
Sangli News: सांगली जिल्ह्यात मे महिन्यापासून जिल्ह्यात चांगला पाऊस सुरू झाल्यामुळे ओला चारा मुबलक उपलब्ध झाला आहे. जिल्ह्यात जून महिन्यात १५ लाख ६३ हजार २७१ लिटर दररोज दूध संकलन झाले आहे. मे महिन्याच्या तुलनेत जून महिन्यात १ लाख १४ हजार ६१२ लिटरने दूध संकलन वाढले असल्याचे चित्र आहे. वास्तविक, सहकार आणि मल्टिस्टेट या दूध संघांमध्ये दूध संकलन घटले आहे.
खासगी दूध संघात दुधाचे संकलन वाढले असल्याचे जिल्हा दूध व्यवसाय विकास कार्यालयाच्या अहवालात नमूद आहे.जिल्ह्यात सहकार, मल्टिस्टेट आणि खासगी असे संघ आहेत. या संघांच्या माध्यमातून दूध संकलन होते. जिल्ह्यात दैनंदिन १५ लाख लिटर दूध संकलित होते. यापैकी ५० टक्के पिशवीबंद दुधाची विक्री होते. उर्वरित दुधाची राज्यात मोठ्या शहरात निर्यातीसह दूध पावडर व बटर या दुग्धजन्य पदार्थाच्या निर्मितीसाठी वापर होतो.
जिल्ह्यात मार्च महिन्यापासून वाढती उष्णता, काही अंशी चाराटंचाई व पाणीटंचाईचा फटका दुधाच्या उत्पादनावर झाला होता. मार्च महिन्यात २२ हजार ७६९ लिटरने संकलन कमी झाले होते. दरम्यान, एप्रिल आणि मे महिन्यांत संकलन कमी होईल, असा अंदाजही संबंधित विभागाने व्यक्त केला होता. मे महिन्यात १४ लाख ४८ हजार ५६९ प्रति दिन दुधाचे संकलन झाले होते. तसेच इतर जिल्ह्यातून १५ हजार लिटर, तर राज्याबाहेरून ८२ हजार ५०६ लिटर दुधाची आवक झाली होती. असे एकूण १५ लाख ४६ हजार १६५ संकलन झाले होते.
जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत मे महिन्यापासून अपेक्षित पाऊस झाला. त्यामुळे ओला चारा मुबलक उपलब्ध झाला. तसेच पशुधनाला वेळेवर लसीकरणही झाले. यामुळे दुधाच्या उत्पादनात वाढ झाली आहे. जून महिन्यात १५ लाख ६३ हजार २१७ लिटर इतके दुधाचे संकलन झाले. जिल्ह्याच्या बाहेरून १५ हजार, तर राज्याबाहेरून ७५ हजार २३६ लिटर आवक होऊन एकूण १६ हजार ५३ हजार ५०७ लिटर दुधाचे संकलन झाले.
वास्तविक पाहता, सहकार, मल्टिस्टेट या संघांकडे मे महिन्याच्या तुलनेत दूध संकलन कमीच झाले आहे. तर खासगी संघाकडे मे महिन्यात १० लाख ७ हजार ४७ लिटर संकलन झाले. तर जून महिन्यात खासगी संघात ११ लाख ३५ हजार ६१६ इतके लिटर संकलन झाले. खासगी संघाकडे मे महिन्याच्या तुलनेत जून महिन्यात १ लाख २८ हजार ५६९ लिटरने संकलनात वाढ झाली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.