Solapur News : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेतून व राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेतून शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपयांचा हप्ता जमा होत आहे.
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तेवढाचा आधार म्हणून या रक्कमेकडे पाहिले जात आहे. पण, सोलापूर जिल्ह्यातील २५ हजार शेतकरी अद्यापही या सन्मान निधीच्या लाभापासून दूरच आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, माढा, बार्शी, माळशिरस, सांगोला या पाच तालुक्यांमध्ये ऑक्टोबर २०२३मध्ये दुष्काळ जाहीर झाला आहे. इतर सहा तालुक्यांमध्ये देखील दुष्काळसदृश स्थिती असल्याचे सरकारकडूनच जाहीर करण्यात आले आहे.
अद्याप दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा दमडाही मिळालेला नाही. अशा परिस्थितीत ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर चार हजार रुपयांची मदत सामान्य शेतकऱ्यांसाठी आधार ठरते आहे.
जिल्ह्यातील जवळपास सव्वापाच लाख लाभार्थी योजनेसाठी पात्र आहेत, पण त्यापैकी चार लाख ९० हजार शेतकऱ्यांनाच योजनेचा लाभ मिळतोय. अजूनही २५ हजार शेतकऱ्यांची प्रकरणे प्रलंबित आहेत.
त्यात बॅंक खात्याशी आधार प्रमाणीकरण नसलेले व ई-केवायसी न केलेल्या शेतकऱ्यांची संख्या ११ हजारांपर्यंत आहे. उर्वरित शेतकऱ्यांच्या अर्जांवरील निर्णय तालुका व जिल्हास्तरावर प्रलंबित आहे. कृषी विभागाकडे चौकशी करता, प्रक्रिया सुरु आहे, असे सांगण्यात आले.
कृषी विभागाकडेच २० हजार अर्ज प्रलंबित
या योजनेच्या लाभापासून वंचित जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये आधार प्रमाणीकरण नसलेले जवळपास ८००० शेतकरी आहेत.
तर ई-केवायसी न केलेले ३००० तर यासह अन्य विविध कारणाने तालुकास्तरावर जवळपास १२००० आणि जिल्हास्तरावर १८०० असे एकूण २४, ८०० अर्ज अर्थात शेतकरी या लाभापासून वंचित आहेत. एकूण पात्र लाभधारकांमध्ये कृषी विभागाकडे प्रलंबित असणाऱ्या अर्जांची संख्या सर्वाधिक आहे. त्याबाबत तातडीने कार्यवाही होण्याची गरज आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.