Heat wave : ऊन वाढण्याची शक्यता; राज्यातील अनेक भागात तापमानात वाढ

Maharashtra Heat Update : राज्यात उन्हाचा चटका वाढणार असून, कमाल तापमानात २ ते ४ अंशांची वाढ होण्याची शक्यता आहे.
Weather Forecast
Weather ForecastAgrowon
Published on
Updated on

Pune News : राज्यात उन्हाचा चटका चांगलाच वाढला. राज्यातील बुहतांशी ठिकामी किमान आणि कमाल तापमानाचा पारा चांगलाच चढला. राज्यात उन्हाचा चटका वाढणार असून, कमाल तापमानात २ ते ४ अंशांची वाढ होण्याची शक्यता आहे.

राज्यात अंशतः ढगाळ हवामानासह तापमानातील वाढ कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. झारखंड आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून, त्यापासून मेघालयापर्यंत हवेचा कमी दाब पट्टा कायम आहे. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात ढगाळ आकाश झाल्याचे दिसून आले.

Weather Forecast
Weather Update : ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज

पश्चिम विदर्भ आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. उत्तर महाराष्ट्र ते उत्तर केरळच्या किनाऱ्याला समांतर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

Weather Forecast
Weather News : उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता

कमाल तापमानाचा पारा चांगलाच वाढतोय. मालेगाव येथे उच्चांकी ३९.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यातील कमाल आणि किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला.

ईशान्य आसाम आणि शेजारच्या परिसरात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. त्यामुळे अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालय, नागालॅंड, मनिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा राज्यातील काही भागात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यताही हवामान विभागाने दिली. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com