Marut Dronetech Partnership with IFFCO : ‘मारुत ड्रोनटेक’ची ‘इफ्को’शी धोरणात्मक भागीदारी

Partnership Update : हैद्राबाद येथे इंडियन फार्मर्स फर्टिलायझर को-ऑपरेटिव्ह लिमिटेड (IFFCO) यांनी मारुत ड्रोनटेक प्रा. लि. या कंपनीसोबत धोरणात्मक भागीदारी केली आहे.
Partnership
PartnershipAgrowon

Hyderabad News : येथे इंडियन फार्मर्स फर्टिलायझर को-ऑपरेटिव्ह लिमिटेड (IFFCO) यांनी मारुत ड्रोनटेक प्रा. लि. या कंपनीसोबत धोरणात्मक भागीदारी केली आहे. ही भागीदारी आंध्र प्रदेश आणि तेलंगण या राज्यांतील शेतकऱ्यांमध्ये ड्रोनआधारित कृषी उद्योजकतेला चालना देण्यासाठी महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. या ड्रोनआधारित सेवा ५ लाख एकर क्षेत्रापर्यंत पोहोचविण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे.

Partnership
Pre Monsoon Rain : विदर्भ, मराठवाड्यासह अनेक ठिकाणी पूर्वमोसमी पाऊस

गुरुवारी (ता. ९) झालेल्या कराराच्या अटींनुसार, मारुत ड्रोनटेक हे ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करतेवेळी ‘इफ्को’ कंपनीने विकसित केलेल्या कृषी निविष्ठा श्रेणी वापरणार आहे. या उपक्रमातून पीक उत्पादकता वाढण्यास मदत होणार असून, पर्यावरणावरील विपरीत परिणाम कमी होण्यास मदत होईल.

ज्या शेतकऱ्यांनी या पूर्वीच ड्रोन तंत्रज्ञानासाठी गुंतवणूक केलेली आहे, त्यांच्या सेवेसाठी मागणी निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जाती. त्याच प्रमाणे ग्रामीण तरुणांमधून नवीन ड्रोन सेवा प्रदाते तयार करण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल. यातून स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, आणि शेतकऱ्यांची फवारणीही प्रति एकर तत्त्वावर केली जाईल. त्यामुळे हे तंत्रज्ञान अल्पभूधारक शेतकऱ्यांनाही परवडू शकेल.

Partnership
#Shorts: 'मारुत'चा एजजी ३६५ ड्रोन लाभार्थीना प्रदान | ॲग्रोवन

‘आयआयटी’च्या तीन माजी विद्यार्थ्यांनी २०१९ मध्ये स्थापन केलेली मारुत ड्रोनटेक ही भारतातील आघाडीची ड्रोन उत्पादक कंपनी आहे. या करारावेळी बोलताना मारुत ड्रोनटेकचे सह-संस्थापक आणि कार्यकारी अधिकारी प्रेम कुमार म्हणाले, की या निविष्ठा उत्पादन आणि आधुनिक तंत्रज्ञान यांच्या सहकार्यातून शेती पद्धतींमध्ये संकल्पनात्मक बदल घडून येतील.

सध्या शेतीतील कामांसाठी जाणवणारी मनुष्यबळांची कमतरता ही मोठी समस्या असून, आधुनिक तंत्रज्ञान हे त्यावरील उत्तर ठरू शकते. यामध्ये कीडनाशकांशी मानवाशी होणारा संपर्क कमी होणार असून, त्यांच्या आरोग्याच्या समस्या कमी होण्यास मदत होईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com