Millet Rate : दौंड बाजार समितीत बाजरीच्या दरात सुधारणा

Millet Market Update Daund : बाजरीची ६६४ क्विंटल आवक झाली असून, त्यास प्रतवारीनुसार किमान २१०० तर कमाल ३६०० रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाला आहे.
Millet
MilletAgrowon
Published on
Updated on

Pune News : दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दौंड मुख्य बाजारात बाजरीची आवक वाढली असून, बाजारभावात प्रतिक्विंटल शंभर रुपयांची वाढ झाली आहे. बाजरीची ६६४ क्विंटल आवक झाली असून, त्यास प्रतवारीनुसार किमान २१०० तर कमाल ३६०० रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाला आहे.

मागील आठवड्यात बाजरीची ४९१ क्विंटल आवक झाली होती. त्यास प्रतवारीनुसार कमाल ३५०० रुपये प्रतिक्विंटल असा बाजारभाव मिळाला होता. दौंड मुख्य बाजारासह पाटस व यवत येथील उपबाजारांमध्ये भुसार मालाची आवक स्थिर असून, बाजारभाव तेजीत आहेत.

Millet
Millets : बहुगुणी भरडधान्याचे उपयोग

केडगाव उपबाजारात भुसार मालाची आवकमध्ये वाढ असून बाजारभाव तेजीत आहे. दौंड मुख्य बाजारात भाजीपाल्याची आवक स्थिर असून बाजारभाव तेजीत आहे.

Millet
Millet Processing Food : पौष्टिक ‘रोस्टेड फ्लेक्स’ उत्पादने पोहोचवली देशभर

बटाटा व भेंडीच्या बाजारभावात वाढ

तालुक्यात बटाट्याची २६० क्विंटल आवक झाली असून, प्रतिदहा किलोसाठी किमान २४०, तर कमाल ३०० रुपये असा दर मिळाला. भेंडीची ३१ क्विंटल आवक झाली असून, प्रतिदहा किलोसाठी किमान १००, तर कमाल ५५० रुपये असा दर मिळाला.

कांद्याच्या दरात दोनशे रुपयांची वाढ

केडगाव उपबाजारात कांद्याची आवक घटली असून दरात प्रतिक्विंटल दोनशे रुपयांची वाढ झाल्याने कांदा उत्पादकांना दिलासा मिळाला आहे. कांद्याची २६२० क्विंटल आवक झाली प्रतवारीनुसार किमान ८००, तर कमाल ६८०० प्रतिक्विंटल असा बाजारभाव मिळाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com