Buldhana News : बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र राज्य कृषी-व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत येथे ‘उत्पादन तंत्रज्ञान व बाजार संमेलन’ घेण्यात आले. आत्मा प्रकल्प संचालक पुरुषोत्तम उन्हाळे, नोडल अधिकारी दि. स. पटेल, पुरवठा साखळी व मूल्यसाखळी विकास तज्ज्ञ बिपीन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला.
कापूस मूल्य साखळीतील सर्व घटकांना निविष्ठा उत्पादक, शेतमाल उत्पादक शेतकऱ्यांपासून ग्राहकापर्यंत सर्व घटक एकाच व्यासपिठावर आमंत्रित करून सर्वंकष चर्चेद्वारे सर्वांना पूरक अशा मूल्यसाखळीची मांडणी करून प्रस्तावित मूल्यसाखळीची अंमलबजावणी करण्यासाठी रूपरेषा सांगण्यात आली.
शेतकऱ्यांच्या उत्पादन व बाजार संमेलनासाठी मूल्य साखळीतील समुदाय आधारित संस्था व खरीददार तसेच मूल्य साखळीतील अन्य कार्य करणाऱ्या इतर घटकांमधून कापूस बियाणे निविष्ठा उत्पादक, शेतमाल उत्पादक व प्रक्रियादार (जीनर्स, स्पीनर्स, कॉटन सीइस ऑइलमिल, कॉटनबेल ट्रेडर्स) यांसारख्या कॉटन व्हॅल्यू चैन डेव्हलपमेंटशी निगडित शेतकऱ्यांपासून ग्राहकापर्यंत आमंत्रित करण्यात आले होते.
संमेलनाला मार्गदर्शक म्हणून विभागीय नोडल अधिकारी डॉ. प्रशांत नाईक, एमआयएस तज्ज्ञ मिलिंद वानखेडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोज ढगे, केव्हीकेचे वरीष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल तारू, वरिष्ठ अभियंता श्री. देहनकर, महाकॉटचे अभय गावंडे, चंद्रकांत चवणे, राजेंद्र एस. काटे (पलसिद्ध स्पिनिंग मिल, हिवरा आश्रम), गुणवत्ता व्यवस्थापक सचिन चव्हाण, गोदाम विभागीय व्यवस्थापक अभय पावडे,
लक्ष्मीकांत बाहेती, यश मुंदडा, प्रफुल्ल अग्रवाल, जैन एरिगेशनचे वरिष्ठ शास्त्रज्ञ बी. डी. जडे, विष्णू चोपडे उपस्थित होते. प्रशिक्षणार्थी म्हणून स्मार्ट कॉटन संबंधित मूल्यसाखळी विकासाची अंमलबजावणी करण्यासाठी देऊळगावराजा, जळगाव जामोद, मलकापूर, खामगाव येथील निवडलेल्या गटांचे प्रतिनिधी शेतकरी, गट प्रवर्तक तसेच संबंधित कार्यक्षेत्रातील आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक, कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी व ग्रेडर उपस्थित होते.
संमेलनाचे सूत्रसंचालन कृषी सहायक विनायक मेहेत्रे (सरंबा) यांनी केले. ग्रेडर संजय अंभोरे (खामगाव) यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी कापूस मूल्यसाखळी तज्ज्ञ नंदकिशोर काळे (बुलडाणा), अर्थशास्त्रज्ञ व सल्लागार गणेश सुसर, सुनील शिंगणे, एस. बी. ठाकरे, जितेंद्र केकाण यांनी पुढाकार घेतला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.