Chicory : औषधी गुणधर्म असणारी चिकोरी

Medicinal Properties : चिकोरी ही एक औषधी वनस्पती आहे. ही वनस्पती प्रामुख्याने युरोप, उत्तर अमेरिका, आणि आशियामध्ये आढळते, काही भागांमध्ये या वनस्पतीला कासणी असे म्हणतात.
Chicory Plant
Chicory PlantAgrowon
Published on
Updated on

विशाल राऊत, डॉ. बी. एस. आगरकर

Chicory Plant : चिकोरी ही एक औषधी वनस्पती आहे. ही वनस्पती प्रामुख्याने युरोप, उत्तर अमेरिका, आणि आशियामध्ये आढळते, काही भागांमध्ये या वनस्पतीला कासणी असे म्हणतात. बारमाही वनस्पती असलेल्या चिकोरीचा उपयोग प्राचीन काळापासून विविध औषधी आणि खाद्य उत्पादनांमध्ये केला जात आहे.

चिकोरीची लागवड विशेषत: सौम्य हवामान असलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर केली जाते. युरोप, विशेषत: फ्रान्स, बेल्जियम, नेदरलँड्स, आणि इटली येथे चिकोरीचा वापर पाककृतींमध्ये तसेच औषधी दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणावर केला जातो. याशिवाय, उत्तर अमेरिकेतही चिकोरीच्या पानांचा आणि मुळांचा वापर कॉफीच्या पर्यायासाठी केला जातो.

चिकोरीच्या झाडाची उंची साधारणत: ३० सेंटीमीटर ते १ मीटरपर्यंत असते. या झाडाची मुख्य मुळे खोलीपर्यंत वाढतात. कोरड्या हवामानात टिकून राहण्यासाठी चांगली क्षमता आहे.

Chicory Plant
Coffee Plant : जैन इरिगेशन करणार कॉफीचे टिश्‍युकल्चर विकसित

चिकोरीची पाने दीर्घवर्तुळाकार, रुंद, आणि दातेदार असतात. ती खालील भागात जास्त रुंद असतात आणि वरच्या भागात अरुंद होतात. पानांची रचना साधारण पालकासारखी असते, मात्र त्यात एक विशिष्ट कडवट चव असते.

चिकोरीच्या पानांचा वापर सलाडसाठी केला जातो. चिकोरीचे फूल साधारणत: निळसर-जांभळे रंगाचे असते, ज्याचा आकार साधारण डेझी फुलासारखा असतो. काही चिकोरीच्या प्रजातींमध्ये पांढऱ्या किंवा गुलाबी रंगाची फुलेही असतात. फुलांचा आकार साधारणत: २ ते ४ सेंटीमीटर व्यासाचा असतो आणि ती उघडल्यावर साधारण सकाळी ८ ते १२ या वेळेत दिसतात. संध्याकाळी फुले आपोआप मिटतात.

Chicory Plant
Vegetables Rate : कांदा सत्तरीत, तर बटाटा चाळिशीत, कोल्हापूरच्या आठवडी बाजारात पालेभाज्यांची रेलचेल

चिकोरी ही वनस्पती आपल्या आजूबाजूच्या पर्यावरणात आणि विविध प्रकारच्या हवामानात सहज उगवणारी वनस्पती आहे. चिकोरीची फुले, पाने आणि मुळे यांचा उपयोग आरोग्याच्या बरोबरीने पाककलेतही केला जातो.

चिकोरीची पाने आणि मुळे पाककलेत खूप महत्त्वाची आहेत. चिकोरीच्या पानांचा वापर मुख्यत: सलाडसाठी केला जातो. त्याचा कडवट चव सलाडला एक खास प्रकारची स्वाद देते, ज्यामुळे ती इतर हिरव्या भाज्यांबरोबर उत्तम लागते. फ्रान्स आणि इटलीमध्ये चिकोरीचा विशेषत: सलाडमध्ये उपयोग केला जातो.

चिकोरीच्या मुळांच्या पावडरीचा वापर प्रक्रिया उद्योगामध्ये करतात. हे पेय केफीनमुक्त असते.

चिकोरीचा वापर यकृत समस्या, मधुमेह आणि त्वचा आजार, पचन आरोग्य सुधारण्यासाठी, रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी, आणि हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

विशाल राऊत, ७२१८१९८८०१

(अन्न अभियांत्रिकी विभाग,अन्नतंत्र महाविद्यालय, परभणी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com