Fire Safety Issue : नागपूर जिल्हा परिषदेत अग्निसुरक्षेची दुर्लक्ष: यंत्रे कालबाह्य

Nagoue ZP : आगीपासून बचाव करणारी यंत्रणाच नसल्याने जिल्हा परिषदेची सुरक्षा धोक्यात आली आहे.
Fire Safety
Fire SafetyAgrowon
Published on
Updated on

Nagpur News : जिल्हा परिषदेची अग्निशमन यंत्रणा कालबाह्य झाली आहे. आग विझविणाऱ्या सिलिंडरची मुदत संपूनही ते नव्याने भरण्यात आले नाही. आगीपासून बचाव करणारी यंत्रणाच नसल्याने जिल्हा परिषदेची सुरक्षा धोक्यात आली आहे. शहरातील इमारतींना मान्यता देताना त्याची सुरक्षा आधी तपासली जाते. मात्र, शासकीय कार्यालयाबाबतीत सरकार उदासीन असल्याचे दिसून येते.

जिल्हा परिषदेतील आग विझविणाऱ्या सिलिंडरची मुदत संपूनही ते नव्याने भरण्यात आले नाही. जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीमधील सीईओंचा कक्ष असलेल्या माळ्यासह जवळपास सर्वच ठिकाणच्या अग्निशमन यंत्रांची मुदत संपल्यानंतरही रिफिलिंग केली जात नाही. जिल्हा परिषदेमध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांसह दररोज शेकडो नागरिक आपल्या समस्या तक्रारी घेऊन येतात. त्यातच सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत.

Fire Safety
Nagpur-Ratnagiri Highway : नागपूर-रत्नागिरी महामार्गासंदर्भात शेतकऱ्यांनी नोंदविल्या हरकती

उन्हाळ्यामध्ये आगीच्या घटना वाढतात. आगीसारखी कुठलीही अनुचित घटना घडल्यावर त्यावर वेळीच नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन उपकरण उपयोगी ठरतात. परंतु हेच अग्निशमन उपकरण कालबाह्य असल्यास ते कुठल्याच कामाचे ठरत नाही. जिल्हा परिषदेतील सिलिंडरची मुदत संपूनही ते भरण्यात आले नाही. भविष्यात आगीच्या घटना घडल्यास मोठी हानी होऊ शकते.

Fire Safety
Nagpur ZP Budget : नागपूर जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प ४० कोटींच्या घरात

यंत्र हाताळणीबाबत माहितीच नाही

मुख्यालयातील तसेच प्रत्येक शासकीय कार्यालयातील सर्वच इमारतींमध्ये अग्निशामक यंत्र भिंतीला वर्षानुवर्षे लावलेले असते. परंतु संकटसमयी ते हाताळायचे कसे याची माहिती अनेकांना नसल्याची धक्कादायक माहिती अनेक शासकीय कार्यालयांमध्ये असल्याचे सांगण्यात येते. प्रत्येक शासकीय कार्यालयांमध्ये हे यंत्र जणू ‘शो पीस’ ठरले आहेत.

तपासणी करणारी यंत्रणाच लुळी

सहा महिन्यांनंतरही यंत्राची तपासणीच केली जात नाही. गॅसची वर्षभराची एक्स्पायरी डेट असते. एका वर्षांनी गॅस बदलणे आवश्यक असते. ऑडिटमध्ये त्रुटी निघू शकते. या यंत्रावर रिफिलिंग डेट (पुनर्भरण) व ड्यू डेटचे (एक्स्पायरी डेट) स्टिकर असते, असे स्टिकर यंत्रावर आढळले, परंतु काही ठिकाणी त्यावरील मजकूर काहीच दिसत नाही. देखभालीबाबत निष्काळजीपणा झाल्यास स्फोट होण्याची शक्यता अधिक असते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com