Agri Expo 2025 : ‘अॅग्री एक्स्पो-२५’मध्ये दुसऱ्या दिवशी प्रचंड गर्दी

Agriculture Exhibition : विदर्भ, मराठवाड्यासह विविध जिल्ह्यांच्या कानाकोपऱ्यातून आलेले शेतकरी, रोजचे कष्टाचे शेतीकाम बंद ठेवून उत्सुकतेने आलेल्या शेतकरी महिला, कृषी नवतंत्राच्या शोधासाठी गावागावांमधून मित्रमंडळींसह येणारे युवा शेतकरी यामुळे ‘अॅग्री एक्स्पो-२५’मध्ये दुसऱ्या दिवशी प्रचंड गर्दी झाली.
Agri Expo
Agri Expo Agrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News : विदर्भ, मराठवाड्यासह विविध जिल्ह्यांच्या कानाकोपऱ्यातून आलेले शेतकरी, रोजचे कष्टाचे शेतीकाम बंद ठेवून उत्सुकतेने आलेल्या शेतकरी महिला, कृषी नवतंत्राच्या शोधासाठी गावागावांमधून मित्रमंडळींसह येणारे युवा शेतकरी यामुळे ‘अॅग्री एक्स्पो-२५’मध्ये दुसऱ्या दिवशी प्रचंड गर्दी झाली.

छत्रपती संभाजीनगरमधील जालना रोडच्या केंब्रिज स्कूलजवळील श्रीराम मंदिर ट्रस्टचे मैदान सध्या शेतकऱ्यांनी गजबजले आहे. येथे ‘सकाळ-अॅग्रोवन’चे भव्य ‘अॅग्री एक्स्पो-२५’ प्रदर्शन भरले आहे. या प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक ‘अॅग्रीकॉन न्यूट्रिटेक लिमिटेड’ हे आहेत. तसेच ‘एन्जोकेम अॅग्रो केमिकल इंडस्ट्रीज (नाशिक), पवन अॅग्रो, पितांबरी प्रॉडक्ट्‌स प्रायव्हेट लिमिटेड, बी. जी. चितळे डेअरी (भिलवडी, जि. सांगली),

Agri Expo
Agri Expo 2025 : यंत्रे- अवजारे सांगतात यांत्रिकीकरणाची दिशा

आत्मा (कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा), महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण-मेडा (महाऊर्जा), महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ (एमएआयडीसी) या प्रदर्शनाचे सहप्रायोजक आहेत. याशिवाय, रोहितकृषी इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड (पुणे) व इफ्को (इंडियन फार्मर्स फर्टिलायझर्स को-ऑपरेटिव्ह लिमिटेड) हे यंदाच्या प्रदर्शनाचे गिफ्ट स्पॉन्सरर्स आहेत.

Agri Expo
Agri Expo 2025 : बारामती केव्हीकेच्या ‘एआय’ शेतीबाबत शेतकऱ्यांत उत्सुकता

निविष्ठा उद्योगापासून हार्वेस्टरपर्यंत आणि लागवडीपासून ते प्रक्रिया, विपणन व निर्यातीपर्यंत शेतीमधील सर्व क्षेत्रांना हे प्रदर्शन स्पर्श करते आहे. या चारदिवसीय उपक्रमाला दोन दिवस उदंड प्रतिसाद मिळाला. आज आणि उद्यादेखील (ता. १३) सकाळी दहा ते सायंकाळी सात वाजेपर्यंत प्रदर्शन चालू राहणार आहे. प्रदर्शनात रोज एका शेतकऱ्याला पेरणी यंत्राची भेट दिली जाते आहे. त्यासाठी काढल्या जात असलेल्या सोडतीचे कूपन भरण्यासाठी झुंबड उडत आहे.

कृषी प्रदर्शनाला भेट देणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या पेरणी यंत्राच्या दुसऱ्या दिवशीच्या सोडतीत सचिन सूर्यभान वानखेडे (मु.पो. चिखलठाणा, ता.जि. छत्रपती संभाजीनगर) यांना हे यंत्र जाहीर करण्यात आले. एन्जोकेम अॅग्रो केमिकल इंडस्ट्रीजचे टेरीटरी सेल्स मॅनेजर राहुल फलके, अॅग्रोस्टार कंपनीचे झोनल मॅनेजर योगेश पाटील, बीकेटी टायर या कंपनीच्या जालन्याचे वितरक प्राजक्ता अग्रवाल, व्यवस्थापक अमेय देशपांडे आणि ‘सकाळ’ मराठवाडा आवृत्तीचे संपादक संतोष शाळीग्राम, ‘अॅग्रोवन’चे उपसरव्यवस्थापक बाळासाहेब खवले यांच्या उपस्थितीत ही सोडत काढण्यात आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com