Medicinal Leaves : फळपिकांच्या पानांमधील औषधी गुणधर्म

Medicinal Leaves for Diseases : आंबा, पेरू आणि जांभळाच्या पानांमध्ये कर्बोदके, प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे या पोषक तत्त्वासोबतच पॉलिफिनॉल, टॅनिन, फ्लेव्हेनॉइड्‍स, अ‍ॅन्टिऑक्सिडन्ट्‌स हे घटक असल्यामुळे त्यांचा उपयोग रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे, मधुमेह इत्यादी आजारांवर औषध म्हणून केला जातो.
Fruit Leaves Medicine
Fruit Leaves Medicine Agrowon

डॉ. कैलास कांबळे, श्रेयस डिंगोरे

Fruit Leaves Medicine : आंबा, पेरू आणि जांभळाच्या पानांमध्ये कर्बोदके, प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे या पोषक तत्त्वासोबतच पॉलिफिनॉल, टॅनिन, फ्लेव्हेनॉइड्‍स, अ‍ॅन्टिऑक्सिडन्ट्‌स हे घटक असल्यामुळे त्यांचा उपयोग रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे, मधुमेह इत्यादी आजारांवर औषध म्हणून केला जातो.

वनस्पतीची पाने सूर्यप्रकाशात अन्न तयार करतात, हे अन्न फुले येणे, फळे पोसण्यासाठी उपयोगी पडते. पानांतील सर्वच अन्न फळांमध्ये येत नाही, त्यातील काही शिल्लक राहते. पाने जुनी होऊन, पिवळे होऊन गळतात. शेतकरी वाळलेल्या पानांचा वापर कंपोस्ट खत, सेंद्रिय खत तयार करण्यासाठी करतात.

म्हणजेच फळांच्या अन्नाचा मूळ स्रोत पाने आहेत. फळझाडांची पाने सावलीत वाळवून किंवा त्याचे अर्क काढून त्यापासून विविध औषधे तयार केली जातात. सीताफळ, कढीपत्ता, शेवगा, लिंबूवर्गीय फळझाडे, तसेच करंज, कडुनिंब, विविध भाजीपाल्याच्या पानांमध्ये अनेक प्रकारचे औषधी गुणधर्म आहेत.

पानांमध्ये फळांपेक्षा अधिक पोषण मूल्ये व औषधी गुणधर्म असतात, पाने वाळवून पावडर तयार करून सर्वसाधारण तापमानात साठविता येते. आयुर्वेदिक औषध निर्मितीमध्ये काही प्रमाणात पानांचा वापर केला जातो. आंबा, पेरू आणि जांभळाच्या पानांमध्ये कर्बोदके, प्रथिने, जीवनसत्वे आणि खनिजे या पोषक तत्त्वासोबतच पॉलिफिनॉल, टॅनिन, फ्लेव्हेनॉइड्‍स, अ‍ॅन्टिऑक्सिडन्ट्‍स हे घटक असल्यामुळे त्यांचा उपयोग रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे, मधुमेह, हृदयरोग, कर्करोग, वजन कमी करणे इत्यादी आजारांवर औषध म्हणून केला जातो.

वनस्पतीची पाने सूर्यप्रकाशात अन्न निर्मितीचे कार्य करतात, त्यातीलच काही अंश फळात जातो, प्रत्यक्षात फळांपेक्षा पानांमध्ये पोषण मूल्ये व औषधी गुणधर्म अधिक असल्याचे दिसून आले आहे. फळे आणि पानांमधील पोषक तत्त्वे हवामान, हंगाम, पक्वता आणि प्रजातीनुसार थोड्याफार प्रमाणात कमी अधिक होतात.

Fruit Leaves Medicine
Medicinal Plants : आरोग्यदायी, औषधी वनस्पतींची ओळख

तक्ता : आंबा फळ आणि पानांतील गुणधर्माची तुलनात्मक माहिती.

गुणधर्म फळातील गुणधर्म (१०० ग्रॅम) पानांतील गुणधर्म

ऊर्जा (कि.कॅलरी) ५६ --

जलांश ८३ ग्रॅ. --

मेद ०.४ ग्रॅ. --

कर्बोदके १२.८ ग्रॅ. ३०.६० टक्के

प्रथिने ०.८ ग्रॅ. १८.५९ टक्के

तंतुमय घटक १.७ ग्रॅ ११.४९ टक्के

सोडीअम -- २८ मि. ग्रॅ.

पोटॅशिअम १९० मि.ग्रॅ. ५८९ मि.ग्रॅ.

कॅल्शिअम १० मि.ग्रॅ. ३६८ मि.ग्रॅ.

मॅग्नेशिअम १८ मि.ग्रॅ. ९८ मि.ग्रॅ.

लोह १.२ मि.ग्रॅ. ३४३ मि.ग्रॅ.

झिंक -- १४ मि. ग्रॅ.

फॉस्फरस -- ४८० मि. ग्रॅ.

नायट्रोजन -- २ मि. ग्रॅ.

मँगेनीज -- ३ मि. ग्रॅ.

