MGNREGA Scam : मजुरांच्या खात्यात पैसे टाकणारे चौघे अटकेत

Aadhar Card Misuse : रोजगार हमी योजनेतील मजुरांच्या खात्यातून साडेसात कोटींची उलाढाल करणाऱ्या चौघांना स्थानिक गुन्हे शाखेने वेगवेगळ्या ठिकाणांहून ताब्यात घेतले.
MGNREGA
MGNREGAAgrowon
Published on
Updated on

Yavatmal News : : रोजगार हमी योजनेतील मजुरांच्या खात्यातून साडेसात कोटींची उलाढाल करणाऱ्या चौघांना स्थानिक गुन्हे शाखेने वेगवेगळ्या ठिकाणांहून ताब्यात घेतले. चौघांनाही न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने मंगळवारपर्यंत (ता. २२) पोलिस कोठडी सुनावली आहे.

मयूर चव्हाण, उमेश अनिल आडे (दोघेही रा. चोपण), निखिल खैरे (रा. उमरी, पांढरकवडा) आणि अल्ताफ अहमद अकबाने (रा. चंद्रपूर) अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. केळापूर तालुक्यातील वाघोली येथील श्रीकांत कार्लावार (वय ३५) याने पांढरकवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. श्रीकांत कार्लावार यांच्यासह इतर मजुरांनी मयूर चव्हाण आणि मनोहर राठोड यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता मजुरांना आमिष दाखविले होते.

MGNREGA
MGNREGA : कुशल, अकुशल थकलेल्या कामाचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार

त्यानंतर केळापूर तालुक्यातील चोपण येथील श्रीकांत कार्लावार यांच्यासह अनेकांचे आधार कार्ड, पॅन कार्ड, फोटो आदी कागदपत्रे गोळा करून महाराष्ट्र बँकेच्या पांढरकवडा शाखेत खाते उघडले होते. दरम्यान, श्रीकांत कार्लावार यांच्यासह १४ ते १५ मजुरांच्या खात्यातून तब्बल ७ कोटी ५२ लाख रुपयांची उलाढाल झाली होती.

या प्रकरणी फसवणूक करणाऱ्या दोघांवर पांढरकवडा पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे नोंद करण्यात आले होते. तत्पूर्वीच आरोपी फरारी झाले होते. आरोपींच्या शोधकार्याकरिता स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गठित करण्यात आले होते.

MGNREGA
MGNREGA : मनरेगा अंतर्गत २३३ कोटी ९९ लाख रुपयांवर खर्च

या पथकाने मयूर चव्हाण, उमेश आडे, निखिल खैरे आणि अल्ताफ अहमद अकबाने यांना वेगवेगळ्या ठिकाणांहून ताब्यात घेतले. दरम्यान, न्यायालयाने चौघांनाही चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

हा पैसा कुठून आणि कसा आला, याचा छडा लागण्याची शक्यता आहे. प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सतीश चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक दत्ता पेंडकर करीत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com