Medicinal Herbs : औषधी रानभाजी : टाकळा

Takla Vegetable : टाकळा ही एक पावसाळ्यात येणारी दुर्लक्षित वनस्पती आहे. या वनस्पतीची पाने, बीज, मूळ व खोड औषधात वापरले जाते. ही वनस्पती पावसाळ्यात सर्वत्र दिसते.
Medicinal Herbs
Medicinal HerbsAgrowon

डॉ. कैलास कांबळे

Takla : टाकळा ही एक पावसाळ्यात येणारी दुर्लक्षित वनस्पती आहे. या वनस्पतीची पाने, बीज, मूळ व खोड औषधात वापरले जाते. ही वनस्पती पावसाळ्यात सर्वत्र दिसते. राजस्थान व गुजरात राज्यात ही वनस्पती गोळा करून औषध निर्मितीसाठी वापरली जाते. टाकळा (कॅशिया टोरा) ही एक पावसाळ्यात येणारी वर्षायू शेंगवर्गीय वनस्पती आहे. या वनस्पतीला तरोटा किंवा तरवड असेही म्हणतात. आदिवासी लोक याच्या कोवळ्या पानांची भाजी करून खातात.

या वनस्पतीच्या पानांना उग्र वास असल्यामुळे जनावरे खात नाहीत. खोड गुळगुळीत असते, जमिनीनुसार ३० ते १०० सेंमी सरळ वाढते, दोन चार लहान लहान फांद्या फुटतात. ८ ते १२ सेंमी लांबीची मेथीच्या पानाच्या आकाराची संयुक्त पाने असतात.

शेंड्याकडील पानांच्या खोबणीत पिवळी फुले गुच्छात येतात. पूर्ण वाढ झालेल्या शेंगा १५ सेंमी लांब आणि ३ ते ४ मिमी जाड असतात. बी एका बाजूने चपटे, लांबट षट्‌कोनी असते.

वनस्पतीची पाने, फुले, बीज आणि खोडामध्ये औषधी गुणधर्म आहेत.

औषधी गुणधर्म

थंड व चवीला गोडसर.

लघवीचे प्रमाण वाढविणारे, रेचक, द्रवकारक.

जंतुनाशक, पचनास मदत करणारा, मासिक पाळीच्या नियमितता, तापहारक, जंतुनाशक.

हृदयरोग व यकृतासाठी टॉनिक.

वनस्पतीचा उपयोग

पाने, बी आणि मुळांचा औषध निर्मितीसाठी वापर.

कोवळ्या पानांचा भाजीसाठी वापर.

भाजलेल्या बियाण्यांची पावडर कॉफीमध्ये मिसळण्यासाठी वापरले जाते.

Medicinal Herbs
Hirda Medicinal Tree : हिरडा झाला उदरनिर्वाहाचे साधन

पारंपरिक औषधात वापर

संपूर्ण झाडाचा अर्क काढून जंतुनाशक पेय म्हणून वापर.

गजकर्ण व त्वचा विकारावर पाने, बियांचा वापर.

बियांचा काढा कावीळ तसेच यकृतासंबधी आजारात वापर.

उच्च रक्तदाब, लहान मुलांमधील लकवा, तापामुळे आलेला रातांधळेपणा, पोटदुखी, आतड्याचे आजार यावर गुणकारी.

बिया आणि पानांचे पोटीस त्वचा विकारात वापर. मुळांचा लेप गजकर्णावर वापरला जातो.

दात येताना आलेल्या तापावर पानांचा काढा दिला जातो.

एरंडीच्या तेलात तरवट्याची पाने तळून तयार झालेले तेल अल्सरसाठी वापरले जाते.

पानांचा काढा वात विकार तसेच खोकल्यावर उपयोगी.

बियांचा उपयोग खोकला, इसब, अ‍ॅलर्जी, सोरायसिस, गजकर्ण व घशाचा जंतुसंसर्ग तसेच अर्थ्रायटिस यावर उपयोगी.

टीप : तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच वनस्पतीचा औषधासाठी वापर करावा.

इतर उपयोग

पानांचा रस कीटकनाशक म्हणून केला जातो.

निळया रंगासोबत बीजांचा वापर केला जातो.

बियांचा वापर पशुखाद्य तसेच रूम फ्रेशनरमध्ये करतात.

बुरशीनाशके, रोगप्रतिकार शक्तिवर्धके, अ‍ॅन्टिऑक्सिडंट, जंतुनाशके, सुजेवरील औषध, कावीळ, कर्करोग, दमा, अल्सर, मेंदूसंबंधित आजारावर उपयोगी.

भाजी पचायला हलकी, तिखट, तुरट आणि पित्तकारक व मलसारक.

Medicinal Herbs
Medicinal Plants : आरोग्यदायी, औषधी वनस्पतींची ओळख

पानातील औषधी घटक

घटक टक्के

प्रथिने ११.६३

तंतू २७.०७

जलांश १२.८२

राख ९.८६

मेद घटक २.०२

पिष्टमय पदार्थ ३६.६०

कॅल्शिअम ३.५२

लोह ०.२२

सोडियम ०.१०

मॅग्नेशिअम ०.८६

झिंक ०.०४

मँगेनीज ०.१०़०.२

कोबाल्ट ०.०२

पोटॅशिअम ०.९६

इतर घटक : फ्लेव्होनॉइड्‌स, सॅपोनिनस, अ‍ॅन्थ्रॅक्विनोन, ग्लुकोसाइड्‌स, स्टेरॉइड्‌स

बियातील औषधी घटक

टॅनिन आणि रंगद्रव्ये (पिवळा, निळा व लाल)

संप्लवनशील तेल : अ‍ॅलिफॅटिक अ‍ॅसिड (७५ टक्के) व अ‍ॅन्थ्रॅक्विनोन

जलांश : २७.२ टक्के

फायटोस्टेरिन आणि ग्लुकोसेनिन, टॅनिन, फ्लेव्होनॉइड्‌स, सॅपोनिनस.

डॉ. कैलास कांबळे, ९४०४७८५८८४,

(कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com