Manoj Jarange Patil : आपल्यासाठी, मुलांबाळांसाठी, शेतकऱ्यासाठी यंदा उलथा-पालथ करावीच लागेल : जरांगे यांचा इशारा

Manoj Jarange Patil Dasara Melava : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी नारायण गडावरून पहिल्यांदाच दसरा मेळावा घेतला.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange PatilAgrowon
Published on
Updated on

Pune News : राज्यात विधानसभा निवडणूक तोंडावर आली असून कोणत्याही क्षणी निवडणूक जाहीर होऊ शकते. यावेळी दसऱ्यानिमित्त राज्यभरात चार महत्वाचे दसरा मेळावे होणार आहेत. नारायण गड येथील दसरा मेळाव्याला मनोज जरांगे यांनी संबोधित केले. जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर समाजावर शेतकऱ्याच्या विरोधात कोणी उभा राहत असेल तर यंदा उलथा-पालथ करावीच लागेल, असा इशारा जरांगे यांनी दिला आहे.

यावेळी, आज आमचा समाज सर्व ताकदीने एकत्र आला आहे. मराठा समाज न्यायाचा आहे. दुखाकडून सुखाकडे जाणारा आहे. पण आमच्या समाजाने कधीच जातीवाद केला नाही. तसेच आमच्यावर संस्कारही नाहीत. मराठा समुदाय मस्तीत आणि मग्रुरीत कधीच वागला नाही. प्रत्येकाला सांभाळण्याचं, साथ देण्याचं काम आम्ही केलं. तर आमच्या समाजाला जातीनं कधीच शिवली नसल्याचे, जरांगे यांनी म्हटले आहे.

Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर

तसेच जरांगे यांनी, आपल्याला नाकारून टार्गेट केलं जातयं. त्यामुळे समाजाने सावध व्हायला हवं. मला काही मर्यादा पाळायाच्या आहेत. आपल्याला आपल्या लेकरासाठी, समुदायासाठी उलथापालथ करावीच लागेल. याशिवाय पर्यायच नाही. आपल्या नाकावर टिच्चून जर कोणी निर्णय घेत असेल, अशांना गाडावच लागणार असल्याचे मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.

यावेळी जरांगे यांनी समाजाकडून वचन मागताना, फक्त हट्ट करून नका आणि जे सांगतो तेच करा. मग त्यांना माझा इंगा दाखवतो, असा इशारा दिला आहे. तर आपल्या एखाद्या शब्दामुळे समाजाला दुष्परिणाम भोगावे लागतील म्हणून आपण काही बोलत नसल्याचे जरांगे म्हणाले. तर समाजाला कलंक न लागू देता सत्ता, नेता नेता करू नका, असेही वचन समाजाकडे मागितले आहे.

Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil : सरकारला २९ सप्टेंबरपर्यंतची वेळ; मागण्या मान्य न झाल्यास उपोषण

तसेच जरांगे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाना साधताना कायदा आणि संविधानाने अन्यायाविरोधात लढण्याचं शिकवले आहे. अन्याय होत असेल तर उठाव करायचा हे संविधानाने दिलेला अधिकार आहे. यातून न्यायासाठी उठाव चालू आहे. गोरगरीब मराठ्यांना आरक्षण द्या, अशी मागणी १४ महिन्यांपासून करत आहोत. पण १४ महिन्यांपासून आरक्षणासाठी समाजाला झुंज द्यावी लागत आहे. तुमच्यामुळे आरक्षणाला धक्का लागत आहे, असे काहीजण सांगत आहेत.

तर आपल्याला संपवण्यासाठी अनेक षड्यंत्र रचण्यात आली असून पूर्ण घेरले. मला त्रास दिला जात आहे. पण आम्ही येतो म्हटल्यावर नको म्हणणारे आता कोठे आहेत. काहीच दिवसांपूर्वी १७ जाती जाती ओबीसीत घातल्या. आता कुठे गेले धक्का लागतो म्हणणारे? आता उत्तर पाहिजे, असे जरांगे यांनी म्हटले आहे.

तसेच एकीकडे एक आणि दुसरीकडे असा न्याय का दिला जात आहे. आता ओबीसीत ज्या १७ जाती घातल्या यावेळी मविआकडून लिहून घेतला होता का? असाही सवाल केला आहे. तसेच जर क्षत्रिय मराठ्यांना जर अशा पद्धतीने अन्याय करत असाल तर आता सुट्टी नाही, उखडून टाकावचं लागेल. शेतकऱ्यांना अनुदान नाही, पीक विमा नाही. यामुळे मराठा समाज हा सर्वांसाठी उभा आहे. आता आपल्यासमोर दुसरा पर्याय नसून आचारसंहिता लागल्यानंतर निर्णय घ्यायचा आहे, असाहा इशारा दिला आहे. तसेच सरकारने आता आचारसंहिता लागायच्या आत जनतेच्या मागण्या मान्य करा. आमचा अपमान करून खून्नस द्याल तर तुम्हाला उलथवून टाकल्याशिवाय मागे हटणार नाही, असा इशारा दिला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com