Dabka Substation Fire : डाबका ३३ केव्ही उपकेंद्राला भीषण आग; सोलार पॅनेल जळून खाक

Solar Plant Burnt In Fire : मेळघाटच्या धारणी तालुक्याअंतर्गत येणाऱ्या डाबका रेल्वे नावाने सुप्रसिद्ध असलेल्या डाबका ३३ केव्ही उपकेंद्रात अचानक आग लागली.
Fire
Fire Agrowon
Published on
Updated on

Amravati News : मेळघाटच्या धारणी तालुक्याअंतर्गत येणाऱ्या डाबका रेल्वे नावाने सुप्रसिद्ध असलेल्या डाबका ३३ केव्ही उपकेंद्रात अचानक आग लागली. यात कोट्यवधी रुपयांच्या निधी अंतर्गत उभारण्यात आलेल्या सोलार प्लांट पॅनेल जळून राख झाले.

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या महावितरण उपविभाग धारणी अंतर्गत येणाऱ्या ३३ केव्ही डाबका उपकेंद्रात अचानक आग लागली. उपकेंद्राच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात जिकडे-तिकडे गवताचे आणि कचऱ्याचे प्रमाण अधिक वाढल्यामुळे क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले.

Fire
Fire Safety Issue : नागपूर जिल्हा परिषदेत अग्निसुरक्षेची दुर्लक्ष: यंत्रे कालबाह्य

डाबका गावातील ग्रामस्थांना माहिती मिळताच त्यांनी उपकेंद्राकडे धाव घेतली आणि मिळेल त्या साधनांच्या मदतीने आग विझविण्याचा प्रयत्न सुरू केला. अवघ्या चार ते पाच वर्षांपूर्वी शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या निधी अंतर्गत उभारण्यात आलेल्या सोलर प्लांटचचे काही पॅनेल या आगीमध्ये जळाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

Fire
Forest Fire : वणव्यात आंब्याची दीड हजार झाडे होरपळली

डाबका येथील ३३ केव्ही उपकेंद्र गेल्या बराच दिवसांपासून बेवारस अवस्थेमध्ये पडल्यामुळे सोबतच अतिसंवेदनशील क्षेत्र असल्यानंतरही परिसरामध्ये जिकडे-तिकडे गवत आणि कचऱ्याचे साम्राज्य पसरल्याने सदरची घटना घडून आली, असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.

घडलेल्या अग्नी तांडवामध्ये शासनाच्या किती रुपयांचा मुद्देमाल जळून खाक झाला याची अधिकृत माहिती प्राप्त झाली नसून वरिष्ठ प्रशासनाने याबाबत माहिती घेऊन बेजबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

मी सुटीवर आहे. डाबका येथील ३३ केव्ही उपकेंद्रावर आग लागल्याची माहिती प्राप्त झाली होती. उपकेंद्रावर फक्त कचरा जळाला असून सोलर प्लांटचे नुकसान झाले नाही. मी नव्याने रुजू झालो आहे म्हणून मला सोलर प्लांट का बंद आहे, याबाबत माहिती नाही.
- चक्रधर पटेल, सहायक अभियंता, डाबका उपकेंद्र

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com