Flood Crisis : पूर्व विदर्भात पूरस्थितीमुळे अनेक रस्ते बंद

Vidarbha Flood Situation : बुधवारी (ता. ११) मात्र पाऊस ओसरला असला तरी प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ झाली असल्याने त्यातून होणाऱ्या विसर्गाच्या परिणामी गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यांत अनेक रस्ते बंद होते.
Flood
FloodAgrowon
Published on
Updated on

Nagpur News : पूर्व विदर्भातील अनेक जिल्ह्यांत गेले दोन दिवस पावसाचा जोर होता. बुधवारी (ता. ११) मात्र पाऊस ओसरला असला तरी प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ झाली असल्याने त्यातून होणाऱ्या विसर्गाच्या परिणामी गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यांत अनेक रस्ते बंद होते. बुधवारी (ता. ११) गोंदिया जिल्ह्यात रस्ते वाहतुकीसाठी खुले झाले असले, तरी गडचिरोली जिल्ह्यात अनेक मार्गांवरील वाहतूक बंद होती.

गडचिरोली तसेच गोंदिया जिल्ह्यांत पावसाने हाहाकार उडाला होता. पूरस्थितीमुळे गोंदियात अनेक घरांची पडझड झाली. फुलचूर परिसरात नाल्याच्या काठावरील घर कोसळून दोघांचा मृत्यू झाला. बुधवारी (ता. ११) मात्र पावसाने उघडीप दिल्याने परिस्थितीत सुधारणा झाली. गोंदिया जिल्ह्यात बंद असलेले सर्व रस्ते वाहतुकीसाठी खुले झाले.

Flood
Flood Situation : पूर्व विदर्भात पूरस्थितीमुळे हाहाकार

गडचिरोलीतील परिस्थिती मात्र मंगळवार सारखीच कायम होती. अनेक रस्त्यांवर पाणी असल्याने तब्बल आठ मार्गांवरील वाहतूक बंद होती. गोसेखुर्द प्रकल्पातून धरणाची पातळी नियंत्रित ठेवण्याकरिता विसर्ग वाढविण्यात येणार आहे. हा विसर्ग चार लाख क्‍युसेकपेक्षा अधिक राहणार असल्याने नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

सध्या तीन लाख क्‍युसेकपेक्षा अधिक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. प्रशासनाकडून दुर्गम भागातील नागरिकांच्या आरोग्य सुविधांकडेही लक्ष दिले जात आहे. त्यानुसार भामगराड येथील एका रुग्णाकरिता गडचिरोलीवरून बी-निगेटिव्ह रक्‍त पाठविण्यात आले. रस्ते वाहतूक बंद असल्याने रक्‍त पाठविण्यासाठी थेट हेलिकॉप्टरचा वापर करण्यात आला.

Flood
Flood Issue : पुराने उपजीविकेचे साधनच हिसकावून घेतले

जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. लाहेरी ते बिनागुंडा मार्गावरील गुंडेनूर नाल्यात दलसू अडवे (पोहाडी) हे पुराच्या पाण्यात वेढले होते. या भागात मोबाइल नेटवर्कही नसल्याने त्यांच्याविषयी माहिती मिळू शकली नाही. त्यानंतर काही तासांनी त्यांना ग्रामस्थांच्या मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात आले.

भंडारा जिल्ह्यात ३५ मार्गांवरील वाहतूक बंद

भंडारा जिल्ह्यातही नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. त्याच्या परिणामी तब्बल ३२ मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. बोथली (भंडारा) या गावाला पाण्याने वेढले होते. याच गावातील एका गरोदर महिलेची प्रकृती बिघडली. त्यांना तातडीने वैद्यकीय सेवा मिळावी याकरिता तहसीलदार वैभव पवार यांनी कारवाई केली. बोटीच्या साह्याने गरोदर महिला व इतर सात जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. पूरस्थितीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी संजय कोलते यांनी अनेक भागांना भेटी देत आढावा घेतला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com