Admission Criteria: कृषी पदवी अभ्यासक्रमासाठी गुणांची अट शिथिल

Agriculture Degree Admission: कृषी विद्यापीठातील पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विशिष्ट गुणांची अट शिथिल करत खुल्या प्रवर्गासाठी ४५ टक्के आणि आरक्षित प्रवर्गासाठी ४० टक्के गुण आवश्यक असल्याचा बदल करण्यात आला आहे.
Agriculture Admission 2025
Agriculture Admission 2025Agrowon
Published on
Updated on

Mumbai News: कृषी विद्यापीठातील पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विशिष्ट गुणांची अट शिथिल करत खुल्या प्रवर्गासाठी ४५ टक्के आणि आरक्षित प्रवर्गासाठी ४० टक्के गुण आवश्यक असल्याचा बदल करण्यात आला आहे.

कृषी पदवीच्या संधीपासून इच्छुक विद्यार्थी वंचित राहू नये यासाठी महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेच्या बैठकीत हा धोरणात्मक निर्णय घेतल्याची माहिती कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली.

Agriculture Admission 2025
Agriculture Admission: कृषी शिक्षणाच्या प्रवेशासाठी पात्रतेत शिथिलता; खुल्या गटासाठी ४५ टक्के तर आरक्षित प्रवर्गासाठी ४० टक्के गुण पुरेसे

कृषी विद्यापीठातील बी.एस्सी. (ऑनर्स) कृषी, उद्यानविद्या, बीएफएससी, वनशास्त्र, बी.टेक. कृषी अभियांत्रिकी, अत्रशास्त्र, जैवतंत्रज्ञान, कृषी व्यवसाय व्यवस्थापन आणि सामुदायिक विज्ञान अशा एकूण नऊ पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आतापर्यंत खुल्या वर्गातील उमेदवारांसाठी इयत्ता बारावी विज्ञानमध्ये ५० टक्के गुणांची अट होती. महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेची ११८ वी बैठक नुकतीच पार पडली.

Agriculture Admission 2025
Agriculture Degree Admission: कृषी पदवीसाठी अर्ज भरण्यास रविवारपर्यंत मुदतवाढ

या बैठकीत ही अट शिथिल करत खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ४५ टक्के आणि आरक्षित प्रवर्गासाठी ४० टक्के गुणांची अट लागू करण्यात आली आहे. तसेच प्रवेश अर्जासाठी अंतिम मुदत २७ जुलैपर्यंत असून, इच्छुक विद्यार्थ्यांनी https://cetcell.mahacet.org या संकेतस्थळावर प्रवेशासाठी अर्ज सादर करावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे.

बारावीचे गुण ‘कृषी’मुळे वाढणार

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी विज्ञान अभ्यासक्रमात ‘कृषी (८०८)’ हा विषय शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना यापूर्वी पदवी प्रवेशात अधिभार मिळत नव्हता. आता महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेच्या ११५ व्या बैठकीत झालेल्या ठरावानुसार या विषयाला १० गुण अधिभार देण्यास सरकारने मान्यता दिली आहे. यामुळे अशा विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठीच्या गुणवत्तेत वाढ होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com