Medicinal Plants : आरोग्यदायी, औषधी वनस्पतींची ओळख

Medicinal Herbs : आपल्या आजूबाजूला, शेतशिवारात असलेल्या आरोग्यदायी आणि औषधी वनस्पतींची माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. जेणेकरून त्यांचे संवर्धन करणे सोपस्कर होईल.
Medicinal Plants
Medicinal PlantsAgrowon

डॉ. प्रदीप दळवे

भाग २

Medicinal Plants and their Uses :

सौंदड

या वृक्षाला शमी असेही म्हणतात. या बहुउद्देशीय वृक्षाच्या शेंगा भाजीसाठी तर पाने चारा म्हणून वापरली जातात. खोडापासून डिंक, राळ तसेच विविध औषधे तयार करतात.

हा वृक्ष वातावरणातील नत्र स्थिरीकरण करून जमिनीची सुपीकता सुधारण्यास मदत करतो.मिनीतील सेंद्रिय पदार्थ, विद्राव्य कॅल्शिअम आणि उपलब्ध फॉस्फरसचे प्रमाण वाढते. शिवाय, आंतरपीक आणि सहचर पीक पद्धतींमध्ये शमीचे झाड उत्पादकता वाढवणारे मानले जाते. त्यामुळे ते शुष्क आणि अर्ध-शुष्क प्रदेशातील कृषी वनीकरण प्रणालीसाठी अत्यंत उपयोगी आहे.

बेल

बेल हा वृक्ष दुष्काळ, कमी तापमान आणि प्रतिकूल हवामानातही टिकून राहण्यास सक्षम आहे. बेलास धार्मिक व आयुर्वेदिकदृष्ट्या महत्त्व आहे.

अतिसार, आमांश, पोटाचे विकार इ. विकारांवर गुणकारी आहे.

पक्व फळांपासून सरबत, पेय, जॅम, टॉफी, कॅण्डी, पावडर, स्क्वॅश, आरटीएस इ. प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात.

रामफळ

हा सदाहरित वृक्ष शेताच्या बांधावर किंवा परसबागेत हमखास आढळून येतो. फेब्रुवारी-मार्च महिन्यात फळे येतात. फळे चवीला तुलनेने कमी गोड व रवाळ असतात. औषधी गुणधर्म असलेने फळांना भरपूर मागणी असते.

चारोळी

हा मध्यम आकाराचा, पानझडी/सदाहरित वृक्ष झारखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशच्या शुष्क आणि अर्ध-शुष्क जंगलात आढळतो.

फळे ताजी तसेच सुका मेवा म्हणून वापरली जातात. सर्पदंश, आमांश, अतिसार, दमा, शरीराची जळजळ, ताप, अल्सर, सर्दी आणि अल्झायमर या सारख्या व्याधीवर फळे गुणकारी मानली जातात.

Medicinal Plants
Medicinal Plants : शेतकऱ्यांनी टिकवलेय औषधी पानपिंपळीचे अस्तित्व

कैर

हे बारमाही जास्त-फांद्या असलेले, पाने नसलेले झुडूप आहे. शेताच्या बांधावर आणि शुष्क आणि अर्ध-शुष्क प्रदेशातील पडीक जमिनीवर आढळून येते.

मातीची धूप नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त वृक्ष मानला जातो.फळंचा उपयोग भाजी, लोणचे आणि मसाले निर्मितीमध्ये केला जातो. फळे प्रथिने, कर्बोदके आणि लोह, कॅल्शिअम आणि फॉस्फरस इ. खनिजांनी समृद्ध असतात.

कवठ

कवठ हे लहान ते मध्यम आकाराचे, काटेरी फांद्या, खडबडीत आणि काटेरी झाड आहे. शेताच्या बांधावर हमखास आढळून येणाऱ्या या झाडाची तीव्र दुष्काळाचा ताण सहन करण्याची क्षमता असते.

कवठाच्या फळांमध्ये पेक्टिनचे प्रमाण जास्त असल्याने जेली बनविण्यासाठी उपयोग होतो. तसेच यापासून पावडर, स्क्वॅश, सरबत, पेय, जॅम, क्रीम, टॉफी, कॅण्डी, आरटीएस, लोणचे इत्यादी प्रक्रियायुक्त पदार्थ तयार केले जातात.

Medicinal Plants
Medicinal Plant Farming : औषधी वनस्पती मूल्यसाखळी प्रकल्पांना २५ लाखापर्यंत अनुदान

निवडुंग

निवडुंगमध्ये तीव्र दुष्काळ सहन करण्याची क्षमता असते. शेताच्या कुंपणाकरिता या काटेरी झुडुपाची लागवड केली जाते.

निवडुंगला मे-जून महिन्यात लाल रंगाची मधुर फळे येतात. फळे विविध खनिजे आणि जीवनसत्त्वयुक्त असतात. विविध पक्षी, प्राणी या फळांवर आपली उपजीविका करतात.

सिंधी / भारतीय खजूर

हा नारळाच्या कुळातील असून शेताच्या बांधावर, ओढे, नदी काठी ही झाडे आढळून येतात. यापासून पोटाच्या आरोग्याकरीता उपयोगी असणाऱ्या नीरा नावाच्या पेयाचे उत्पादन केले जाते. याच्या फळांवर विविध पक्षी, प्राणी आपली उपजीविका करतात.

खिरणी

हा सदाहरित, मध्यम आकाराचा, मंद गतीने वाढणारा वृक्ष आहे. याला फेब्रुवारी-मार्चमध्ये फुले येतात, तर फळे मे-जूनमध्ये पिकतात. फळे चवीला मधुर असतात. याची साल, बिया आणि फळे अनुक्रमे टॅनिन, तेल आणि जीवनसत्त्व ‘अ’ चे समृद्ध स्रोत आहेत. फळे आणि साल पोटाचे विकार, ताप, कुष्ठरोग, अल्सर, अपचन, मूत्रमार्गाचे विकार यावर गुणकारी आहेत.

करवंद

करवंद हे सदाहरित काटेरी झुडूप असून शुष्क, उष्ण कटिबंध आणि उप-उष्ण कटिबंधीय प्रदेशात डोंगराळ भागात आढळते.

फळे ‘क’ जीवनसत्त्व आणि लोह, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम आणि फॉस्फरस इ. खनिजांनी समृद्ध असतात.

परिपक्व फळांमध्ये पेक्टिनचे प्रमाण जास्त असते. फळांचा वापर लोणचे, जेली, जॅम, स्क्वॅश, सरबत आणि चटणी बनवण्यासाठी केला जातो.

जांभूळ

हा सदाहरित वृक्ष शेताच्या बांधावर हमखास आढळून येतो.

फळे मधुमेह विकारावर गुणकारी असतात. फळांपासून स्क्वॅश, ज्यूस, जॅम, जेली इत्यादी अनेक प्रक्रियायुक्त उत्पादने तयार केली जातात.

डॉ. प्रदीप दळवे, ८९८३३ १०१८५,

(अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू फळपिके (अंजीर आणि सीताफळ) संशोधन प्रकल्प, जाधववाडी, ता. पुरंदर जि. पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com