Team Agrowon
अन्नसुरक्षेच्या दृष्टीने केवळ भात आणि गहू या दोनच धान्य पिकांवर अन्नासाठी अवलंबून राहण्यापेक्षा, बदलत्या तापमानात तग धरू शकणाऱ्या भरडधान्यांवर भर दिला पाहिजे.
जागतिक ‘फूड रेटिंग सिस्टीम’मध्ये भरडधान्यांचे मूल्यांकन ‘उत्तम’ असे करण्यात आले आहे. शरीराला आवश्यक असणारी पोषकतत्त्वे व सूक्ष्म पोषण तत्त्वे यांचे सुयोग्य प्रमाण भरडधान्यांत असते.
या धान्यांच्या काडाचा / कडब्याचा उपयोग जनावरांच्या चाऱ्यासाठी केला जातो. त्यात मोठ्या प्रमाणात सेल्युलोज व इतर पदार्थ असतात.
कोरडवाहू, हलक्या जमिनीत भरडधान्य पिकांचे चांगले उत्पन्न मिळते. त्यांना पाणी कमी लागते, खते लागत नाहीत.
भरडधान्यांची लागवड केलेल्या शेतांतील जमिनीत नत्राचे प्रमाण वाढून जमिनीचा कस वाढतो. इतर पिकविविधता जपली जाते. काही पक्ष्यांचे हे आवडते खाद्य आहे.
शेतात भरडधान्य घेतले जाते तेथे अनेक रानभाज्या व इतर वनस्पतींची वाढ होते. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखला जातो.