Dr. Amol Kolhe : शेतकऱ्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी मोर्चा

Farmer March : शेतकऱ्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला असल्याचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी बुधवारी (ता. २७) येथे सांगितले.
Amol Kolhe
Amol KolheAgrowon

Junnar News : केंद्र व राज्य सरकारचे धोरण शेतकरी विरोधी असून, शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांविषयी संसदेत चर्चा व्हावी अशी मागणी केली असता मला तसेच खासदार सुप्रिया सुळे यांना संसदेतून निलंबित करण्यात आले.

यामुळे शेतकऱ्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला असल्याचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी बुधवारी (ता. २७) येथे सांगितले.

Amol Kolhe
Amol Kolhe : शरद पवारांच्या भेटीनंतर कोल्हे यांचा हुंकार; आक्रोश मार्चा काढण्यावर ठाम

किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराज यांना नतमस्तक होत खासदार डॉ. कोल्हे यांनी शेतकरी आक्रोश मोर्चास सुरुवात केली. या वेळी आमदार अशोक पवार, देवदत्त निकम, माऊली खंडागळे, सुरेश भोर, राजश्री बोरकर, सत्यशील शेरकर, सुनील मेहेर, अनंतराव चौगुले, बाबा परदेशी, अशोक घोलप, सुरेश भोर, शरद चौधरी आदी महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Amol Kolhe
Onion Export Ban : दादांनी त्यांचा दरारा केंद्रालाही दाखवावा...; कोल्हे यांचा अजित पवार यांना खोचक सल्ला

काय आहेत मागण्या...

कांदा निर्यात बंदीने शेतकरी हैराण झाला असून, निर्यात बंदी उठवावी. निर्यातधोरण कायमस्वरूपी ठरवावे.

खासगी, शासकीय असा भेदभाव न करता दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान द्या.

बिबट प्रवण तालुक्यात शेतीसाठी दिवसा अखंडित वीजपुरवठा व्हावा.

विमा कंपन्यांच्या मनमानीला आळा घालून विम्याची रक्कम तातडीने द्यावी.

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी. शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी निश्‍चित शैक्षणिक कर्ज धोरण लागू करावे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com