Punjab Bandh : शेतकऱ्यांकडून ‘पंजाब बंद'

Farmer Protest : पिकांना किमान आधारभूत किंमत मिळावी यांसह विविध मागण्यांसाठी केंद्र सरकारविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी सोमवारी (ता.३०) सकाळी ७ ते दुपारी ४ या वेळेत ‘पंजाब बंद’ची घोषणा केली होती.
Farmer Protest
Farmer ProtestAgrowon
Published on
Updated on

Punjab News : पिकांना किमान आधारभूत किंमत मिळावी यांसह विविध मागण्यांसाठी केंद्र सरकारविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी सोमवारी (ता.३०) सकाळी ७ ते दुपारी ४ या वेळेत ‘पंजाब बंद’ची घोषणा केली होती. या राज्यव्यापी बंदमुळे राज्यातील रस्ते आणि रेल्वे वाहतूक विस्कळित झाली.

शंभू आणि खनौरी सीमेवर संयुक्त किसान मोर्चा (गैर-राजकीय) आणि किसान मजदूर मोर्चा या दोन शेतकरी संघटनांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या निषेधादरम्यान सोमवारी पंजाब बंदची हाक देण्यात आली होती. ‘पंजाब बंद’च्या आंदोलनानंतर पत्रकार परिषदेला संबोधित करताना, शेतकरी नेते शरवणसिंग पंढेर यांनी सांगितले, की पंजाबमधील रहिवाशांनी राज्यव्यापी बंदला उत्स्फूर्त पाठिंबा दिला.

Farmer Protest
Farmer Protest : पंजाबमध्ये उद्या रेल्वे रोको, बाजारपेठाही राहणार बंद, अकाली दल-काँग्रेसने आपली भूमीका स्पष्ट करावी; पंढेर यांचे आवाहन

२८० हून अधिक नाकेबंदी लावण्यात आली. तर, शेतकरी नेते सर्वन सिंह पंढेर म्हणाले, की बंदला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. संपाला वाहतूकदार, कर्मचारी संघटना, व्यापारी संघटना आणि धार्मिक संघटनांकडून जोरदार पाठिंबा मिळाल्याचा दावा पंढेर यांनी केला. आपत्कालीन आणि इतर अत्यावश्यक सेवा सुरळीत सुरू होत्या.

डल्लेवाल यांच्या उपोषणाला ३५ दिवस

दरम्यान, ७० वर्षीय शेतकरी नेते जगजितसिंग डल्लेवाल यांच्या उपोषणाला सोमवारी ३५ दिवस पूर्ण झाले. डल्लेवाल यांनी वैद्यकीय उपचार नाकारले असून, सरकार जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचे डल्लेवाल यांनी सांगितले आहे.

Farmer Protest
Farmer Protest : एमएसपीनुसार शेतमाल घेण्यासाठी आग्रह; जालन्यात शेतकऱ्यांचे आंदोलन

संयुक्त किसान मोर्चा (गैर-राजकीय) आणि किसान मजदूर मोर्चाच्या नेतृत्वाखाली शेतकरी १३ फेब्रुवारीपासून पंजाब आणि हरियाणामधील शंभू आणि खनौरी सीमेवर तळ ठोकून आहेत. एमएसपी व्यतिरिक्त, शेतकरी कर्जमाफी, पेन्शन, वीज दरात वाढ करू नये, पोलिस खटले मागे घ्यावेत आणि २०२१ लखीमपूर खेरी हिंसाचारातील पीडितांना न्याय द्यावा, अशा मागण्या शेतकऱ्यांनी केल्या आहेत.

प्रवासी वाहतूक कोलमडली

चंदीगड : ‘पंजाब बंद’मुळे वाहतूक व्यवस्था कोलमडल्याने पंजाबमधील अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळित झाले आहे. राज्यातील अनेक ठिकाणी रेल्वे आणि रस्ते वाहतूक विस्कळित झाली. रेल्वेने राज्यातून जाणाऱ्या अनेक गाड्या रद्द केल्या आहेत. अनेक ठिकाणी सार्वजनिक वाहतूक बंद राहिली, तर बहुतांश खासगी बसचालकांनी बंदच्या आवाहनाचे पालन करत सेवा स्थगित केली. शेतकऱ्यांनी पंजाब बंदमुळे अनेक रस्त्यांवर धरणे आंदोलने करण्यात आली.

त्यामुळे प्रवाशांची वाहतूक कोंडी झाली. एमएसपीला कायदेशीर हमी देण्याच्या शेतकऱ्यांच्या मागणीवर केंद्राने कार्यवाही न केल्याबद्दल संयुक्त किसान मोर्चा (गैर-राजकीय) आणि किसान मजदूर मोर्चा यांनी आठवड्याभरापूर्वी बंदची हाक दिली होती. अंबालासह राज्यातील काही शेजारच्या भागातही बंदचा परिणाम दिसून आला. अंबाला ते चंदीगड, मोहाली, पटियाला आणि पंजाबमधील इतर जवळपासच्या शहरांमध्ये दररोज प्रवास करणारे शेकडो प्रवासी या बंदमुळे विस्कळित झाले होते.

- पटियाला-चंदीगड राष्ट्रीय महामार्गावरील वाहनांच्या वाहतुकीवर परिणाम झाला.

- अमृतसरच्या गोल्डन गेटवर, शहराच्या प्रवेश बिंदूजवळ मोठ्या संख्येने शेतकरी एकत्रित आले.

- भटिंडाच्या रामपुरा फुलमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले.

- अनेक ठिकाणी धान्य बाजार बंद ठेवण्यात आले होते

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com