Market Price Vegetables : आंबा, वांगी, लसणाने बाजारपेठ फुलली, कसा आहे भाजीपाला दर?

Garlic : चटणीच्या हंगामामुळे लसणाला मागणी असल्याने दरात ३० ते ५० रुपयांची वाढ झाली आहे.
Market Price Vegetables
Market Price Vegetablesagrowon

Vegetables Market Price : कडक उन्हाचा परिणाम भाजीपाला मार्केटमध्येही सध्या दिसून येत आहे. अनेक फळभाज्याही बाजारातून कमी होताना दिसत आहेत. मागच्या आठवड्यात असलेल्या वांग्याच्या दरात काहीशी सुधारणा होत आहे. किलोला ३० ते ४० रुपयांची कमालीची वाढ झाली आहे. चटणीच्या हंगामामुळे लसणाला मागणी असल्याने दरात ३० ते ५० रुपयांची वाढ झाली आहे. कोथिंबीरसह अन्य भाज्यांची स्थानिक आवक ठप्प झाल्याने लातूर, कर्नाटक भागांतून बाजार समितीत आवक जास्त आहे.

थंड प्रदेशातील बारमाही गाजराची विक्री वाढली आहे. फळबाजारात आंबा, कलिंगड वगळता इतर फळांची फारशी आवक नाही. दीड महिना आधीच केसर आंबाही दाखल झाला आहे. आंध्र प्रदेशातून तोतापुरी आंब्याची आवक चांगली आहे. फूलबाजारात मागणीनुसार फुलांना दर मिळत आहे.

प्रतिकिलो रुपये भाजीपाला असा

टोमॅटो- १० ते १५, दोडका - ५० ते ६०, वांगी - ७० ते ८०, कारली - ४० ते ५०, ढोबळी मिरची ६० ते ८०, मिरची-८० ते ९०, फ्लॉवर ३० ते ४०, कोबी - १५ ते २०, बटाटा- २५ ते ३०, कांदा - २० ते २५, लसूण- १८० ते २००, आले- १०० ते १२०, लिंबू ३०० ते ६०० शेकडा, गाजर ३० ते ४०, बीन्स १२० ते १३०, गवार -८० ते १००, वरणा शेंगा ६० ते ८०, भेंडी- ५० ते ६०, काकडी ३० ते ५०, दुधी - २० ते ३०, हिरवा वाटाणा -७० ते ८०.

पालेभाज्या - १० ते १२, कोथिंबीर, मेथी (पेंढी) शेवगा - २ ते ३ रुपये नग. १८ ते २०.

फुले : झेंडू - ८० ते १००, निशिगंध ३००, गुलाब २५० ते २८०, गलांडा - - १०० ते १२०, शेवंती २५० ते ३००.

Market Price Vegetables
Mango Market : वाशी बाजारात दोन दिवस १ लाख आंबा पेट्या आवक

फळे : सफरचंद २५० ते ४००, संत्री १२० ते १३०, मोसंबी - ५० ते ८०, डाळिंब - १२० ते २००, चिकू - ६० ते ८०, पेरू- ५० ते ८०, खजूर -१५० ते २००, पपई- ४० ते ५०, मोरआवळा -१०० ते १२०, सीताफळ ८० ते १००, कलिंगड - ५० ते ६०, टरबूज -४० ते ६०, केळी - ५० ते ६० डझन, देशी केळी - ७० ते ८० डझन, किवी - १४० ते १५०, चिंच-१०० ते १४०, अननस - ४० ते ५०, अंजीर-८०-१००.

खाद्यतेल : सरकी - ११० ते ११५, शेंगतेल १७६ ते १८२, सोयाबीन - ११० ते ११५, पामतेल - ११० ते ११६, सूर्यफूल - ११० ते ११५.

कडधान्य : हायब्रीड ज्वारी ३१ ते ३७, बार्शी शाळू ३२ ते ५५, गहू ३२ ते ४०, हरभराडाळ ७८ ते ८३, तूरडाळ- १५५ ते १६५, मूगडाळ - ११० ते ११५, मसूरडाळ - ७८ ते ८२, उडीदडाळ- १२२ ते १३०, हरभरा - ७०, मूग - १०० ते ११०, मटकी- १०० ते ११०, मसूर- ७०, फुटाणाडाळ - ८३ ते ८५, चवळी - ८८, हिरवा वाटाणा - ९०, छोला -१४० ते १६०.

कोकणी तुटवडा, कर्नाटकी फुल्ल

शहरात जिकडे-तिकडे विक्रीला आंबेच दिसत आहेत. काही मोजक्या विक्रेत्यांकडे कोकणातील देवगड, रत्नागिरी असा हापूस विक्रीला आहे, तर ठिकठिकाणी विक्रेत्यांकडे मोठ्या प्रमाणात कर्नाटकी हापूस विक्रीला आहे. सध्या कोकणी हापूस आंब्याचा काहीसा तुटवडा असून, दर चढे आहेत. त्या तुलनेत आवक मोठी असल्याने कर्नाटकातील हापूसचे दर कमी आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com