APMC Income : परभणी जिल्ह्यातील चार कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या उत्पन्नात तूट

APMC Update : सन २०२३-२४ च्या आर्थिक पत्रकानुसार परभणी जिल्ह्यातील ११ पैकी जिंतूर, सेलू, पालम, पूर्णा या ४ कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे उत्पन्न कमी आणि खर्च जास्त झाला आहे.
`APMC Market
APMC MarketAgrowon
Published on
Updated on

Parbhani News : सन २०२३-२४ च्या आर्थिक पत्रकानुसार परभणी जिल्ह्यातील ११ पैकी जिंतूर, सेलू, पालम, पूर्णा या ४ कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे उत्पन्न कमी आणि खर्च जास्त झाला आहे. त्यामुळे या बाजार समित्यांच्या उत्पन्नात तूट आली आहे. उर्वरित ७ कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा वाढावा (नफा) नुसार मानवत, बोरी, परभणी, ताडकळस, पाथरी, गंगाखेड, सोनपेठ असा क्रम आहे.

मागील (२०२३-२४ )आर्थिक वर्षात जिल्ह्यातील सर्व ११ कृषी उत्पन्न बाजार समित्यांना बाजार शुल्क (मार्केट फी) मधून १४ कोटी ९४ लाख २ हजार ६२ रुपये उत्पन्न मिळाले. बाजार शुल्क व इतर मिळून एकूण उत्पन्न १७ कोटी ६६ लाख २ हजार ८१९ रुपये मिळाले.तर एकूण १५ कोटी ४५ लाख ८० हजार ३३१ रुपये खर्च झाला.

`APMC Market
Jalgaon APMC : जळगाव बाजार समितीला अतिक्रमणांचा वेढा कायम

सानुग्रह अनुदान मिळालेल्या बाजार समित्यांमध्ये परभणी बाजार समितीला १३ लाख ५ हजार ९८८ रुपये, जिंतूर बाजार समितीला १० लाख ७९ हजार ४९६ रुपये, मानवत बाजार समितीला २२ लाख ६२ हजार ६३२ रुपये, सेलू बाजार समितीला २१ लाख ९७ हजार ५२४ रुपये, पाथरी बाजार समितीला २ लाख ८१ हजार ५८६ रुपये यांचा समावेश आहे.

उत्पन्नानुसार अ वर्गवारीमध्ये मानवत, परभणी, जिंतूर, बोरी, सेलू या ५ बाजार समित्यांचा समावेश आहे. ब वर्गवारीमध्ये पाथरी, सोनपेठ, पूर्णा या ३ बाजार समित्या आहेत. क वर्गवारीमध्ये गंगाखेड बाजार समिती आहे. ड वर्गवारीमध्ये पालम व ताडकळस या २ बाजार समित्या आहेत. परभणी जिल्ह्यातील ११ पैकी ७ कृषी उत्पन्न बाजार समित्यांअंतर्गंत १४ उपबाजार आहेत.

`APMC Market
APMC Market : ‘एपीएमसी’त दैनंदिन आवक २०० गाड्यांनी घटली

त्यात परभणी कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गंत झरी, पेडगाव, दैठणा, जिंतूर बाजार समिती अंतर्गंत चारठाणा, आडगाव बाजार, वाघी धानोरा, सावंगी म्हाळसा, सेलू बाजार समिती अंतर्गंत वालूर, देऊळगाव-गात, मानवत बाजार समिती अंतर्गंत रामपुरी बुद्रूक, रामेटाकळी, पाथरी अंतर्गंत हादगाव, पूर्णा अंतर्गंत कावलगाव, गंगाखेड अंतर्गंत राणीसावरगाव या उपबाजारांचा समावेश आहे. थेट पणन परवाने व खाजगी बाजारांमुळे जिल्ह्यातील अनेक कृषी उत्पन्न बाजार समित्यांतील शेतीमालाची आवक कमी झाली आहे. परिणामी बाजार समित्यांच्या उत्पन्नात घट झाली आहे.

कर्मचाऱ्यांच्या पगार तसेच इतर खर्चासाठी निधी शिल्लक रहात नाही. आर्थिकदृष्ट्या डबाघाईत आलेल्या बाजार समित्यांतील कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होत नाहीत. उत्पन्न वाढीसाठी संचालक मंडळांनी प्रयत्न करण्याची गरज आहे.

२०२३-२४ आर्थिक वर्षे बाजार समितीनिहाय उत्पन्न, खर्च, तूट स्थिती (कोटी रुपयांत) वर्गवारी

बाजार समिती उत्पन्न खर्च वाढवा तूट आस्थापना खर्च वर्गवारी

मानवत ४.८० २.९८ १.८१ ००० २.०८ अ

परभणी ३.३१ २.९५ ०.३५ ००० २.२६ अ

जिंतूर २.०६ २.२९ ००० ०.२२ १.९८ अ

सेलू २.६७ २.७८ ००० ०.११ १.७३ अ

बोरी १.०१ ०.४८ ०.५३ ००० ०.२९ अ

पाथरी ०.९१ ०.८२ ०.९ ००० ०.४८ ब

सोनपेठ ०.७३ ०.७२ ०.०६३ ००० ०.५५ ब

पूर्णा ०.६१ ०.८४ ००० ०.२२ ०.६७ ब

गंगाखेड ०.९० ०.८७ ०.३ ००० ०.६० क

पालम ०.२१ ०.५१ ००० ०.३० ०.४६ ड

ताडकळस ०.३९ ०.१७ ०.२२ ००० ०.००९४ ड

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com