
Chh. Sambhajinagar News : मराठवाड्याततील 57 गावे आणि 11 वाड्यांची तहान टँकरवर अवलंबून आहे. नांदेड, छत्रपती संभाजीनगरमध्ये यंदा उन्हाळ्याच्या प्रारंभीच पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत असल्याने मार्चमध्येच टॅंकर सुरू झाले. आता जालना जिल्ह्यातही पाणीटंचाईला सुरवात झाली आहे. मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांमध्ये ५७ गावे आणि ११ वाड्यांमध्ये पाणीटंचाई जाणवत आहे. परिणामी या ठिकाणी ८३ टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मार्चच्या मध्यापासूनच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या वैजापूर तालुक्यातील सावखेड खंडाळा, दसकुली, तिडी, आघूर, लोणी बुद्रुक, मकरमतपूर, कनकसागज, माळीसागज यांसह अन्य काही तालुक्यांतील गावांतून टँकर सुरू करा, अशी मागणी झाली. सुरवातीला जिल्ह्याच्या १६ गावांत १७ टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला. दिवसेंदिवस तहानलेल्या गावांच्या संख्येत भर पडली.
त्यानुसार टँकरच्या संख्येतही प्रशासनाला वाढ करावी लागली. मार्चअखेरच्या अहवालानुसार जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील ८ गावे व ५ वाड्यांना १२ टँकरद्वारे पुरवठा केला जात आहे. फुलंब्रीतील एका गावात २ टँकर सुरू आहेत. पैठण तालुक्यातील ११ गावांना ११ टँकरद्वारे, वैजापूर तालुक्यातील १५ गावे व एका वाडीला १६, तर गंगापूर तालुक्यातील तहानलेल्या ७ गावांना १० टँकरद्वारे पुरवठा केला जात आहे.
याप्रमाणे जिल्ह्यातील ४२ गावे आणि ६ वाड्यांना ५१ टँकरद्वारे पुरवठा केला जात असून टँकरच्या मंजूर फेऱ्यांची संख्या १०१ एवढी असल्याचे विभागीय आयुक्तालयाच्या सूत्रांनी सांगितले.५६ खासगी विहिरींचे अधिग्रहणही केले आहे. नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील एका गावाला तसेच माहूर येथील एका गावाला टँकरद्वारे पुरवठा केला जात आहे.
तसेच जालना जिल्ह्यातील १३ गावे व ५ वाड्यांना मिळून ३० टँकरद्वारे पुरवठा होत आहे. यात जालना तालुक्यातील ३ गावे व २ वाड्यांना १२ टँकरद्वारे पुरवठा सुरू आहे. बदनापूर तालुक्यातील ६ गावे व ३ वाड्यांना १२, अंबड तालुक्यातील ४ गावांना ६ टँकरद्वारे पुरवठा केला जात असल्याचे प्रशासनाच्या सूत्रांनी सांगितले.
मराठवाड्यात १२६ विहिरींचे अधिग्रहण
टॅंकरने पाणीपुरवठा करण्यासाठी विहिरींचे अधिग्रहण करावे लागते. मार्चअखेरच्या अहवालानुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वाधिक विहिरींचे अधिग्रहण केले आहे. टॅंकरसाठी व टॅंकरव्यतिरिक्त प्रत्येकी २८ अशा ५६ विहिरी अधिग्रहीत आहेत. नांदेड जिल्ह्यात टॅंकरसाठी २, तर टॅंकरव्यतिरिक्त २९ अशा ३१ विहिरी, जालना जिल्ह्यात टॅंकरसाठी २४, हिंगोली जिल्ह्यात टॅंकर व्यतिरिक्त १५ विहिरी असे विभागात १२६ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.