Anuskura Ghat Landslide : अणुस्कुरा घाटात कोसळली दरड, तब्बल १५ तासांहून अधिक काळ वाहतूक मार्ग बंद

Land Slide Anuskura Ghat : राजापूर तालुक्यात पावसाची रिपरिपर सुरू होती. तर यंदाच्या वर्षातील दरड कोसळण्याची ही पहिलीच घटना आहे.
Anuskura Ghat Landslide
Anuskura Ghat Landslideagrowon

Kolhapur Ratnagiri Anuskura Road : कोल्हापूर जिल्ह्याला जोडणाऱ्या राजापूर तालुक्यातील अणुस्कुरा घाटात काल सायंकाळी दरड कोसळल्याने वाहतूक खोळंबली आहे. दरम्यान काल सायंकाळी साडेसहा वाजता कोसळलेली दरड काढण्याचे काम अद्यापही सुरू आहे. यामुळे तब्बल १५ तासांहून अधिक काळ रस्ता बंद असल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. काही काळाने या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. तर यंदाच्या वर्षातील दरड कोसळण्याची ही पहिलीच घटना आहे.

वारंवार दरड कोसळत असल्याने घाटातील सुरक्षित प्रवासासह घाटाच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. दरम्यान, घाटातील रस्त्यात सायंकाळी कोसळलेली दरड आणि माती काढून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्याच्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तात्काळ प्रयत्न सुरू झाले आहेत.

परंतु मोठमोठे दगड आणि दरडीचा भाग जास्त प्रमाणात कोसळल्याने तब्बल १५ तासांहून अधिक काळ मार्ग मोकळा करण्याचे काम सुरू आहे. तशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता स्वप्नील बावधनकर यांनी दिली. हे काम युद्ध पातळीवर सुरू असल्याने लवकरच रस्ता वाहतुकीसाठी मोकळा होणार असल्याची माहिती देण्यात आली.

गत आठवड्यापासून मॉन्सून सक्रिय झाला असून तेव्हापासून तालुक्यामध्ये कमी-जास्त प्रमाणात पाऊस होत आहे. मागच्या २४ तासांत राजापूर तालुक्यात पावसाचा जोर वाढल्याने बाकाळे येथे घरांचे नुकसान झाले तर सायंकाळी उशिरा अणुस्कुरा घाटात दरड कोसळल्याची घटना घडली.

Anuskura Ghat Landslide
Kolhapur Fertilizer Shortage : कोल्हापूर जिल्ह्यात खतांचा तुटवडा जाणवण्याची शक्यता, कृषी विभागाचा आंधळा कारभार

यामध्ये दगड आणि मोठ्या प्रमाणात माती रस्त्यावर आल्याने घाटरस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. वाहनांची नियमित वर्दळ असलेल्या या घाटात दरड कोसळण्याची यावर्षीची ही पहिलीच घटना ठरली आहे. या अणुस्कुरा घाट मार्गद्वारे कोकणाला पश्चिम महाराष्ट्राला जोडले गेले आहे. कोकणामध्ये ये-जा करण्यासाठी शॉर्टकट मार्ग म्हणून या घटमार्गाची ओळख आहे. त्यामुळे या मार्गाने वाहनांची नेहमीच मोठ्या प्रमाणात वर्दळ असते.

अणुस्कुरा घाटात वारंवार घटना

कोल्हापूर जिल्ह्यातून कोकणाला जोडणारा पर्यायी मार्ग म्हणून अणुस्कुरा घाटाची ओळख आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील अनेकजण कोल्हापुरात याच मार्गाने दळणवळणासाठी याच मार्गाचा वापर करतात परंतु मागच्या काही वर्षा या घाटात दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढल्याने जिवीत हाणी होण्याची दाट शक्यता आहे. तर रस्त्यांचीही काही ठिकाणी दुरावस्ता झाल्याने वाहनधारकांना वाहन चालवताना कसरत करण्याची वेळ येत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com