Irrigation Scheme : म्हाळसाकांत सिंचन योजना नक्की होणार - वळसे पाटील

Dilip Walse-Patil : आंबेगाव तालुक्याच्या पूर्वभागातील लोणी- धामणी परिसराला वरदान ठरणाऱ्या म्हाळसाकांत सिंचन योजना ही अंतिम टप्प्यात असून, त्याचे सादरीकरण मी स्वतः पाहिले आहे.
Agriculture Irrigation
Agriculture IrrigationAgrowon
Published on
Updated on

Pune News : ‘‘आंबेगाव तालुक्याच्या पूर्वभागातील लोणी- धामणी परिसराला वरदान ठरणाऱ्या म्हाळसाकांत सिंचन योजना ही अंतिम टप्प्यात असून, त्याचे सादरीकरण मी स्वतः पाहिले आहे. आता मी व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आम्ही दोघे एकत्र आहोत.

त्यामुळे ही योजना नक्की होणार,’’ अशी ग्वाही सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. धामणी (ता. आंबेगाव) येथे शुक्रवारी वळसे पाटील हे सुरु असलेल्या विकास कामांची पाहणी करण्यासाठी व गावभेट दौऱ्यानिमित्त आले असता बोलत होते.

यावेळी भीमाशंकर साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, जिल्हा दूध संघाचे माजी अध्यक्ष विष्णू हिंगे, माजी पंचायत समिती सदस्य रवींद्र करंजखेले, खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष भगवान वाघ, अनिल वाळुंज, भीमाशंकर कारखान्याच्या संचालिका पुष्पलता जाधव, अंकित जाधव, रामदास जाधव, वसंत जाधव, धामणीच्या सरपंच रेश्मा बोऱ्हाडे, उपसरपंच अक्षय विधाटे, माजी सरपंच सागर जाधव, पहाडदरा येथील सरपंच मच्छिंद्र वाघ, उपसरपंच कैलास वाघ, संतोष करंजखेले, प्रतीक जाधव, गणेश भूमकर, उद्योजक ज्ञानेश्वर विधाटे, लक्ष्मण काचोळे, शांताराम जाधव, श्यामराव करंजखेले, अशोक कुमार पगारिया उपस्थित होते.

Agriculture Irrigation
Aashti Irrigation Scheme : ‘आष्टी योजने’च्या तिसऱ्या टप्प्यासाठी प्रस्ताव सादर करा

प्राथमिक आरोग्य केंद्र नवीन इमारतीच्या बांधकामाची पाहणी यावेळी केली. वळसे पाटील म्हणाले, ‘‘धामणी गावावरती आमचे एक वेगळे प्रेम आहे. गावच्या दिवंगत त्रिमूर्ती जयवंतराव भाऊ, बेरी गुरुजी, बाबूराव पाटील असतील किंवा म्हातारबा जाधव, राम पाटील जाधव, गजाराम पाटील असतील या जुन्या माणसांनी गावच्या जडण घडणीत असलेले योगदान आहे.

Agriculture Irrigation
Irrigation Scheme Subsidy : अनुदान तफावत तत्काळ दूर करा

ही सर्व मंडळी स्वर्गीय माजी आमदार दत्तात्रेय गोविंदराव वळसे पाटील यांच्या बरोबरीने काम करत असायची. त्यामुळे आपल्या सर्वांना भेटून आनंद झाला. येथील नवीन ग्रामपंचायतीसाठी ५० लाख रुपये व सभागृहासाठी भरघोस निधी देणार आहे.’’.

माजी सरपंच सागर जाधव यांनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सुरु असलेल्या कामाबाबत काही तक्रारी केल्या. त्यावर वळसे पाटील यांनी अधिकाऱ्यांना बांधकामाच्या दर्जाबाबत लक्ष देण्याच्या सूचना दिल्या. रवींद्र करंजखेले यांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना आम्ही आजपर्यंत ज्यांचे काम केले, त्यांचे प्रामाणिकच काम केले आहे आणि भविष्यात देखील प्रामाणिकच काम करणार असल्याची ग्वाही दिली. मयूर सरडे यांनी सूत्रसंचालन केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com