जीवनसत्त्व ब ०.०५ मा. ग्रॅ. --

जीवनसत्त्व-ब-२ ५० मा. ग्रॅ. --

नायसीन (जीवनसत्त्व-ब-३) ७०० मा. ग्रॅ. --

जीवनसत्त्व-ब-६ १३० मा. ग्रॅ. --

जीवनसत्त्व-क ३० मा. ग्रॅ. ३० मा. ग्रॅ.

फोलीक आम्ल ३१ मा. ग्रॅ. --

जीवनसत्त्व-ई १००० मा. ग्रॅ. १० मा. ग्रॅ.

जीवनसत्त्व-अ १९४ मा. ग्रॅ. १२१ मा. ग्रॅ.

पॉलीफिनॉल्स -- --

टर्पेनॉईड्स -- --

फ्लेव्होनॉईड्स-अ‍ॅन्टीऑक्सीडन्टस -- --

टॅनीनस -- --

Fruit Leaves Medicine
Medicinal Plants : शेतकऱ्यांनी टिकवलेय औषधी पानपिंपळीचे अस्तित्व

तक्ता : पेरू फळ आणि पानांतील गुणधर्माची तुलनात्मक माहिती.

गुणधर्म फळातील गुणधर्म पानांतील गुणधर्म

ऊर्जा (कि.कॅलरी) ६१ ६८

कर्बोदके १४.७ ग्रॅ. १२.७४ (१४.३२ टक्के)

तंतुमय घटक २.९९ ग्रॅ. २.८ (५.४ टक्के)

मेद ०.५८ ग्रॅ. ०.६२ (०.९५ टक्के)

प्रथिने १.१२ ग्रॅ. १८.५३ टक्के

जीवनसत्त्व-क ९२.६५ मि.ग्रॅ. २७५ टक्के (दररोजच्या शिफारशीत मात्रेच्या)

फोलेट २४.९७ मा.ग्रॅ. १२ टक्के (दररोजच्या शिफारशीत मात्रेच्या)

जीवनसत्त्व-क ४.२८ मा.ग्रॅ. --

जीवनसत्त्व-ब-५ -- ९ टक्के (दररोजच्या शिफारशीत मात्रेच्या)

जीवनसत्त्व-ब-६ -- ८ टक्के (दररोजच्या शिफारशीत मात्रेच्या)

नायसीन -- ७ टक्के (दररोजच्या शिफारशीत मात्रेच्या)

मॅग्नेशिअम १७.५६ मि.ग्रॅ. ६ टक्के (दररोजच्या शिफारशीत मात्रेच्या)

पोटॅशिअम ३११.८६ मि.ग्रॅ. ९ टक्के (दररोजच्या शिफारशीत मात्रेच्या)

फॉस्फरस -- ६ टक्के (दररोजच्या शिफारशीत मात्रेच्या)

मँगेनीज ०.११ मि.ग्रॅ. ५ टक्के (दररोजच्या शिफारशीत मात्रेच्या)

तांबे ०.११ मि.ग्रॅ. --

अ‍ॅसकॉर्बिक आम्ल -- --

गॅलिक आम्ल -- --

फिनॉलिक घटक -- --

तक्ता : जांभूळ फळ आणि पानांतील गुणधर्माची तुलनात्मक माहिती.

गुणधर्म फळातील गुणधर्म पानांतील गुणधर्म

ऊर्जा (कि.कॅलरी) ३९ ते ६२ --

जलांश (टक्के) ८३.७ ते ८५.८० ६.०६

प्रथिने (टक्के) ०.५३ ते ०.६५ ८.७९

कर्बोदके (टक्के) १४.० ६३.४९

मेद (टक्के) ०.१५ ते ०.३० ०.२६

तंतूमय घटक (टक्के) ०.६ ते १.२ १६.१५

राख (टक्के) ०.३२ ते ०.४० ५.२५

पेक्टीन (टक्के) २.३ ते ३.७ --

विद्राव्य घटक (टक्के) ९.० ते १७.४ --

कॅल्शिअम (मि.ग्रॅ.) ८.३० ते १५.० --

मॅग्नेशिअम (मि.ग्रॅ.) ४.३५ --

लोह (मि.ग्रॅ.) ०.८ ते १.२ ३९.१५ पीपीएम

मँगेनीज -- २.५२ पीपीएम

झिंक -- ४९.३५ पीपीएम

फॉस्फरस (मि.ग्रॅ.) १५.३० --

गंधक (मि.ग्रॅ.) १३.० --

तांबे (मि.ग्रॅ.) ०.२३ २.०५ पीपीएम

सोडिअम (मि.ग्रॅ.) २६.२० --

क्लोरिन (मि.ग्रॅ.) ८.० --

कॅरोटेनॉईड (मि.ग्रॅ.) १२.३८ ते २२.३४ --

जीवनसत्त्व-क (मि.ग्रॅ.) १०.७० - २९.५२ --

टॅनिन (मि.ग्रॅ.) २०१.५० - ३८६.२५ १.५९ (मि.ग्रॅ.सीई/ग्रॅ.)

अल्कलाइड घटक (टक्के) -- ६.७८

अ‍ॅन्थोसायनिन (मि.ग्रॅ.) ११५.३८ ते २१०.७६ --

डॉ. कैलास कांबळे, ९४०४७८५८८४, (कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभाग, डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, राहुरी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com