Onion Price : कांदा आणि बटाट्याची माळ घालून खासदारांचे संसदेबाहेर निदर्शने

MPs of India Aghadi demand MSP : विरोध पक्षातील खासदारांनी गळ्यात कांदा आणि बटाट्याची माळा घालून केंद्र सरकारच्या शेतीविरोधी धोरणांचा निषेध केला. तसेच हमीभावाची मागणी करत संसदेबाहेर निदर्शने केली.
MPs of India Aghadi demand MSP
MPs of India Aghadi demand MSPAgrowon
Published on
Updated on

Pune News : देशांतर्गत सध्या कांद्यासह इतर विविध शेती पिकांना दर मिळत नाही. त्यातच हरियाणासह महाराष्ट्र आणि झारखंडच्या शेतकऱ्यांनी हमीभावाच्या किंमतीवर सर्वच पिकांची खरेदी करण्याची मागणी लावून धरली आहे.

संसदेतही विरोधी पक्षातील खासदारांनी देखील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह हमीभाव कायदा करावा, अशी मागणी केली आहे. परंतू सरकार याकडे कानाडोळा करत आहे. याविरोधात गुरूवारी (ता.८) इंडिया आघाडीतील विविध घटक पक्षांच्या खासदारांनी सरकारचा निषेध केला.

तसेच संसदेबाहेर गळ्यात कांदा आणि बटाट्याची माळ घालून निदर्शने केली. यावेळी राज्यातील शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार निलेश लंके, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी यांच्यासह तृणमूल काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल, झारखंड मुक्ती मोर्चासह इतर पक्षांचे खासदार उपस्थित होते.

यावेळी विरोधी खासदारांनी शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे हमीभाव कायदा करावा आणि पिकांना हमीभाव द्यावा, अशी मागणी केली आहे. खासदारांनी सरकारविरोधात संसद भवनाच्या मकर गेटजवळ निदर्शने केली. तसेच ‘शेतकऱ्यांना हमीभाव द्या’ आणि ‘शेतकऱ्यांवरील अन्याय थांबवा’ अशा घोषणाही उपस्थित खासदारांनी दिल्या.

MPs of India Aghadi demand MSP
Onion Price : कांद्याच्या दरात घसरण सुरूच! सोलापूरनंतर नाशिक आणि पुण्यात भाव पडले

नीतीश कुमार यांचा जनता दल आणि चंद्रबाबू नायडू यांच्या तेलुगू देशम पार्टीलाच सगळ देण्यात आलं आहे. मात्र शेतकऱ्यांना हमीभाव दिला जात नाही. आम्ही शेतकऱ्यांसाठी हमीभावाची मागणी करत आहोत, असा टोला खासदार चतुर्वेदी यांनी लगावला आहे. तसेच कांद्याच्या निर्यातीवरील निर्बंध उठवावेत, अशीही मागणी चतुर्वेदी यांनी केली आहे.

शेतकऱ्यांना हमीभावाची हमी द्यावी

यावेळी आरजेडीचे खासदार मनोज झा यांनी हमीभावाचे समर्थन करताना, केंद्र सरकरावर टीका केली आहे. झा म्हणाले, कांदा आणि बटाटा उत्पादक शेतकऱ्यांची मागणी आता पुढे आली आहे.

तर हमीभाव मोठा मुद्दा असून त्यावर अद्यापही सरकार निर्णय घेत नाही. उलट सभागृहात खेळाडूंच्या अन्न खर्चाचा हिशेब सरकार देत आहे. यावरून दुःख आणि लाज वाटतं असल्याचे झा म्हणाले.

महागाईवर सरकारचे नियंत्रण नाही : सुळे

दरम्यान सुप्रिया सुळे यांनी देखील बुधवारी (ता.८) जीवनावश्यक वस्तूंच्या महागाईवरून सरकारवर टीका केली होती. त्यांनी जीवनावश्यक वस्तूंच्या महागाईत दिवसेंदिवस भरच पडत असून खाणेपिणे देखील महाग झाले आहे.

याबाबत 'क्रिसिल एम आय ॲन्ड ए' या अहवालात निष्कर्ष काढण्यात आला आहे. या अहवालानुसार सर्वसामान्य जनतेची शाकाहारी थाळी जुलै महिन्यात ११ टक्क्यांनी महागली तर मांसाहारी थाळीसाठी ६ टक्के जास्त मोजावे लागले असल्याचे म्हटले आहे.

तर अन्नधान्य आणि भाजीपाला आदींच्या महागाईवर सरकारला नियंत्रण ठेवता आले नाही. तर महागाई नियंत्रणात करण्याचा प्रयत्न देखील होताना दिसत नाहीत. ही खेदाची बाब असल्याचेही टीका खासदार सुळे यांनी केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com