Farmer Protest : एमएसपीनुसार शेतमाल घेण्यासाठी आग्रह; जालन्यात शेतकऱ्यांचे आंदोलन

Agriculture Products buy as per MSP : हरियाणा - दिल्ली बॉर्डरवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या मागण्या प्रधानमंत्र्यांनी त्वरित मान्य करून देशभरात एमएसपीनुसार शेतकऱ्यांचा माल विकत घ्यावा, जालना -नांदेड समृद्धी महामार्ग पूर्वनियोजित मार्गानेच घेऊन जावा.
Farmer Protest
Farmer ProtestAgrowon
Published on
Updated on

Jalna News : हरियाणा - दिल्ली बॉर्डरवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या मागण्या प्रधानमंत्र्यांनी त्वरित मान्य करून देशभरात एमएसपीनुसार शेतकऱ्यांचा माल विकत घ्यावा, जालना -नांदेड समृद्धी महामार्ग पूर्वनियोजित मार्गानेच घेऊन जावा,

रामनगर सहकारी साखर कारखाना शासनाच्या व शिखर बँकेच्या मदतीने पूर्ववत सहकार तत्वावर सुरू करा आदी मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी ( ता.२४) निदर्शने करण्यात आली.

Farmer Protest
Farmer Protest : ईसरवाडी फाटा येथे रस्ता रोको आंदोलन

जिल्हा सेक्रेटरी कॉम्रेड प्रल्हाद पडूळ,सीटूचे अनिल मिसाळ, सदाशिव साबळे, राहुल चाबुकस्वार, वैजिनाथ लोंढे, अनिल गायकवाड आदी उपस्थित होते. शेतकऱ्यांचे आंदोलन शांततेत सुरू आहे.

Farmer Protest
Farmers Protest : मोठ्या आंदोलनासाठी सज्ज, लवकरच घोषणा करू : पंढेर

परंतु केंद्र सरकार या आंदोलनाची दखल घेत नाही. या आंदोलनाच्या मागण्या केंद्र सरकारने मान्य करून त्यावर त्वरित अंमलबजावणी करावी. रामनगर सहकारी साखर कारखान्यासाठी, ग्रामीण शेतकऱ्यांनी अत्यल्प भावातजमिनी दिल्या.

स्वर्गीय बाळासाहेब पवार यांच्या पुढाकाराने हा रामनगर कारखाना सुरू झाला. अत्यल्प कर्ज कारखान्यावर असताना राजकीय अनास्थेपोटी एकेकाळी फायद्यात असलेला कारखाना बंद पडला. तो कारखाना पूर्ववत शासनाच्या आणि शिखर बँकेच्या सहकार्याने सुरू करावा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com