Latur APMC : व्यापारी, खरेदीदारांच्या वादात अडत बाजार बंद

Market Closed Update : अडत व्यापाऱ्यांनी बाजार बंदचे नेहमीचेच हत्यार उपसले आहे. यामुळे दोन दिवसांपासून येथील अडत बाजार बंद असून व्यापारी व खरेदीदारांच्या वादाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.
Market Closed
Market ClosedAgrowon
Published on
Updated on

Latur News : अडत व्यापाऱ्यांकडून खरेदीदार शेतीमालाची खरेदी करतात आणि त्याचे पेमेंट त्यांना वेळेवर देत नाहीत. काही खरेदीदार व्यापाऱ्याचे पैसे बुडवतात. यामुळे येथील उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार समितीत नेहमीच वाद होतात. त्याचा परिणाम बाजारातील व्यवहारावर होतात व व्यापारी अडत बाजार बंद ठेवतात. आता खरिपाच्या तोंडावर पुन्हा हा वाद उफाळला असून अडत व्यापाऱ्यांनी बाजार बंदचे नेहमीचेच हत्यार उपसले आहे. यामुळे दोन दिवसांपासून येथील अडत बाजार बंद असून व्यापारी व खरेदीदारांच्या वादाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

येथील अडत बाजारात दररोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. शेजारच्या कर्नाटक राज्यापासून जिल्ह्यातील शेतकरी आपला शेतीमाल येथील बाजारात विक्रीसाठी आणतात. खरिपाच्या तोंडावर बियाणे, खते, कीटकनाशके खरेदीसह लहान मोठ्या तातडीच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी शेतकरी सोयाबीन व शेतीमाल बाजारात विक्रीसाठी घेऊन येत आहेत.

Market Closed
APMC Income : परभणी जिल्ह्यातील चार कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या उत्पन्नात तूट

काही शेतकऱ्यांकडे दोन हंगामातील सोयाबीन असून भाववाढीची अपेक्षा न राहिल्याने हे शेतकरी ते विक्रीसाठी बाजारात घेऊन येत आहेत. यामुळे बाजारात शेतकऱ्यांची गर्दी वाढलेली असतानाच व्यापारी व खरेदीदारांतील पेमेंटचा वाद पुन्हा उफाळून आला आहे. काही खरेदीदार व्यापाऱ्यांकडून मालाची खरेदी करतात व त्यांना त्याचे पेसेच देत नाहीत. व्यापाऱ्यांचे पैसे बुडवण्यावरच खरेदीदारांचा भर असतो. यातील अनेक व्यवहार तोंडी असतात. कागदावर नसल्याने त्यात बाजार समितीला हस्तक्षेप करता येत नाहीत.

बाजार समितीला अडत व्यापारी कर देतात आणि समितीला केवळ शेतकऱ्यांच्या तक्रारीवर कारवाई करण्याचे अधिकार आहेत. याचा फायदा घेऊन काही वर्षात खरेदीदारांनी व्यापाऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा चुना लावला आहे. तरीही बाजार समितीने पुढाकार घेऊन परिपत्रक काढले असून चोवीस तासांमध्ये पेमेंट द्यावे, असे बंधन खरेदीदारावर घातले आहे. तरीही खरेदीदार व व्यापाऱ्यांतील पेमेंटचा वाद कायम असून दोन दिवसांपासून अडत बाजारातील व्यवहार ठप्प आहे.

Market Closed
Pune APMC : पुणे बाजार समितीमधील गैरप्रकार विधानसभेत गाजणार

बाजार बंद केला कोणी?

अडत असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी बाजार समितीच्या परिपत्रकानुसार चोवीस तासांत खरेदीदारांनी पेमेंट द्यावे, अशी मागणी करत आम्ही बाजार बंद ठेवला नसल्याचे स्पष्ट केले. तर खरेदीदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनीही बाजार बंद न केल्याचे सांगत खरेदीदार व व्यापाऱ्यांतील व्यवहाराची वेगवेगळी गणिते असल्याचे स्पष्ट केले. विश्वासू खरेदीदाराला माल विक्री केल्यास असे प्रकार होणार नाहीत. कोणी थोडे जास्त पैसे दिल्यास त्याला माल विक्री केला जातो व असे प्रकार घडतात. २०१६ पासून दहा दिवसांनंतर पेमेंट करण्यात येत आहे. आता १९६७ चे परिपत्रक दाखवून २४ तासांत पेमेंटची मागणी केली जात असल्याचे खरेदीदार संघटनेचे म्हणणे आहे.

पाच तक्रारी अन् कोट्यवधी अडकले

खरेदीदारांनी व्यापाऱ्याचे पेमेंट न दिल्याच्या बाजार समितीकडे पाच तक्रारी आल्या असून त्यातील एकाच खरेदीदारांने सव्वादोनशे कोटी अडकून ठेवल्याचा प्रकार घडल्याचे सांगण्यात आले. उर्वरित चार तक्रारी चार ते दहा कोटींच्या आहेत. मोठ्या संख्येने तक्रारी नसल्या तरी बाजारात अशा अनेक घटना सातत्याने घडत आहेत. यातील बहुतांश व्यवहाराच्या नोंदी नाहीत. तोंडी व्यवहार असल्याने खरेदीदार व्यापाऱ्यांकडे पैसे बुडवण्याचा प्रयत्न करतात. बाजार समितीला यात काहीच हस्तक्षेप करता येत नाहीत. यामुळे वादातून तोडगा काढताना बाजार समितीचे दमछाक होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com