Pre Monsoon Rain : पूर्वमोसमी पावसामुळे शेकडो संसार उघड्यावर

Rain Update : डहाणू तालुक्यात गुरुवारी (ता. १६) दुपारी आलेल्या वादळी वारा, अवकाळी पावसाने ५२६ घरांचे नुकसान झाले आहे.
Rain Update
Rain Update Agrowon

Mumbai News : डहाणू तालुक्यात गुरुवारी (ता. १६) दुपारी आलेल्या वादळी वारा, अवकाळी पावसाने ५२६ घरांचे नुकसान झाले आहे.

कासा, चारोटी, वेती वरोती, मुरबाड, वांगरजे, पिंपळशेत, बापगाव, तवा अंबोली, धानिवरी, सायवन या परिसरातील अनेक घरांची छपरे उडाली आहेत. या वादळाने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली होती.

Rain Update
Pre-monsoon Rain : मॉन्सूनपूर्व पावसाने शेतकरी हवालदिल

कासा-चारोटी, तसेच सायवन-कासा मार्गावर मोठी झाडे पडल्याने दोन ते तीन तास कोंडीचा सामना करावा लागला. यात विजेचे खांब, तारा पडल्याने वीजपुरवठादेखील गायब झाल्याने नागरिक त्रस्त झाले होते.

Rain Update
Kolhapur Rain : कोल्हापुरात वळवाच्या पावसाने भाजीपाला, आंबा बागांना फटका

त्यात प्रशासकीय अधिकारी लोकसभा निवडणुकीच्या कामात मग्न असल्याने नुकसानग्रस्त घर, शेत नुकसानीचे पंचनामे करावयास वेळ लावत आहेत.

या पावसाने घरातील जीवनावश्यक वस्तू, साहित्य, कपडेलत्ते, अन्नधान्य भिजले आहे. त्यात वीज नसल्याने पाण्याचीदेखील मोठी अडचण निर्माण झाली आहे. डहाणूच्या या भागात उन्हाळी भातशेती केली जाते. या पावसाने हातात तोंडात आलेला घास हिरावून घेतला आहे, असे शेतकरी म्हणत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com