य सरकारने हे प्रोत्साहनपर अनुदान मंजूर केले आहे. परंतु; सहकार खात्याच्या अधिकारी आणि लेखापरीक्षकांच्या उदासीनतेमुळे ते रखडले आहे. ही जुनीच योजना असल्यामुळे यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा अडसर येणार नाही याचीही खातरजमा केल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.

कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही रक्कम लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होईल यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले होते. यावर उपाय म्हणून राज्य सरकारने ५ मार्च २०२४ ला शुद्धीपत्रकासह नवीन शासन निर्णय जाहीर केला.

Incentive Subsidy Farmers
Mahatma Phule Protsahan Anudan : एकाच वर्षात दोनवेळा पीक कर्ज उचलणाऱ्यां शेतकऱ्यांना मिळणार प्रोत्साहनपर अनुदान

या शुद्धीपत्रकाला अनुसरूनच १५ मार्च २०२४ ला सहकार खात्याने मार्गदर्शनपर सूचना जारी केल्या. त्यानुसार जिल्ह्यातील सर्वच विकास सेवा संस्थांच्या सचिवांनी लाभापासून वंचित राहिलेल्या पात्र लाभार्थ्यांची यादी तयार केली. या याद्या निकषानुसार बँकेच्या निरीक्षकांनी तपासल्या व पात्र रकमा निश्चित केल्या आहेत, असेही या पत्रकात म्हटले आहे.

असा आहे गुंता

राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार विकास सेवा संस्थांच्या सचिवांनी आणि बँकेच्या निरीक्षकांनी पात्र लाभार्थ्यांच्या याद्या तयार केल्या आहेत. परंतु; सहकार विभागाच्या अधिकारी आणि लेखापरीक्षकांनी पात्र लाभार्थ्यांच्या अंतिम याद्या तपासलेल्या नाहीत. परिणामी जिल्ह्यातील १४, ४०० शेतकऱ्यांचे ५४ कोटी रुपये अडकले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com