Tanker Water Supply : माण तालुक्‍यात ३१ टँकरद्वारे पाणी

Water Scarcity : यंदा फेब्रुवारी महिन्यातच उन्हाळ्याची तीव्रता जाणवू लागल्याने प्रशासनाने टंचाईसदृश गावांमध्ये उपाययोजना सुरू केल्या होत्या.
Water Scarcity
Water ScarcityAgrowon
Published on
Updated on

Satara News : जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढली असून, पिण्याच्या पाण्याच्या टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. माण तालुक्यात ३० गावे २१७ वाड्यांना प्रशासनाकडून ३१ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

दुष्काळाची तीव्रता वाढू लागल्याने प्रशासनाकडून गतीने उपाययोजना करण्यात येत आहेत.यंदा फेब्रुवारी महिन्यातच उन्हाळ्याची तीव्रता जाणवू लागल्याने प्रशासनाने टंचाईसदृश गावांमध्ये उपाययोजना सुरू केल्या होत्या.

Water Scarcity
Water Scarcity : खानदेशातील पाणीटंचाई आटोक्यात, टँकरची संख्या फक्त २५

या वर्षी माण तालुक्यातील बिजवडी, मोही, धुळदेव, वरकुटे म्हसवड, कारखेल, हवालदारवाडी, जाशी, पांगरी, डांगिरेवाडी, थदाळे, भाटकी, संभुखेड, पळशी, मार्डी, खुटबाव, येळेवाडी, पाचवड, राजवडी, वावरहिरे, अनभुलेवाडी, पर्यंती, खडकी, रांजणी, इंजबाव, वारुगड, टाकेवाडी, दोरगेवाडी अशा ३० गावे व लगतच्या २१७ वाड्यांवस्तवरील ४३ हजार ९११ लोकसंख्या व २२ हजार २३८ पशुधनांना टंचाई जाणवू लागली आहे.

Water Scarcity
Water Scarcity : राज्यात पाणीटंचाईत वाढ

दरम्यान, माण तालुक्याप्रमाणे कोरेगाव, फलटण, खटाव तालुक्यांतही काही गावांमध्ये टंचाईची दाहकता जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर टॅंकर मागणीचे प्रस्ताव करण्याची प्रक्रिया अनेक गावांमधून सुरू आहे. उन्हाळी पाऊस झाला नाही, तरी किमान अडीच महिने पाणी समस्या भेडसावण्याची शक्यता आहे. उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने टॅंकरची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com