Kolhapur Lok Sabha 2024 : कोल्हापूर ७१ तर हातकणंगलेमध्ये ६८ टक्के चुरशीने मतदान

Lok Sabha Election : कोल्हापूर मतदारसंघातून प्रमुख उमेदवारांसह २३ तर हातकणंगले मतदारसंघातून २७ उमेदवार रिंगणात आहेत.
Kolhapur Lok Sabha 2024
Kolhapur Lok Sabha 2024agrowon

Kolhapur Election : कोल्हापूर जिल्ह्यातील ४७ कोल्हापूर व ४८ हातकणंगले या दोन मतदारसंघात आज शांततेत व सुरळीत मतदान पार पडले. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात ७१ टक्के मतदान तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे अंदाजे ६८.०७ टक्के मतदान झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांनी दिली.

दोन्ही मतदार संघात काटाजोड निवडणुकीचा प्रचार झाल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्‍ह्यातील सर्वच मतदान केंद्रावर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. काही संवेदनशील केंद्रावर शस्त्रधारी बंदोबस्त होता. मतदानाची वेळ संपल्यानंतरही काही केंद्रांवर उशिरापर्यंत रांगा होत्या.

कोल्हापूर मतदारसंघातून प्रमुख उमेदवारांसह २३ तर हातकणंगले मतदारसंघातून २७ उमेदवार रिंगणात आहेत. कोल्हापुरात उमेदवार जास्त असले तरी प्रमुख लढत विद्यमान खासदार व महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक आणि महाविकास आघाडीतील काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्यात आहे.

हातकणंगलेमध्ये विद्यमान खासदार व महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने, माजी खासदार राजू शेट्टी, महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे शिवसेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील-सरूडकर व वंचित बहुजन आघाडीचे डी. सी. पाटील अशी चौरंगी लढत आहे. काल चुरशीने मतदान झाले. सायंकाळनंतर अनेक केंद्रांवर मतदारांच्या लांबलचक रांगा होत्या.

केंद्राबाहेर मतदारांच्या स्वागतासाठी त्या त्या परिसरातील प्रमुख नेते, कार्यकर्ते थांबून होते. अनेक नेत्यांनी आपापल्या बालेकिल्ल्यातील परिस्थितीवर लक्ष ठेवले. कोल्हापूर मतदारसंघात सकाळी नऊला ११ टक्के मतदान झाले होते. सकाळी मतदारांचा प्रतिसाद चांगला होता.

मतदान प्रक्रिया संपल्यानंतर मतदान यंत्रे आणि मतदान साहित्य विधानसभानिहाय असणाऱ्या संकलन केंद्रावर आणण्यात आले. तेथून ही मतदानयंत्रे जीपीएस असणाऱ्या कार्गो वाहनातून स्ट्राँगरूममध्ये रात्री उशिरा आणण्यात आले.

Kolhapur Lok Sabha 2024
Kolhapur Kharip Crop : यंदा पाऊस चांगला! खरिपाच्या क्षेत्रात होणार वाढ, धुळवाफ पेरणीची तयारी

कोल्हापूर मतदारसंघातील मतदानयंत्रे रमणमळा येथील शासकीय धान्य गोदामात ठेवण्यात आले आहेत, तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील मतदानयंत्रे राजाराम तलाव येथील पाटबंधारे विभागाच्या गोदामात ठेवण्यात येणार आहेत. मतदानयंत्रे ठेवण्यापूर्वी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनकडून याची पडताळणी करण्यात आली. त्रिस्तरीय सुरक्षा यंत्रणेत स्ट्राँगरूममधील मतदानयंत्रे ठेवण्यात आली आहेत.

आचारसंहिता भंगाच्या १३ तक्रारी; ५ गुन्हे दाखल

कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात आज मतदान प्रक्रिये दरम्यान सामाजिक माध्यमांवर आचारसंहिता भंगाची १३ प्रकरणे निदर्शनास आली. यापैकी ५ गुन्हे दाखल करण्यात आले असून ८ प्रकरणांवर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु असल्याची माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com